करीना कपूर खान आज तिचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीने तिचा वाढदिवस रात्री उशिरा कुटुंबियांसोबत साजरा केला. अभिनेत्रीची बहीण करिश्मा कपूरने सोशल मीडियावर करिनाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. करिश्मानेही तिची बहीण करीना कपूरला लाइफलाइन म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडकी अभिनेत्री करीना कपूर खान आज तिचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. करीना कपूर खानने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये खूप लो प्रोफाइल ठेवले होते असे मिडिया रिपोर्टस् मध्ये सांगितले गेले. अभिनेत्रीने तिचा पती सैफ अली खानच्या वडिलोपार्जित निवासस्थान पतौडी पॅलेसमध्ये तिच्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला.
करीना कपूरची बहीण करिश्मा कपूरही तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती. आणि आता करिश्माने तिच्या इंस्टाग्रामवर करीनाच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो शेअर केले आहेत आणि वाढदिवसाची नोटही लिहिली आहे.
फोटो शेअर करताना, कॅप्शन म्हणून लिहिलेल्या वाढदिवसाच्या नोटमध्ये करिश्माने लिहिले – माझ्या लाईफलाइनला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तिने बेबोचा वाढदिवसाचा केक कापतानाचा एक सुंदर फोटोही शेअर केला आहे.
करिश्माने आणखी एक फोटो शेअर केला आहे, तो एक केकचा आहे. हा फोटो शेअर करताना करिश्माने लिहिले – आमच्या लाडकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. करिश्माने बर्थडे पार्टीतील करिनासोबतचे आणखी जबरदस्त फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोन्ही बहिणी कॅज्युअल आउटफिटमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत.
करीना कपूरनेही तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो शेअर केले आहेत.
ऑस्कर अवॉर्ड विजेता संगीतकार एआर रहमान (AR Rahman) की पर्सनल लाइफ से एक शॉकिंग न्यूज…
ये धड़कनें भी अजीब हैंकभी-कभी बेवजह धड़कती हैंसांस लेने के लिएदिल पूछता हैजब तुम नहीं…
राजेश मां की बातें सुन कर आश्चर्य एवं आक्रोश से कह उठा, "मां, कई वर्षो…
स्वरा भास्कर (Swara Bhaskar) अपनी फिल्मों को लेकर कम और विवादों को लेकर ज्यादा सुर्खियों…
अभिनेत्री परिणीती चोप्राचं गेल्यावर्षी २४ सप्टेंबरला आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर लग्न झालं.…
टेलिव्हिजनचा सर्वात लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा बऱ्याच काळापासून सर्वांचा आवडता शो…