Marathi

मुंबईतील डब्बेवाल्यांच्या उपस्थितीत रंगला ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा खास खेळ (Marathi Film “Baipan Bhari Deva” Celebrated Its Super Success In The Presence Of Mumbai’s Dabbewallas)

केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट सरत्या वर्षातला बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेला मराठी चित्रपट ठरला आहे. ‘बाईपण भारी देवा’ प्रदर्शित होऊन आता अनेक महिने लोटले तरीदेखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नाही. अजूनही पुन्हा पुन्हा चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण उत्सुक दिसत आहेत.

आणि म्हणूनच चित्रपटाचे यश साजरं करत निर्माती माधुरी भोसले यांच्यातर्फे १६ डिसेंबर रोजी मुंबईत या सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. चित्रपटाचे निर्माते, कलाकार आणि संपूर्ण क्रू यावेळेस उपस्थित होते. विशेष म्हणजे मुंबईचे डब्बेवाले आपल्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळा म्हणून चित्रपट पाहण्यास आवर्जून उपस्थित होते. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आताही हा विशेष शो हाऊसफुल ठरला होता!

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटानं पहिल्या आठवड्यातच बाजी मारत १२.५ कोटींचा गल्ला जमवला होता. इतकंच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एका दिवसांत ६.१० कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. प्रदर्शनानंतर अवघ्या काही दिवसातच ‘बाईपण भारी देवा’नं नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेत. ७६व्या स्वातंत्र्यदिनी ७६.५ कोटीचा गल्ला जमवणारा २०२३ चा हा सुपरहीट चित्रपट ठरला आहे. आणि महत्वाचं म्हणजे मराठी चित्रपटाच्या इतिहासातील सर्वाधिक कलेक्शन करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.

शनिवारी पार पडलेल्या स्पेशल स्क्रिनिंगला तसेच चित्रपटाला एकंदरीत मिळालेल्या यशाबद्दल  निर्मात्या माधुरी भोसले म्हणतात की, “एमव्हीबी मीडियाच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम आणि कौतुक मिळाले याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. त्याच बरोबर मला केदार शिंदे सारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक आणि या ६ अत्यंत प्रतिभावान आणि खास कलाकार महिलांशी जोडले जाण्याचा अभिमान आहे. या चित्रपटात काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांचे आणि क्रूचे मनापासून खूप खूप आभार.

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट पहायला मिळाली.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

काव्य- उम्र बढ़ती जा रही है… (Poetry- Umra Badti Ja Rahi Hai…)

अब यही आवाज़ दिल कीधड़कनों से आ रही हैज़िंदगी कम हो रही हैउम्र बढ़ती जा रही…

April 24, 2024

Are you Sexually Compatible?

if it’s not just about occasional periods when a couple’s sex life is dull, then…

April 24, 2024

 मनिष पॉलने घेतली ४८ लाखांची नवीकोरी कार, म्हणाला नवं बाळ घरी आलं….(Maniesh Paul Buys Green Mini Cooper Worth Rs 48 Lakh)

लोकप्रिय टीव्ही होस्ट आणि अभिनेता मनीष पॉलने चमकदार हिरव्या रंगाची मिनी कूपर कार खरेदी केली…

April 24, 2024

अभिनेत्री राधिका मदनच्या हस्ते ‘स्मार्ट+’ सेवेचे उद्‌घाटन : घराघरातून मनोरंजनाचे नवीन मानक स्थापन (Actress Radhika Madan Launches ‘Smart +’: New Content Service In Entertainment Industry)

डायरेक्ट टू होम अर्थात्‌ डीटीएच उद्योगाचा पाया घालणाऱ्या डिश टीव्हीने आता मनोरंजन क्षेत्रात नवा पुढाकार…

April 24, 2024
© Merisaheli