कडधान्याचा चिवडा
साहित्य : अर्धा किलो जाडे पोहे, पाव वाटी मोड आलेला हरभरा, पाव वाटी मोड आलेले मूग, पाव वाटी मोड आलेली मटकी, 1 वाटी खारे शेंगदाणे, पाव वाटी खोबर्याचे काप, 2 चमचे लाल मिरची पूड, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार पिठीसाखर, स्वादानुसार चिवड्याचा मसाला, 4 मोठे चमचे तळण्यासाठी तेल.
कृती : तेल कडकडीत तापवून त्यात सर्व कडधान्यं खमंग तळून पेपरवर काढून घ्या. पोहे मंद आचेवर तळून पेपरवर काढून घ्या. धणे, खोबरंही तळून घ्या. आता एका मोठ्या पातेल्यात पोहे, दाणे, खोबर्याचे काप आणि तळलेली कडधान्यं एकत्र कालवा. चिवड्याचा मसाला, पिठीसाखर, मीठ आणि तिखट एकत्र करून ते पोह्यांच्या मिश्रणात घाला. हाताने चिवडा अलगद कालवा. चिवडा थंड करून हवाबंद डब्यात भरून ठेवा.
नाशिक चिवडा
साहित्य : 1 किलो भाजके पोहे, अर्धा वाटी डाळ, अर्धा वाटी शेंगदाणे, अर्धा वाटी वाळवलेला कांदा, अर्धा वाटी आमसूल, अर्धा वाटी लसूण पाकळ्या, अर्धा वाटी खोबर्याचे काप, 2 चमचे धणे, 2 चमचे जिरेपूड, 2 चमचे लाल मिरची पूड, 2 चमचे हळद, 2 चमचे हिंग, 2 चमचे लवंगा आणि 2 चमचे दालचिनी पूड.
कृती : आमसूल आणि लसूण ठेचून घ्या. तेल गरम करून त्यात ते तळून घ्या. नंतर थंड करून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. तेलामध्ये शेंगदाणे, डाळ, कांदा, खोबरं तळून बाजूला काढून ठेवा. वाटीभर तेलाची फोडणी करून त्यात सर्व मसाले आणि वाटण घाला. आच बंद करून, ही फोडणी कोमट होऊ द्या. नंतर एका पातेल्यात भाजके पोहे, तळलेले जिन्नस, फोडणी आणि मीठ सर्व अलगद व्यवस्थित एकत्र करा. चिवडा थंड करून हवाबंद डब्यात भरून ठेवा.
INGREDIENTS1½ cups basmati brown rice, 150 g methi leaves, chopped, 2 cardamom pods, 3 cloves,…
भेंडी प्याज साहित्यः 250 ग्रॅम भेंडी, प्रत्येकी 1 टीस्पून राई, कापलेली लसूण, आलं, 1 टेबलस्पून…
INGREDIENTS5-6 tindas, ½ cup onions, finely chopped, 2 cups tomatoes, finely chopped, 1 tsp red…
साहित्य: प्रत्येकी 100 ग्रॅम उकडून घेतलेले मशरूम व मटार, 2 मोठे कांदे व 2 मोठे…
INGREDIENTS2 large pita breads (or hot dog rolls or burger buns), slit into half butter,…
INGREDIENTS30 ml milk, 30 ml condensed milk, 150 g sugar, 150 g chocolate, 20 g…