Marathi

अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि ‘दृश्यम २’ फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके अडकणार विवाहबंधनात, केळवणाची झाली सुरुवात (Marathi Actress Titeeksha Tawde To Tie Knot With Actor Siddharth Bodke)

मराठी मनोरंजनसृष्टीतील एकापोठापाठ एक सेलिब्रिटींच्या लग्नाचे बार उडत आहेत. नुकताच शिवानी सुर्वेने अजिंक्य ननावरेसोबत लग्न केले. आता शिवानी पाठोपाठ आणखी एक मराठमोळी अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeeksha Tawde) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तितीक्षा तावडे ‘दृश्यम 2’ फेम अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत (Siddharth Bodke) लग्न करणार आहे.

तितीक्षा तावडेने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिद्धार्थ बोडकेसोबतचा फोटो पोस्ट करत लग्नाबाबतची गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तितीक्षाने इन्स्टाग्रामवर सिद्धार्थसोबतचा जो फोटो शेअर केला आहे त्यात दोघेही एकमेकांकडे पाहून गोड स्माइल देताना दिसत आहेत. सिद्धार्थसोबतचा हा फोटो शेअर करत तितीक्षाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘He asked me out on a date, it turned out to be a केळवण.’ तितीक्षाने या पोस्टसोबत रेड हार्ट इमोजी देखील पोस्ट केला आहे.

तितीक्षा आणि सिद्धार्थच्या केळवणाला सुरुवात झाली आहे. पण त्यांचे लग्न कधी होणार याबाबत अद्याप काही माहिती समोर आली नाही. तरीही तितीक्षाच्या लग्नाच्या बातमीनेच तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. ते दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी देखील कमेंट्स करत या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. तितीक्षा आणि सिद्धार्थ हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेम व्यक्त करत होते.

तितीक्षा आणि सिद्धार्थ यांची मैत्री खूपच जुनी आहे. २०१५ साली ‘असे हे कन्यादान’ या मालिकेत मुख्य कलाकारांच्या मित्र-मैत्रिणींची भूमिका हे दोघेजण साकारत होते. त्या मालिकेपासूनच त्यांची मैत्री आहे. सिद्धार्थ आणि तितीक्षा यांची जोडी प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच आवडते. सिद्धार्थ आणि तितीक्षाने झी मराठीवरील ‘तू अशी जवळी राहा’ मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या होत्या. २०१८ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या मालिकेने सर्वांचे मन जिंकले होते. या मालिकेमधील मनवा  अन्‌ राजवीरने आता रिअल लाइफमध्ये देखील एकमेकांना आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकारले आहे. दरम्यान, तितीक्षा तावडे सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत काम करत आहे. तर सिद्धार्थ बोडके नुकताच ‘दृश्यम २’ चित्रपटातील भूमिकेमुळे चर्चेत आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती (Marathi Actress Bhagyashree Mote Broke Engagement With Vijay Palande Shared Post)

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. भाग्यश्री हिने सोशल मीडियावर…

April 11, 2024

उकाडा कमी करणारा थंडावा कसा मिळवाल? (How To Get A Coolness That Reduces Heat?)

वाढता असह्य उन्हाळा, घामाच्या धारा नि थकलेलं शरीर ह्यामुळे जीव अगदी नको नकोसा होतो. परंतु…

April 11, 2024

जान्हवी आणि शिखर पहाडियाच्या नात्याला शिक्कामोर्तब, मैदानच्या स्क्रिनिंगला घातला प्रियकराच्या नावाचा नेकलेस (Janhvi Kapoor Confirms Dating Shikhar Pahariya, Wears Necklace with His Name )

गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या डेटिंगच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत होत्या.…

April 11, 2024

Are you overdoing the sexual act ?

Ever thought that someday you might need medical treatment for having sex? Hypersexuality issomething very…

April 11, 2024

फिल्म समीक्षा: खेल के ‘मैदान’ में अजय देवगन और निर्देशक अमित शर्मा का लाजवाब गोल… (Movie Review: Maidaan)

रेटिंगः *** हिंदी सिनेमा में खेल पर बहुत कम फिल्में बनी हैं, लेकिन यह भी…

April 10, 2024

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे यांच्या ‘ऊन  सावली’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर वर्ल्ड  डिजिटल प्रीमियर! (Bhushan Pradhan And Shivani Surve’s New Film Unn Sawali World Digital Premiere On Ott)

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ऊन सावली' या चित्रपटाला प्रेक्षकांचं महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळालं. कांद्या पोह्याच्या कार्यक्रमातून…

April 10, 2024
© Merisaheli