Marathi

ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल ( Mithun Chakraborty Admitted in Hospital )

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या शनिवारी, 10 फेब्रुवारी रोजी सकाळी छातीत दुखायला लागले, त्यानंतर त्यांना कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिथुन चक्रवर्तीच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, अभिनेत्याला अस्वस्थ वाटत होते, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. ‘इंडिया टुडे’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात टीव्ही शो ‘सारेगापामा’च्या एपिसोडमध्ये मिथुन प्रमुख पाहुणे म्हणून दिसले होते. तिथे मुलगा नमाशी चक्रवर्तीने वडिलांना एक सुंदर व्हिडिओ मेसेज पाठवला होता, जो ऐकून मिथुन यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि ते भावूक झाले. त्यानंतर त्यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.

मिथुन चक्रवर्ती यांना यापूर्वीही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

याआधी 2022 मध्ये देखील मिथुन चक्रवर्तींचा हॉस्पिटलमधून एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यानंतर चाहते काळजीत पडले. त्यांच्याबद्दल अनेक प्रकारच्या अफवाही पसरवल्या गेल्या. त्यानंतर त्यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याने वडिलांच्या तब्येतीची माहिती दिली. वडिलांच्या किडनीमध्ये स्टोन असल्याचे त्याने सांगितले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिथुन चक्रवर्ती 73 वर्षांचे आहेत. त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. या अभिनेत्याने अनेक टीव्ही शोजही जज केले आहेत. विवेक अग्निहोत्रीच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात ते शेवटचे दिसले होते. याशिवाय त्यांनी ‘प्रोजापती’ आणि ‘काबुलीवाला’ या बंगाली चित्रपटांमध्येही काम केले. सध्या त्यांचा कोणताही प्रकल्प पाइपलाइनमध्ये नाही.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

शिवांगी जोशी आणि कुशल टंडन लवकरच अडकणार विवाहबंधनात? (Is Shivangi Joshi Getting Married to Kushal Tandon )

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवांगी जोशी आणि कुशल टंडन या दोघांनी बरसातें- मौसम प्यार का…

May 3, 2024

आगामी निवडणूकांबाबत किरण माने यांनी मांडलं स्वत:च मत ( Kiran Mane Share Post On Upcoming Election )

सगळं इस्कटून सांगतो... नीट समजून घ्या. एकशे सेहेचाळीस खासदार निलंबित केले या हुकूमशहांनी. त्यातले अठ्ठ्याहत्तर…

May 3, 2024

कहानी- दूरियों से नज़दीकियों तक  (Short Story- Duriyon Se Najdikiyon Tak)

अनुष्का चाहती थी कि मीतू स्वयं इस विषय में बात करें, परंतु मीतू तो मानो…

May 3, 2024
© Merisaheli