Marathi

ॲनिमलच्या दिग्दर्शकाशी कंगनाने घेतला पंगा, म्हणाली- तुमच्या सिनेमात मी कधीच काम करणार नाही (Kangana Ranaut Slams Animal Director, Refuses To Do His Film)

बॉलीवूडची क्वीन कंगना राणौत बिनधास्त बोलते, तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर बॉलीवूड सेलेब्ससोबतही ती अनेकदा पंगा घेते. यावेळी तिने ॲनिमल डायरेक्टर संदीप रेड्डी वंगा यांच्यावर निशाणा साधला आहे, सोशल मीडियावर त्यांची निंदा केली आहे यासोबतच तिने संदीप रेड्डी वंगा यांच्या चित्रपटात कधीही काम करणार नसल्याचेही जाहीर केले आहे.

काही काळापूर्वी कंगनाने संदीप रेड्डी वंगा यांच्या ॲनिमल या चित्रपटावर बरीच टीका केली होती. रणबीर कपूरवरही तिने निशाणा साधला. कंगनाने ॲनिमलला महिलांवरील अत्याचाराचा प्रचार करणारा चित्रपट म्हटले होते. एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा ॲनिमल डायरेक्टरला कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा त्याने कंगनाचे खूप कौतुक केले आणि असेही सांगितले की जर कंगनाची स्क्रिप्ट असेल तर मला नक्कीच तिच्यासोबत काम करायला आवडेल.

आता कंगनाने संदीप वंगा रेड्डी यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांच्या मुलाखतीची ही व्हिडीओ क्लिप शेअर करून त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. कंगनाने लिहिले- समीक्षा आणि टीका सारख्या नसतात. प्रत्येक प्रकारच्या कलेची समीक्षा आणि चर्चा व्हायला हवी, ही एक सामान्य गोष्ट आहे. माझ्या रिव्ह्यूवर हसून संदीपजींनी ज्या प्रकारे माझ्याबद्दल आदर दाखवला, त्यावरून असे म्हणता येईल की ते केवळ मर्दानी चित्रपटच बनवत नाहीत, त्यांची वृत्तीही मर्दानी आहे, धन्यवाद सर.”

कंगनाने पुढे लिहिले – “पण कृपया मला कधीही कोणतीही भूमिका देऊ नका, अन्यथा तुमचे अल्फा पुरुष नायक स्त्रीवादी होतील आणि मग तुमचे चित्रपटही फ्लॉप होतील, तुम्ही ब्लॉकबस्टर बनवता. फिल्म इंडस्ट्रीला तुमची गरज आहे.”

काही दिवसांपूर्वी कंगना रणौतने ॲनिमलच्या सीनवर टिका केली होती, ज्यामध्ये रणबीर कपूर तृप्ती डिमरीला शूज चाटायला सांगतो. कंगना राणौत म्हणाली, “माझ्या चित्रपटांसाठी सशुल्क नकारात्मकता पसरवली जाते. मी या परिस्थितीशी मोठ्या कष्टाने लढत आहे. पण जनतेला असे चित्रपटही आवडतात ज्यात महिलांना मारहाण केली जाते. जिथे त्यांचा वापर वस्तू म्हणून केला जातो. त्यांना बूट चाटण्यास सांगितले जाते. महिला सक्षमीकरणासाठी समर्पित असलेल्या आणि त्यावर आधारित चित्रपट बनवणाऱ्या व्यक्तीसाठी हे खूप निराशाजनक आहे.” ॲनिमल डायरेक्टरनेही तिच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती आणि ते म्हणाले होते की, “क्वीन आणि इतर चित्रपटांमध्ये तिचा अभिनय मला खूप आवडला. त्यामुळे ती जर एनिमलबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया देत असेल तर मला काही हरकत नाही. मला राग नाही. कारण मी तिचा चित्रपट पाहिला आहे. मला वाईट वाटत नाही.”

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

व्यंग्य- आप कुछ समझते क्यों नहीं? (Satire- Aap Kuch Samjhte Kyon Nahi?)

बॉस थक जाते हैं, कहते है, “यार ये कुछ समझाता क्यों नहीं."और मुझे लगता है,…

July 22, 2024

श्रावण मास पर विशेष: कहानी- हम में शक्ति हम में शिव… (Short Story- Hum Mein Shakti Hum Mein Shiv…)

तभी मां जो शिव की अनन्य भक्त थीं, बोलीं, ''बेटा! जहां ईश्वर हों, वहां आस्था…

July 22, 2024
© Merisaheli