Entertainment Marathi

कांतारा : चाप्टर २ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित (Kantara 2 Teaser Rishab Shetty Introduces Us To The Sacred Echoes Of The Past)

‘होम्बाले फिल्म्स’ या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांत मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने आतापर्यंत ‘केजीएफ: चाप्टर २’, ‘अ लेजंड’, ‘सलार: पार्ट २’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता या निर्मिती संस्थेचा सर्वांत मोठा प्रोजेक्ट ‘कांतारा: चाप्टर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. २०२२ मध्ये ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्याचाच हा दुसरा भाग आहे. मात्र त्यात ‘कांतारा’च्या आधीची कथा दाखवण्यात येणार असल्याने याला ‘प्रीक्वेल’ असं म्हटलंय. १ मिनिट २२ सेकंदांच्या या टीझरमध्ये अभिनेता ऋषभ शेट्टीचा यापूर्वी कधीही न पाहिलेला लूक दिसून येत आहे. केवळ हा टीझर पाहिल्यानेही अंगावर काटा उभा राहतो.

या टीझरमध्ये दाखवलंय की शिवा (ऋषभ) जंगलात टॉर्च घेऊन जात असतो, तेव्हा त्याला आकाशातून एक आवाज ऐकू येतो. तो आवाज म्हणतो, “प्रकाश.. प्रकाशात तर सर्वांना सर्वकाही दिसतं. मात्र हा प्रकाश नाही, दर्शन आहे. जे घडलं, जे घडणार आहे ते सर्वकाही दाखवणारा प्रकाश.. दिसतोय का?” यानंतर शिवाचा एक वेगळाच चेहरा समोर येतो. पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश एका गुहेच्या तळाशी पोहोचतो, तेव्हा त्रिशूळ हातात घेतलेला आणि रक्ताने माखलेला एक मनुष्य दृष्टीस पडतो. त्याच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत, त्याचे केस लांब आहेत आणि त्याच्या डोळ्यात धगधगती आग पहायला मिळतेय. ऋषभ शेट्टीचा हा लूक दाखवताना पार्श्वसंगीतही त्याच तोडीचं ऐकायला मिळतंय. या चित्रपटाची कथा कदंब राजवंशाच्या काळातील असल्याचंही टीझरमध्ये दाखवलं गेलंय.

या चित्रपटाची कथा ऋषभनेच लिहिली असून त्याचं दिग्दर्शनही त्यानेच केलंय. २०२२ मध्ये ‘कांतारा’ या चित्रपटासाठी ऋषभला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता ‘कांतारा: चाप्टर 1 – अ लेजंड’ हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजय किरागंदुर यांनी होम्बाले फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

‘कांतारा’ हा मूळ कन्नड भाषेतील सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. त्या शब्दाचा अर्थ रहस्यमयी जंगल असा होतो. जंगलच्या देवतेला कन्नड भाषेत ‘कांतारे’ म्हटलं जातं. त्यावरून या चित्रपटाचं नाव ‘कांतारा’ असं देण्यात आलं आहे. कर्नाटकमध्ये या वनदेवतेला खूप महत्त्व आहे. त्यांची वेशभूषा करून लोकनृत्य सादर केले जातात.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025
© Merisaheli