काजोलने चित्रपट करो वा ना करो, किंवा वर्षातून एकच चित्रपट करो, तिच्या चाहत्यांना या गोष्टीची पर्वा नसते. काजोलने कमी चित्रपटांमध्ये जरी काम केले तरी ती तिचे प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते, जेणेकरून ती चाहत्यांशी कनेक्ट राहू शकेल. त्यामुळे तिचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. पण काजोलच्या एका कृतीमुळे तिच्या चाहत्यांचे मन दुखावले आहे. अभिनेत्रीने अचानक सोशल मीडियाचा निरोप घेतला असून आणि तिने शेवटची एक गुढ पोस्ट शेअर केली आहे.
काजोलने आपल्या इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर ती सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याचे जाहिर केले आहे. काही वेळापूर्वीच तिने सोशल मीडियावरून आपल्या सर्व पोस्ट डिलीट केल्या आणि एक गुढ पोस्ट देखील शेअर केली. काजोलने एका काळ्या पेजवर लिहिले आहे, ‘मी माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षेचा सामना करत आहे.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये काजोलने लिहिले आहे की, मी सोशल मीडियातून ब्रेक घेत आहे. काजोलची पोस्ट पाहून तिचे चाहते तिच्यासाठी काळजीत पडले आहेत आणि कमेंट करून तिच्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एका युजरने लिहिले, “आशा आहे की तू ठीक आहेस. आम्ही नेहमी तुझी वाट पाहत राहू.”, दुसर्या यूजरने लिहिले की, ” काजोल, थोडा वेळ दे. आशा आहे, तुझ सगळ बरोबर होईल. तुला खूप प्रेम आणि मिठी.”
तर काही लोक याला काजोलचा पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत. खरं तर, काजोल लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार्या ‘द गुड वाईफ’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये ती एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही यूजर्स काजोलच्या या स्टेपला या वेबसीरिजशी जोडत आहेत. या वेबसीरिजच्या प्रसिद्धीसाठी काजोलने हे सर्व नाटक केल्याचे त्यांचे मत आहे.
रेटिंग: *** अनुराग बसु रिश्ते के ताने-बाने की गहराई को बख़ूबी समझते हैं और अपने…
वो मोहित के स्टेशन आने की ख़ुशी और बिछड़ने के ग़म दोनों को शब्द नहीं…
छोटे परदे पर चिंकी-मिंकी (Chinky-Minky) के नाम से घर-घर में पॉपुलर हुई इनफ्लुएंसर जोड़ी सुरभि…
सांत्वना सिसक पड़ी. एक पल को चुप रह कर अविनाश ने कहा, "सांत्वना, आज से…
फिल्म 'मिसेज' (Movie Mrs) में सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra)के ससुर बने एक्टर कंवलजीत सिंह (Kanwaljit…
‘कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवाला (Kaanta Laga Girl Shefali Jariwala) अब इस दुनिया में (Shefali…