Entertainment Marathi

श्रीगणेशाला वंदन करणारी ‘गणराया’ ही लावणी प्रदर्शित : संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या ‘लावण्यवती’ अल्बमचा नवा प्रयोग (Music Composer Avadhoot Gupte Releases New Album With The Lavni Of Shree Ganesh)

लावणीवर ठेका धरायला, त्यात धुंद व्हायला अनेकांना आवडतं. असाच लावणीचा खजिना घेऊन अवधूत गुप्ते संगीतप्रेमींच्या भेटीला येणार आहेत. ‘लावण्यवती’ हा त्यांचा नवीन अल्बम आज भेटीला आला आहे. एकविरा म्युझिक तर्फे प्रदर्शित झालेल्या ‘लावण्यवती‘ ह्या अल्बमचा एक टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता.  यातील घुंगरांचा नाद, ढोलकीचा ताल आणि नर्तिकांच्या नजाकतींमुळे या अल्बमविषयीची उत्सुकता प्रचंड वाढली होती.

आता ह्या ‘लावण्यवती’तील पहिली लावण्यलतिका लावणीप्रेमींच्या भेटीला आली असून ‘गणराया’ ही श्रीगणेशाला वंदन करणारी पहिली लावणी प्रदर्शित झाली आहे.

ह्यात नृत्यांगना भार्गवी चिरमुले आपल्या अदाकारीने भुरळ घालताना दिसत आहे. व्हिडिओचे नृत्य दिग्दर्शन सिद्धेश दळवी ह्यांनी केले आहे. अवधूत गुप्ते ह्यांनी संगीत दिलेल्या ह्या गाण्याची शब्दरचना देखील अवधूत गुप्ते ह्यांचीच असून वैशाली सामंत ह्यांनी हे गाणे गायले आहे. अनुराग गोडबोले ह्यांनी संगीत संयोजन केले असून, गुरु पाटील ह्यांनी संकलित केलेल्या या अल्बमची निर्मिती गिरिजा गुप्ते यांची आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

मलायका अरोरा देखील करणार दुसरं लग्न, लग्नाची पत्रिका घेऊन पोहोचली पहिल्या पतीच्या घरी? (Malaika Arora Reached Her First Husband Arbaaz Khans House For Gave Her Marriage Card)

सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या मलायका हिच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरू आहे. अरबाज खान याच्यानंतर…

April 30, 2024

Invest Smart, Retire Rich

Struggling With Your Investments? Shreeprakash Sharma offers Help! Ragini realised yet another financial year was…

April 30, 2024

अधिपतीच्या आयुष्यात नवीन मास्तरीणबाईंची एण्ट्री, भुवनेश्वरीची नवी चाल, प्रोमो व्हायरल ( Zee Marathi Serial Tula Shikwin Changlach Dhada New Promo Viral )

तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत सध्या अक्षराने अधिपतीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. शाळेतील शिक्षण…

April 30, 2024
© Merisaheli