Marathi

स्वयंपाकघर ठेवा स्वच्छ, पाळा हे नियम (Keep The Kitchen Clean, Follow These Rules)

स्वयंपाकघरात काम करत असताना गृहिणीला कुटुंबाच्या आरोग्याशी निगडीत अगदी बारीक सारीक गोष्टींकडेही लक्ष द्यावं लागतं. त्यातील महत्त्वाची गोष्ट असते स्वयंपाकघरातील स्वच्छता. त्यासाठी गृहिणींना माहीत असावेत असे काही नियम…

जेवण बनवणे असो वा खाणे दोन्ही कामं स्वयंपाकघरातच होत असतात. या दोहोंचा संबंध आपल्या आरोग्याशी असल्यामुळे या दोहोंसाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती स्वयंपाकघरातील स्वच्छता. उत्तम जेवण बनवणार्‍या गृहिणी घाईघाईत स्वयंपाक बनवताना स्वयंपाकघरातील साफसफाई, स्वच्छता याकडे पाहिजे तितक्या गांभीर्याने लक्ष देत नाहीत. स्वयंपाकघरात काम करत असताना कुटुंबाच्या आरोग्याशी निगडीत अगदी बारीक सारीक गोष्टींकडेही लक्ष असावे लागते. यासाठी जे नियम आहेत ते एकदा पाळायचे ठरवले की ते अंगवळणी पडतात अर्थात आपल्याकडून ते आपोआपच पाळले जातात. बघूया हे नियम काय आहेत ते…

