Marathi

स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर ‘मुसाफिरा’ चे चित्रण : मराठीतला बिग बजेट चित्रपट (Marathi Movie “Musafira”Is The First Indian Movie Shot At The Isle Of Sky In Scottish Highlands)

आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांच्या ‘व्हिक्टोरिया’ या भयपटाने प्रेक्षकांना सुंदर स्कॉटलँडची सफर घडवल्यानंतर आता पुन्हा ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, गूझबम्प्स एंटरटेन्मेंट आणि नितीन वैद्य प्रॉडक्शनच्या ‘मुसाफिरा’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून अभिनेता आणि निर्माता म्हणून काम केल्यानंतर आता पुष्कर जोग ‘मुसाफिरा’च्या माध्यमातून पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

मैत्री हा विषय बॉक्स ऑफिसवर नेहमीच यशस्वी ठरला आहे. ‘मुसाफिरा’ हा चित्रपटही मैत्रीवर बेतलेला असून मैत्रीची नवीन परिभाषा यात अनुभवायला मिळणार आहे. या बिग बजेट मराठी चित्रपटाची खासियत म्हणजे स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित केलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरणार आहे.

‘मुसाफिरा’बद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, ” अलिकडे मराठी चित्रपटांनी चित्रीकरणासाठी भारताची सीमा ओलांडली आहे. त्यामुळे आता मराठी चित्रपटाचे परदेशात चित्रीकरण करणे नवीन नाही. मात्र एक पाऊल पुढे टाकत ‘मुसाफिरा’ने मराठी सिनेसृष्टीत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. निसर्गरम्य अशा स्कॉटिश हायलँड्सची सफर प्रेक्षकांची करमणूक द्विगुणित करेल हे नक्की. हा तरुणाईला आवडणारा विषय असला तरी हा एक कौटुंबिक आणि हृदयस्पर्शी चित्रपट आहे. ‘मुसाफिरा’चे चित्रीकरण पूर्ण झाले असून या वर्षाच्या अखेरीस ‘मुसाफिरा’ चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.”

आनंद पंडित, रूपा पंडित, पुष्कर जोग, नितीन वैद्य आणि सहनिर्मिती असलेल्या या बिग बजेट चित्रपटाची निर्मिती वैशाली शहा, राहुल व्ही. दुबे आणि डॉ. कादंबरी जेठवानी यांनी केली आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

मराठीतील विक्रमी चित्रपट ‘माहेरची साडी’चे निर्माते विजय कोंडके यांचा ३४ वर्षानंतर नवा चित्रपट ‘लेक असावी तर अशी’ (‘Lek Asavi Tar Ashi’ Is New Film Of Producer- Director Vijay Kondke : His Comeback After 34 Years Of Blockbuster Film ‘Maherchi Sadi’)

मोठमोठ्या कलाकारांना एकत्र घेऊन चांगल्या दर्जाचा सिनेमा बनवणं हे निर्माता दिग्दर्शकांसाठी मोठं आव्हान असतं. काही…

April 18, 2024

‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत स्मिता तांबेची वकिलाच्या भूमिकेत एन्ट्री (Actress Smita Tambe Enters As A Lawyer In “Man Dhaga Dhaga Jodte Nava” Serial)

स्टार प्रवाहवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत सार्थक-आनंदीचं नातं अतिशय नाजूक वळणावर आहे. काही…

April 18, 2024

वळवाचा पाऊस (Short Story: Valvacha Pause)

निशा नंदन वर्तक हा अचानक आलेला वळवाचा पाऊस !! अवंतिकेचा उदासपणा कुठच्या कुठे पळून गेला..…

April 18, 2024
© Merisaheli