Marathi

मी मान खाली घातलीय… स्वातंत्रदिनी देशात घडणाऱ्या वाईट घटनांवर किरण मानेंनी उठवला आवाज ( Kiran Mane Share Post On Independence Day )

स्वातंत्र्य’ दिन ! खुप उत्साह आणण्याचा प्रयत्न करतोय. ‘हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए’ ऐकलं. तिरंग्याकडे एकटक पहात बसलो… हसत-हसत फासावर चढलेला भगतसिंग डोळ्यासमोर आला. देश पिंजून काढून ब्रिटीशांना सळो की पळो करून सोडलेला गांधीबाबाही दिसला. या देशाला ब्रिटीशांच्याच नव्हे तर हजारो वर्षांच्या मनुवाद्यांच्याही गुलामगिरीतून बाहेर काढून स्वातंत्र्य,समता,बंधुता रूजवणारा भीमराया तर माझ्याकडे रोखून बघत होता. तिघांच्याही नजरेला नजर देऊ शकलो नाही मी…

तिघेही म्हणाले, “बास झाला आमचा अभिमान वगैरे… आपला भारत देश म्हटलं की आजचं, वर्तमानातलं आम्हाला काय दाखवशील?”

माझ्या अंगावर काटा आला…
साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि लैंगिक शोषणाविरोधात दाद न मिळालेल्या त्या सात कुस्तीगीर महिला डोळ्यांसमोर आल्या…
मणिपूरमध्ये विवस्त्र करून धिंड काढलेल्या गेलेल्या भारतीय भगिनी आठवल्या…
दिल्लीच्या सीमेवर आंदोलनात शहीद झालेल्या
शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांच्या नजरांनी अस्वस्थ केलं…
मंदिराच्या पुजार्‍यानं बलात्कार केलेल्या मुलीनं डोळ्यांत पाणी आणलं…
हाथरस, उन्नावमध्ये अत्याचार झालेली कुटूंबं दिसत राहीली..
कोरोना लॉकडाउन मध्ये हजारो किलोमीटर पायी चालत
आपल्या गावी गेलेल्या मजुरांची भयाण परवड आठवून शरमेनं मान खाली गेली…
नोटाबंदीच्यावेळेस एटीएमच्या बाहेर लाइनमध्ये मृत्युमुखी पडलेल्या वयोवृद्ध व्यक्तींची टवाळी करणारे ट्रोल आठवून संतापाने मुठी वळल्या…
लदाखमधले माझे बांधव सतत हतबल नजरेनं पहात राहिलेत असं दिसलं…
शेतात राब राब राबून कापूस, सोयाबीन,तूर,कांदा पिकवणार्‍या शेतकऱ्याला लागलेला गळफास दिसुन थरारलो…
बेरोजगार पदवीधर तरूण रस्त्यावर भटकताना पाहून मन गलबललं…
सैन्यभरतीसाठी आलेली पोरं स्टॅंडवर झोपलेली पाहून काळीज पिळवटलं…
जीव तोडून स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या गरीबाच्या पोरापोरींचा पेपर लीक झाल्यावरचा आक्रोश ऐकून जीव तुटला…
इंजिनीअरिंग करूनही दहा-बारा हजार रुपये पगारावर
काम करणार्‍या पोराच्या निराशेनं मन घेरून टाकलं…

तिघेही माझ्याकडं अजून रोखून बघतायत.
मी मान खाली घातलीय.

बाकी सगळं सहन करण्याच्या पलीकडचंच आहे…
पण किमान एवढं तरी व्हावं…तुटपुंज्या पैशात घर चालवणारी आई आणि मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी रक्ताचं पाणी करणारा बाप यांच्या आत्म्याचा तळतळाट या भ्रष्ट, नीच, क्रूर हुकूमशहांना लागावा…

भारतमाता की जय.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

कहानी- अंगूठी‌ (Short Story- Anguthi)

"क्यों लाए... कम से कम पूछ तो लेते इतनी महंगी चीज़ लेने से पहले.” एकटक…

April 12, 2025

Have fun without going broke!

Do you want to make the most of the festive occasion without it causing a…

April 12, 2025

फिल्म समीक्षा: सनी देओल की ‘जाट’ ने मचाया हर तरफ़ गदर… (Movie Review: Jaat)

सनी देओल की बुलंद आवाज़ और एक्शन के दीवानों के लिए बेहतरीन तोहफ़ा है जाट…

April 11, 2025
© Merisaheli