Marathi

प्रेमीयुगुलांच्या मनावर राज्य करायला ‘मन उडू लागलं’ सज्ज (Man Udu Lagala New Song Release)

प्रेम… प्यार… लव्ह… इष्क… भाषा कोणतीही असो या भावनेत खूप ताकद असते. प्रेम हे जगातील सुंदर गोष्टींपैकी एक आहे. आजवर इतिहासात ज्यांनी जगावेगळं ठरत प्रेमाला आपलसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो वा रोमिओ ज्युलिएट.. प्रेम ही जगातील एक सुंदर भाषा आहे, ज्याने या भाषेचा अनुभव घेतलाय त्यालाच ही भाषा उमगते आणि स्वर्गाहून सुंदर जगाचा शोध त्याला लागतो. खरं प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची आवश्यकता नसते, तरीही अनेकजण आपल्या भावना खास व्यक्तीसमोर व्यक्त करतात. अशातच’मन उडू लागलं’ हे गाणे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास आलं आहे.

‘मन उडू लागलं’ या गाण्याच्या निमित्ताने रसिकांना एका नव्या कोऱ्या जोडीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री अनुभवण्याची संधी मिळणार आहे. स्वरा म्युझिक प्रॉडक्शन ऑफीशीयल प्रस्तुत ‘मन उडू लागलं’ या गाण्यात अभिनेता प्रियेश चव्हाण आणि अभिनेत्री सानिका कोलते या गाण्यामुळे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. तर या गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा पंकज वारूंगसे आणि सुमित कांबळे यांनी उत्तमरीत्याने पेलवली आहे.

या गाण्याला संगीत राजेंद्र गजानन साळुंके यांनी दिले असून हे गाणं केवल वालंज आणि रसिका बोरकर यांनी स्वरबद्ध केलं आहे. आता त्यांनी या रोमँटिक गाण्याच्या संगीताची जबाबदारी उत्तमरित्या पेलवली आहे. तर या गाण्याच्या लेखनाची जबाबदारी राजू काळे यांनी सांभाळली आहे. या गाण्याचे छायाचित्रकार म्हणून अक्षय रनपिसे याने बाजू सांभाळली. ‘मन उडू लागलं’ या गाण्यात रसिकांना एक लव्ह स्टोरी अनुभवायला मिळणार आहे.

श्री. गजानन पुनाजी साळुंके यांनी जवळपास २२ वर्ष सिनेसृष्टीतील हिट चित्रपटांच्या गाण्यांना सुंदरी वाद्य वाजवत सगळ्यांच्या मनात छाप पाडली. हाच वारसा आता त्यांचे चिरंजीव राजेंद्र साळुंके पुढे चालवत आहेत. राजेंद्र यांनी आजवर हिट बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटांमधील गाण्यांना सनईचे सूर दिले आहेत. ‘मन उडू लागलं’ या गाण्याच्या संगीताची आणि निर्मितीची जबाबदारी राजेंद्र यांनी उत्तमरित्या पेलवली आहे.

‘मन उडू लागलं’ गाण्याचं चित्रीकरण सुंदर आणि नयनरम्य अशा ठिकाणी झालं असून ही नवे कोरे प्रेमीयुगुल एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत. या नवोदित जोडप्याची प्रेमकहाणी या गाण्यातून पाहणं रंजक ठरतंय. हे रोमँटिक सॉंग ‘स्वरा म्युझिक प्रोडक्शन ऑफिशियल’ या यूट्यूब चॅनलवर प्रसारित झाल असून साऱ्या रसिक प्रेमींच्या मनावर राज्य करत आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

‘पीकू’ की दोबारा रिलीज़ पर इमोशनल नोट के साथ दीपिका पादुकोण ने इरफान खान को याद किया… (Deepika Padukone remembers Irrfan Khan with an emotional note on the re-release of ‘Piku’…)

अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, इरफान खान स्टारर फिल्म ‘पीकू’ साल 2015 में आई थी. पिता-पुत्री…

April 19, 2025

कहानी- आसमान साफ़ है (Short Story- Aasman Saaf Hai)

"हमेशा अपने बच्चों की मां बनकर जीने के अलावा नारी को कभी-कभी अपने पति की…

April 19, 2025
© Merisaheli