Uncategorized

दाढीमुळे मिलिंद गुणाजीने नाकारला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ ; अजूनही करतो पश्चाताप! (Milind Gunaji Said No To Ddlj Because Of His Beard Actor Is Still In Regret)

शाहरुख खान आणि काजोलचा सुपरहिट चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (१९९५) मधील ‘कुलजीत’ची भूमिका परमीतच्या आधी मिलिंद गुणाजीला ऑफर करण्यात आली होती.

शाहरुख खान आणि काजोलचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा सिनेमा १९९५ मध्ये थिएटरमध्ये आला होता. या चित्रपटाने बरेच विक्रम मोडून आणि थिएटरमध्ये कमाई करून कल्ट क्लासिक चित्रपटांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे.

शाहरुख खान-काजोलच्या या चित्रपटात अमरीश पुरी, अनुपम खेर, फरीदा जलाल आणि परमीत सेठी यांच्यासह अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. पण तुम्हाला माहीत आहे का की, ‘कुलजीत’मधली परमीत सेठीची भूमिका पहिल्यांदा मिलिंद गुणाजीला ऑफर झाली होती, पण या अभिनेत्याने दाढीमुळे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ मधली ही भूमिका नाकारली होती.

मिलिंद गुणाजी यांनी सांगितले की, त्यांना ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मध्ये ‘कुलजीत’ची भूमिका ऑफर करण्यात आली होती, जी नंतर परमीत सेठीने साकारली होती. अभिनेता म्हणाला- ‘त्याला परमीत सेठीची भूमिका ऑफर करण्यात आली होती पण मला दाढी कापण्यास सांगण्यात आले. ती पात्राची गरज होती, पण मी त्यावेळी २-३ चित्रपट करत होतो, त्यामुळे दाढी कापू शकत नव्हतो. मग एका मोठ्या दिग्दर्शकाला नाही म्हणावं लागलं, खूप वाईट वाटलं आणि नंतर हा चित्रपट खूप गाजला.

मिलिंद गुणाजीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, दिलवाले दुल्हनिया सोडल्यानंतर तो शाहरुख खानसोबत देवदासमध्ये दिसला. मिलिंद गुणाजी यांनी देवदास, विरासत, एलओसी कारगिल, फिर हेरा फेरी, सीआयडी आणि रुद्र यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

कन्यादान फेम अमृता बने आणि शुभंकर एकबोटे अडकले विवाहबंधनात, फोटो व्हायरल ( Kanyadan Fame Amruta Bane And Shubhankar Ekbote Gets Married)

सन मराठीवर कन्यादान या मालिके वृंदा आणि राणाची भूमिका साकारून अभिनेता शुभंकर एकबोटे आणि अभिनेत्री…

April 21, 2024

कलाकारांच्या नाहक वाढत्या मागण्यांना वैतागली फराह खान, म्हणते यांना ४ व्हॅनिटी, जिम… ( Bollywood Celebrity Demands For Vanity Van… Farah Khan Revel The Truth)

फराह खानने तिच्या करिअरमध्ये 'मैं हूं ना' आणि 'तीस मार खान' सारखे चित्रपट केले. तिने…

April 21, 2024

फिल्म समीक्षा: प्यार और रिश्ते की ख़ूबसूरत अलग परिभाषा देती ‘दो और दो प्यार’ (Movie Review: Do Aur Do Pyar)

रेटिंग: *** ऐसा क्यों होता है कि जिस रिश्ते में हमें सबसे ज़्यादा जुड़ाव और…

April 20, 2024
© Merisaheli