  1. स्वयंपाकघरातील स्वच्छतेसाठीचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे स्वयंपाकघरात प्रवेश करण्यापूर्वी हात धूऊन जावे. हात धुतल्याशिवाय गेल्यास जिवाणू पसरण्याची भीती असते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार 25 ते 30 टक्के आजार हे हात न धुता जेवण केल्यामुळे होतात. हात धुतल्याशिवाय जेवण बनवल्यामुळे जेवणातून किटाणू आपल्या शरीरात जातात आणि आपण आजारी पडतो. तेव्हा स्वयंपाकघरात जाण्यापूर्वी साबणाने हात स्वच्छ धुवा.
  2. अन्न व्यवस्थित शिजवून खाणे हा देखील स्वयंपाकघरातील स्वच्छतेचाच भाग आहे. कच्च्या अन्नपदार्थामध्ये शरीरास इजा पोहोचवणारे जिवाणू असतात, त्यामुळे कच्चं वा अर्धवट शिजलेलं अन्न खाणार्‍यास फूड पॉइझनिंग होऊ शकतं. म्हणून आचेवरून उतरवण्यापूर्वी अन्न नीट शिजलं आहे की नाही याची खात्री करून घ्या.
  3. एकदा जेवण करून झाल्यानंतर ते अन्न पुन्हा पुन्हा गरम करू नये. असं केल्याने जेवणातील पौष्टिक घटक नष्ट होतात. तसेच अन्न खराब होण्याची शक्यता वाढते.
  4. स्वच्छतेच्या नियमांमध्ये आपली जेवण बनवण्याची पद्धत योग्य असणं गरजेचं आहे. अर्थात खाद्यपदार्थ सुरक्षितपणे साठवून ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शिल्लक राहिलेले वा उघडे राहिलेले अन्नपदार्थ झिप लॉक बॅगमध्ये ठेवा. डाळी, अन्नधान्य, कडधान्य इत्यादी प्लॅस्टिकच्या डब्यांत भरून ठेवा.
  5. स्वयंपाक करण्यापूर्वी सर्वप्रथम आपला ओटा स्वच्छ असावयास हवा. तसेच न्याहारी, जेवण इत्यादी बनवून झाल्यानंतर ओटा स्वच्छ करून ठेवणे आवश्यक आहे. यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ राहिल आणि तेथे जिवाणू पसरण्याची भीती राहणार नाही. तसेच आठवड्यातून एकदा ओटा गरम पाण्यामध्ये वॉशिंग पावडर किंवा लिक्विड सोप वा बेकिंग सोडा घालून साफ करा.
  6. बहुतांशी महिला भाज्या वगैरे कापण्यासाठी चॉपिंग बोर्डचा वापर करतात. परंतु हा चॉपिंग बोर्ड नीट स्वच्छ केला नाही तर त्यावर चिकटून राहिलेल्या भाज्यांमुळे जिवाणू निर्माण होऊ शकतात. तेव्हा चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी स्क्रबरचा वापर करा. आणि आठवड्यातून एकदा तो गरम पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्यावर चिकटून राहिलेले वा लपलेले जिवाणू निघून जातील.
  7. जेवण बनवताना सर्वाधिक वापरली जाणारी वस्तू म्हणजे सुरी, ज्यामुळे जिवाणू पसरण्याची भीती अधिक असते. तेव्हा जितके वेळा सुरीचा वापर केला असेल तितके वेळा ती धुऊन स्वच्छ करून ठेवली पाहिजे. सर्व कामं आटोपल्यानंतर सुरी गरम पाण्याने धुऊन ठेवा. म्हणजे त्याला चिकटलेली माती आणि जिवाणू दोन्ही निघून जातील.
  8. मांसाहारी जेवणासाठी वेगळी भांडी वापरा. मांसाहार बनविल्यानंतर ते भांडं स्वच्छ करून उन्हामध्ये वाळू द्या. इतर भांड्यांसोबत न ठेवता ते वेगळं ठेवा.
  9. जेवण बनवताना होणारा कचरा इकडेतिकडे फेकू नका. तसेच स्वयंपाकघराच्या एखाद्या कोपर्‍यात जमा करूनही ठेवू नका, तो तेव्हाच्या तेव्हाच भरून कचर्‍याच्या डब्यात टाका.
  10. स्वयंपाकघरामध्ये कचर्‍याचा डबा असणं गरजेचं आहे. तो नेहमी झाकून ठेवा आणि त्यातील कचरा नियमितपणे बाहेर फेकून या.
  11. जेवण बनवताना स्वयंपाकघरातील भिंतीवर तेलाचे शिंतोडे उडतात, हे शिंतोडे लगेच साफ केले पाहिजेत. नाहीतर तेथे किटक जमा होण्याची शक्यता असते. हे डाग तेलकट असल्यामुळे गरम पाण्यात साबण टाकून स्वच्छ करा. म्हणजे जिवाणू पसरण्याची भीतीही राहणार नाही. तसेच स्वयंपाकघरही स्वच्छ आणि सुंदर दिसेल.
  12. स्वयंपाकघरातील कचर्‍याचा डबा नियमितपणे स्वच्छ करा. कचर्‍याच्या डब्यामध्ये फेकलेला कचरा (फळांची, भाज्यांची सालं आणि इतर ओला कचरा) लवकर खराब होतो आणि त्यास दुर्गंधी येते. त्यामुळे वातावरणात जिवाणू पसरण्यास सुरुवात होते. तेव्हा स्वयंपाकघर स्वच्छ ठेवायचं असेल तर आधी कचर्‍याचा डबा स्वच्छ ठेवा.
  13. स्वयंपाकघरातील कचर्‍याच्या डब्यातून दुर्गंधी येत असेल, तर त्याच्या आजूबाजूला बेकिंग सोडा टाकून ठेवा. त्यामुळे किटक पसरणार नाहीत आणि दुर्गंधी देखील संपूर्ण घरामध्ये पसरणार नाही.
  14. फ्रिज हा देखील स्वयंपाकघरातील महत्त्वपूर्ण घटक आहे. आणि फ्रिजची साफसफाई देखील नियमितपणे होणे गरजेचे आहे. बरेच दिवस फ्रिज साफ केला नाही किंवा बर्‍याच दिवसांचे शिल्लक राहिलेले अन्न जर फ्रिजमध्ये तसेच राहिले तर त्यात जिवाणू होण्याची शक्यता असते. म्हणून आठवड्यातून एकदा पाण्यात बेकिंग सोडा घालून फ्रिज साफ केला पाहिजे.
  15. शिजवलेले अन्नपदार्थ फ्रिजमध्ये 7 दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवू नये. तरीही शिल्लक राहिलेले अन्न तुम्हाला खायचेच असेल तर ते फ्रिजमधून काढल्यानंतर आधी खराब तर झाले नाही ना याची खात्री करून घ्या आणि मग ते 170 डिग्री सेल्सिअस तापमानाला गरम करा. गरम करताना पदार्थाला वास येत असेल वा त्याचा रंग बदलेला वाटत असेल तर लगेचच ते अन्न टाकून द्या.
  16. स्वयंपाकघरातील सिंक ही जागाही जिवाणूंना फार आवडत असते. कारण तेथे दिवसभर जेवणाची उष्टी भांडी घासली जात असतात. तेव्हा भांड्यांबरोबरच सिंकही स्क्रबर आणि क्लिनरने रोज स्वच्छ केले पाहिजे. आठवड्यातून एकदा गरम पाण्यामध्ये बेकिंग सोडा घालून सिंक साफ केलं पाहिजे.
  17. आपण जेवणासाठी जी भांडी वापरतो त्या भांड्यांच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारं स्क्रबर आणि लिक्विड सोप हे चांगल्या दर्जाचं असावं. कारण स्क्रबरमधूनच जिवाणू पसरण्याची भिती अधिक असते. तेव्हा स्क्रबरचा वापर करून झाल्यानंतर तेही स्वच्छ धूऊन सुकवून ठेवलं पाहिजे.
    18.महिलांचा बराचसा वेळ हा स्वयंपाकघरात एकतर जेवण करण्यासाठी तसेच स्वयंपाकघराच्या स्वच्छतेसाठी जातो. तरीपण काही वेळा महिलांकडून स्वयंपाकघरात वापरले जाणारे कपडे, स्पंज आणि स्क्रबर अशा अधिक प्रमाणात जिवाणू पसरवणार्‍या वस्तूंकडे दुर्लक्ष होते. या वस्तू 2-3 दिवसांनी गरम पाण्याने धुतल्या पाहिजेत शिवाय 1-2 महिन्यांपेक्षा जास्त वापरू नयेत, शक्यतो बदलाव्यात.
shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

