Recipes Marathi

बंगाली पद्धतीची आंब्याची चटणी (Mango Flavour : Bengali Style Mango Chutney)

चला आज काहीतरी नवीन करून पाहुया. बंगाली पद्धतीने आंब्याची आंबट- गोड चटणी बनवूया –

साहित्य:

२ कमी पिकलेले आंबे

प्रत्येकी पाव – पाव टीस्पून जिरे, बडीशेप, मोहरी, कलोंजी (कांद्याचं बी) आणि मेथी

२ चमचे किसलेला गूळ (चवीनुसार)

१ टीस्पून तेल, आल्याचा तुकडा (बारीक चिरलेला)

१/४-१/४  टीस्पून लाल तिखट आणि गरम मसाला पावडर

एक चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ

कृती :

आंबे सोलून त्यांचे बारीक तुकडे करा.

कढईत तेल गरम करून त्यात जिरं, बडीशेप, मोहरी, कलोंजी अन्‌ मेथी घाला.

नंतर त्यात आलं घालून ३० सेकंद परतून घ्या.

आंब्याचे तुकडे, लाल तिखट, गरम मसाला पावडर आणि हिंग घालून २ मिनिटे परतून घ्या.

गूळ आणि मीठ घालून शिजवा.

घट्ट झाल्यावर विस्तवावरून उतरवा.

छान थंड झाल्यावर आंब्याची चटणी काचेच्या बरणीत साठवा.

(Photo Credit: Sailu’s Food)

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

मराठीतील विक्रमी चित्रपट ‘माहेरची साडी’चे निर्माते विजय कोंडके यांचा ३४ वर्षानंतर नवा चित्रपट ‘लेक असावी तर अशी’ (‘Lek Asavi Tar Ashi’ Is New Film Of Producer- Director Vijay Kondke : His Comeback After 34 Years Of Blockbuster Film ‘Maherchi Sadi’)

मोठमोठ्या कलाकारांना एकत्र घेऊन चांगल्या दर्जाचा सिनेमा बनवणं हे निर्माता दिग्दर्शकांसाठी मोठं आव्हान असतं. काही…

April 18, 2024

‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत स्मिता तांबेची वकिलाच्या भूमिकेत एन्ट्री (Actress Smita Tambe Enters As A Lawyer In “Man Dhaga Dhaga Jodte Nava” Serial)

स्टार प्रवाहवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत सार्थक-आनंदीचं नातं अतिशय नाजूक वळणावर आहे. काही…

April 18, 2024

वळवाचा पाऊस (Short Story: Valvacha Pause)

निशा नंदन वर्तक हा अचानक आलेला वळवाचा पाऊस !! अवंतिकेचा उदासपणा कुठच्या कुठे पळून गेला..…

April 18, 2024
© Merisaheli