Uncategorized

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्या आंबेकर – सुरेश वाडकर यांनी गायलेल्या ‘हृदय में श्रीराम’ गाण्याची घेतली दखल (Narendra Modi Appreciated Arya Ambekar Suresh Wadkars Song Hrudaya Mein Shriram)

अयोध्येत २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. संपूर्ण देशाला या सोहळ्याची उत्सुकता लागली असून संपूर्ण वातावरण राममय झाले आहे. या सोहळ्यासाठी प्रत्येक रामभक्त आपापल्या परीने यात योगदान देत आहे. अशातच अनेक गायक- संगीतकार या सोहळ्यानिमित्ताने श्रीरामाला समर्पित गाणं लोकांच्या भेटीला आणत आहेत. असेच एक गीत सध्या चर्चेत आले आहे.

श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या शुभप्रसंगी संगीतकार सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेले आणि कवी संदीप खरे यांनी लिहिलेले ‘हृदय में श्रीराम है’ हे भक्ती गीत भाविकांच्या भेटीला आले आहे. सुप्रसिद्ध गायक पद्मश्री सुरेश वाडकर आणि गायिका आर्या आंबेकर यांनी हे गीत गायले आहे. विशेष म्हणजे याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर हे गाणे त्यांनी शेअर केले आहे.

पंतप्रधान मोदींनी आर्या आंबेकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेल्या गाण्याचं कौतुक केलंय. नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे की, “अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण देश भगवान श्रीरामाच्या भक्तीच्या रंगात रंगला आहे. सुरेश वाडेकर आणि आर्या आंबेकर यांनी त्यांच्या मधुर सुरांमध्ये ही भावना व्यक्त केली आहे.” असं म्हणत नरेंद्र मोदींनी आर्या आबंकेर – सुरेश वाडकर यांनी गायलेल्या ‘हृदय में श्रीराम’ गाण्याची लिंक शेअर केली आहे.

पंतप्रधान मोदींनी गाण्याची दखल घेतल्याबद्दल आर्या आंबेकर पोस्ट शेअर करत म्हणाली, “जय श्रीराम. ज्यांच्या कार्याने मी प्रभावित होते असे माननीय पंतप्रधान मोदी यांच्या या पोस्टने माझ्या डोळ्यात पाणी आलं. असा पराकोटीचा आनंद कधीच अनुभवला नाही.. हा आनंद फक्त शब्दात मांडता येणार नाही!!! आमचा हा खारीचा वाटा, ही सांगीतिक सेवा श्रीराम चरणी रुजू झाली. प्रत्यक्ष श्रीरामाचा आशीर्वाद जणू पोचला, अशी आमची भावना निर्माण झाली.

प्रिय मोदीजी, २२ जानेवारीला मोठा दिवस साजरा करण्यासाठी आमच्या छोट्याशा योगदानाची दखल घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. खरेच, यापेक्षा मोठे कोणतेही प्रोत्साहन असू शकत नाही.

तुमच्या पावलांवर पाऊल ठेवण्याचा, संगीताच्या माध्यमातून, माझ्या स्वतःच्या मार्गाने देशसेवा करण्याचा सदैव प्रयत्न करेन. मोदीजी, अत्यंत आदराने नतमस्तक होऊन तुमच्या चरणांना स्पर्श करून तुमचा आशिर्वाद घेते.”

या गाण्याचे संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी भावना व्यक्त करत म्हणाले, “आपल्या गाण्याची माननीय पंतप्रधान नरेन्द्र मोदीजींनी दखल घेणं आणि कौतुक करणं …..हा खूप खूप समाधानाचा क्षण. जय श्रीराम.”

याशिवाय हे गाणं गाणारे गायक सुरेश वाडकर म्हणाले, “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांना समर्पित आमचे भजन शेअर केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. तुमच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या श्री राम मंदिराच्या उद्घाटन आणि प्राण-प्रतिष्ठा महोत्सवासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे. जो प्रत्येकाच्या जीवनातील एक दिव्य, अविस्मरणीय आणि अद्वितीय आणि पवित्र क्षण बनेल. जय जय श्री राम! देवा सियावर रामचंद्राचा जय !”

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

पेट संबंधी तमाम तकलीफों से राहत के लिए 11 पावरफुल योगासन (11 Powerful Yoga Practice for Relieving All Stomach Issues)

पाचन संबंधी परेशानियां कॉमन हैं, जिसमें गैस और कब्ज़ की समस्या होना आम बात है.…

June 25, 2025
© Merisaheli