करीना कपूर- सैफ कहते हैं कि एसी के इस तरह के मुद्दे को लेकर कई तलाक़ होते हैं… (Kareena Kapoor- Saif Kahte Hain Ki AC Ke Iss Tarah Ke Mudde Ko Lekar Kai Talaq Hote Hain…)

फिल्म ‘क्रू’ और ‘बकिंघम मर्डर्स’ में करीना कपूर के दिलचस्प क़िरदार को सबने ख़ूब पसंद…

September 26, 2024

कहानी- समझ (Short Story- Samajh)

मैं आहत थी, थोड़ा कट गई… उसे भी जुड़े रहने में हानि ही दिखी होगी,…

September 26, 2024

लेकीच्या जन्मानंतर रणवीरने पहिल्यांदाच शेअर केला त्याचा फोटो, चाहतेही झाले चकित (New Daddy Ranveer Singh Shared Photo For The First Time After Birth of His Daughter)

बॉलीवूडचे पॉवर कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरी ८ सप्टेंबर रोजी बाळाचे आगमन…

September 26, 2024

‘येक नंबर’मध्ये पाहायला मिळणार एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी ( Raj Thackeray Special Appearnce In Yek Number Movie )

ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत, त्या झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत…

September 26, 2024

करियरमध्ये यशाच्या शिखरावर असताना तृप्ती डीमरी निवृत्त होऊन पर्वतांच्या सानिध्यात आयुष्य घालवू इच्छिते (Triptii Dimri’s Retirement Plans: Leaving Bollywood for a Life in the Mountains)    

रणबीर कपूरच्या ॲनिमल या चित्रपटाने अभिनेत्री तृप्ती डिमरीला स्टार बनवले आहे. या चित्रपटात तृप्ती आणि…

September 26, 2024
© Merisaheli