Marathi

‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा पार्ट २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार (Navra Mazha Navsacha 2)

मराठी सिनेसृष्टीचे ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी अभिनीत २००४ साली प्रदर्शित झालेला नवरा माझा नवसाचा या चित्रपटाने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. आजही या चित्रपटाला चांगली पसंती मिळते. या चित्रपटातील कलाकार, गाणी आणि संवाद सर्वकाही प्रेक्षकांना प्रचंड आवडले. हा चित्रपट एकदा नाही तर अनेकदा अनेकांनी पाहिला. या चित्रपटाने एकेकाळी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. आता जवळपास २० वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग येत असल्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे. मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांनी ही घोषणा केली आहे.

ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. “‘नवरा माझा नवसाचा २’ शुटिंगला उद्यापासून सुरुवात.. तुमचे आशीर्वाद असेच राहु द्या” या आशयाचे कॅप्शन त्यांनी सोशल मीडियावर दिले आहे.

सोशल मीडियावर जयवंत वाडकर यांच्या ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाची पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. एका यूजरने ‘चित्रपटात आम्हाला ओरिजनल स्टारकास्ट हवी’ अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका यूजरने ‘प्रदीप पटवर्धन यांची आठवण यईल’ अशी भावूक कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने अशोक मामा असतील तर सिनेमा सुपरहिट होईल असे म्हटले आहे. चौथ्या एका यूजरने आजही पहिला भाग उत्साहात पाहतो, खूप खूप शुभेच्छा असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिन पिळगावकर यांनी २००४ मध्ये ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘नवरा माझा नवसाचा २’ असं असणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून म्हणजे ५ फेब्रुवारीपासू सुरूवात होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती देखील सचिन पिळगावकर हेच करणार आहेत.

‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, रीमा लागू, विजय पाटकर, कुलदीप पवार, सतिश तारे, प्रदीप पटवर्धन, अतुल परचुरे, आनंद अभ्यंकर, विकास समुद्रे, अली असगर, सुनिल तावडे, वैभव मांगले, मधुराणी गोखले, जॉनी लिव्हर, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, जयवंत वाडकर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. आता चित्रपटाच्या पार्ट २ मध्ये कोण-कोण कलाकार असणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

मराठीतील विक्रमी चित्रपट ‘माहेरची साडी’चे निर्माते विजय कोंडके यांचा ३४ वर्षानंतर नवा चित्रपट ‘लेक असावी तर अशी’ (‘Lek Asavi Tar Ashi’ Is New Film Of Producer- Director Vijay Kondke : His Comeback After 34 Years Of Blockbuster Film ‘Maherchi Sadi’)

मोठमोठ्या कलाकारांना एकत्र घेऊन चांगल्या दर्जाचा सिनेमा बनवणं हे निर्माता दिग्दर्शकांसाठी मोठं आव्हान असतं. काही…

April 18, 2024

‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत स्मिता तांबेची वकिलाच्या भूमिकेत एन्ट्री (Actress Smita Tambe Enters As A Lawyer In “Man Dhaga Dhaga Jodte Nava” Serial)

स्टार प्रवाहवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत सार्थक-आनंदीचं नातं अतिशय नाजूक वळणावर आहे. काही…

April 18, 2024

वळवाचा पाऊस (Short Story: Valvacha Pause)

निशा नंदन वर्तक हा अचानक आलेला वळवाचा पाऊस !! अवंतिकेचा उदासपणा कुठच्या कुठे पळून गेला..…

April 18, 2024

आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळींनी शेअर केल्या लक्ष्या मामा, रमेश भाटकर अन् विजय चव्हाण यांच्या आठवणी ( Aai kuthe Kay Karte Fame Milind Gawli Share Lkshmikant Berde, Ramesh Bhatkar And Vijay Chavan Memories)

लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरमराठी चित्रपट व नाट्य सृष्टीतले दिग्गज असे कलाकार, ज्यांच्याबरोबर मला…

April 18, 2024
© Merisaheli