Entertainment Marathi

‘कुंडली भाग्य’ची प्रीता श्रद्धा आर्याने एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्यांना दिला जन्म, हॉस्पिटलमधून शेअर केली गोड बातमी (Kundali Bhagya Actor Shraddha Arya Blessed With Twins)

‘कुंडली भाग्य’ची प्रीता अर्थात श्रद्धा आर्या आई झाली आहे. श्रद्धा जुळ्या मुलांची आई झाली आहे. लग्नाच्या तीन वर्षानंतर, अभिनेत्री आई बनली आहे त्यामुळे उभयतांचा आनंदही द्विगुणित झाला आहे. आई झाल्याचा आनंद तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

२९ नोव्हेंबरला श्रद्धा आई झाली होती, मात्र आता प्रसूतीनंतर चार दिवसांनी ३ डिसेंबरला श्रद्धाने ही बातमी शेअर केली आहे. तिने हॉस्पिटलच्या खोलीतून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर बसलेली आहे आणि दोन्ही बाळांना तिच्या मांडीवर घेऊन खूप आनंदी दिसत आहे. व्हिडिओची पुढील फ्रेम निळ्या आणि गुलाबी फुग्यांनी सजवली आहे. या फुग्यांवर बेबी बॉय आणि बेबी गर्ल असे लिहिलेले आहे. याशिवाय, तिने व्हिडिओवर 29.11.2024 ही तारीख लिहून बाळांची जन्मतारीखही उघड केली आहे.

व्हिडिओ शेअर करताना, अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले – “आनंदाच्या डबल धमाक्याने आमचे कुटुंब पूर्ण केले आहे… आमचे हृदय दुप्पट आनंदाने भरले आहे.” तिने हॅशटॅगमध्ये असेही सांगितले की तिला एकत्र दोन आशीर्वाद मिळाले आहेत आणि तिने आणि तिचा पती राहुल नागल यांनी एक मुलगा आणि एका मुलीचे स्वागत केले आहे. आता अनेक टीव्ही सेलिब्रिटी या पोस्टवर कमेंट करून या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. अंकिता लोखंडे, रिद्धिमा पंडित, पवित्रा पुनिया, पूजा बॅनर्जी, माही विज यांच्यासह अनेक सेलिब्रिटी कमेंट करून या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. प्रीता जुळ्या मुलांची आई झाल्याच्या बातमीने चाहतेही उत्साहित झाले आहेत आणि सोशल मीडियावर तिचे सतत अभिनंदन करत आहेत.

२०२१ मध्ये श्रद्धा आर्यने राहुल नागलशी लग्न केले. राहुल हा नौदलाचा अधिकारी आहे आणि त्यांची जोडी उत्तम आहे. या जोडप्याने १५ सप्टेंबर २०२४ रोजी गर्भधारणा झाल्याची घोषणा केली होती. तेव्हापासून, अभिनेत्री सोशल मीडियावर आपले बेबी बंप दाखवत पोस्ट शेअर करत आहे. काही काळापूर्वी तिने ‘कुंडली भाग्य’ या शोलाही रामराम केला होता.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

फिल्म समीक्षाः मेट्रो… इन दिनों- रिश्ते और प्यार से जूझती रोमांटिक म्यूज़िकल जर्नी… (Movie Review: Metro… In Dino)

रेटिंग: *** अनुराग बसु रिश्ते के ताने-बाने की गहराई को बख़ूबी समझते हैं और अपने…

July 4, 2025

पहला अफेयर- तीन दिवसीय प्यार! (Love Story- Teen Divasiy Pyar)

वो मोहित के स्टेशन आने की ख़ुशी और बिछड़ने के ग़म दोनों को शब्द नहीं…

July 4, 2025

कहानी- आपने कहा था (Short Story- Aapne Kaha Tha)

सांत्वना सिसक पड़ी. एक पल को चुप रह कर अविनाश ने कहा, "सांत्वना, आज से…

July 4, 2025
© Merisaheli