हळदीच्या पानातील नारळीभात (Narali Bhat)

हळदीच्या पानातील नारळीभात

साहित्य : 1 वाटी जुना बासमती तांदूळ, 1 वाटी ओला नारळाचा चव, आवश्यकतेनुसार तूप, स्वादानुसार साखर, 2-3 लाल मिरच्या, अर्धा टीस्पून जिरं, पाव टीस्पून हिंग,
8-10 कडिपत्त्याची पानं, अर्धा टीस्पून चणा डाळ, अर्धा टीस्पून उडीद डाळ, स्वादानुसार मीठ, 2 केशरकाड्या, काही हळदीची पानं, लिंबाची फोड, सजावटीसाठी काजू आणि बेदाणे.

कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन अर्धा तास भिजत ठेवा. पातेल्यामध्ये तूप गरम करत ठेवा. त्यात गरम पाणी आणि मीठ घाला. पाणी उकळल्यावर त्यात तांदूळ घाला आणि 80 टक्के शिजवा. भात आचेवरून उतरवून ताटामध्ये पसरवून ठेवा.
आता दुसर्‍या पॅनमध्ये तूप गरम करा. त्यात जिरं, हिंग, कडिपत्ता, चणा डाळ, उडीद डाळ यांची खमंग फोडणी करा. त्यात नारळाचा चव, साखर आणि भात एकत्र करा. त्यात दुधात मिसळलेलं केशर घालून झाकण ठेवा आणि 5 मिनिटं वाफ आणा. आता कुकरमध्ये पाणी उकळून एका डब्यात हळदीची पानं लावा आणि त्यावर हा भात घाला. 5 मिनिटं शिटी न लावता भात वाफवा. सर्व्हिंग प्लेटमध्ये ताजी हळदीची पानं मांडून, त्यावर हा भात वाढा. वरून लिंबूरस घाला. काजू-बेदाणे व कोथिंबीरने सजवा.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

राइस कॉर्नर: काजू वाला कोरिएंडर राइस (Rice Corner: Kaju Wala Coriander Rice)

लंच में हर बार प्लेन राइस और जीरा राइस खाकर बोर हो गए हैं, तो…

April 21, 2024

कैरी व कांद्याचं लोणचं (Kairi And Onion Lonche)

साहित्य : 1 मध्यम आकाराची कैरी तासून किसलेली (साधारण अर्धा कप), 1 कप बारीक चिरलेला…

April 20, 2024

घोळ लिंबू आणि पाचक लिंबू (Ghol Limbu And Pachak Limbu)

घोळ लिंबू आणि पाचक लिंबू साहित्यः 1 डझन मोठी लिंबे, पाव किलो मीठ.कृतीः रसाळा लिंबे…

April 19, 2024

लिंबाचे तिखटगोड लोणचे (Tangy Lemon Pickles)

साहित्यः 1 डझन मोठी लिंबे, अर्धी वाटी लाल तिखट, दीड वाटी मीठ, 1 चमचा मेथी,…

April 18, 2024

Mirchi Vada

Ingredients7-8 green chilli (big size), 300 gm boiled mashed potatoes, 1 tsp red chilli powder,…

April 17, 2024

ब्रेकफास्ट कॉर्नर: तड़का मूंगदाल इडली (Breakfast Corner: Tadka Moongdal Idli)

ब्रेकफास्ट में आज कुछ हेल्दी और टेस्टी बनाते हैं यानि तड़के वाली मूंगदाल इडली। इसे…

April 17, 2024
© Merisaheli