Marathi

घरी आलेल्या पाहुण्यांच्याबाबतीत प्रकर्षाने पाळला जातो हा नियम, खान ब्रदर्सनी सांगितलं सत्य (No One go hungry from Salman Khan’s house, father Salim Khan has made these rules for the kitchen)

सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या दातृत्वाचे अनेक किस्से बरेचदा ऐकायला मिळतात. भाईजान नेहमी लोकांच्या मदतीसाठी पुढे असतो. तो अनेकदा त्याच्या औदार्य आणि उदात्त कृत्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहतो. केवळ भाईजानच नाही तर त्याचे संपूर्ण कुटुंब नेहमीच मदतीसाठी तत्पर असतात.

स्वयंपाकघरात कधीही कमतरता नसते

कुटुंबाबद्दलचे सत्य अरबाज खान आणि सोहेल खान यांनी पॉडकास्टमध्ये शेअर केले होते. पॉडकास्टमध्ये दोघांनीही कुटुंबाशी संबंधित अनेक मनोरंजक किस्से शेअर केले. किचनशी संबंधित एक नियमही सांगितला. यामध्ये सोहेलने सांगितले होते की, “माझ्या आईच्या किचनमध्ये जेवण कधीच संपत नाही. मग ते आमचे शालेय मित्र असोत, कॉलेजचे मित्र असोत किंवा वडिलांचे मित्र असोत, माझ्या आईने कधीही कोणालाही जेवल्याशिवाय जाऊ दिले नाही. आमचे स्वयंपाकघर जरी लहान असले तरी ते भरलेले असायचे. तेव्हा फारसे पैसे नव्हते, पण आम्हाला कशाचीही कमतरता जाणवली नाही.”

कुरियर बॉयला जेवण दिले जाते, बरकतचा नियम पाळला जातो.

अरबाज म्हणला, “आमच्या घराला खूप आशीर्वाद आहेत आणि कदाचित या आशीर्वादाचा परिणाम आहे की जो कोणी आमच्याकडे येतो, मग तो कोणत्याही हेतूने का असेना, त्याला जेवायला आवर्जुन विचारले जाते. उदाहरणार्थ, जेव्हा कुरिअर येतो, विशेषत: जेवणाच्या वेळी, त्याला विचारले जाते की त्याने काही खाल्ले आहे का की काही खाणार? त्याने खाल्ले असले तरी प्रत्येकाला जेवायला विचारायचे हा आमच्या घरात नियम आहे.”

कर्मचाऱ्यांसाठीही तेच जेवण तयार केले जाते.

अरबाज पुढे म्हणतो, “पापा एक म्हण सांगतात की तुमच्या घरी पाहुणे येतात आणि त्यांच्या नशिबात असेल ते अन्न खातात आणि असे करून ते तुमच्यावर उपकार करतात. हा आमच्या घराचा नियम आहे, , परंपरा आहे की कोणीही भूकेले जाऊ नये. आणि पप्पा नेहमी हा नियम पाळायला सांगतात. आमच्या घरी स्टाफलाही तेच जेवण दिले जाते जे संपूर्ण कुटुंबासाठी तयार केले जाते, मग तो ड्रायव्हर असो किंवा इतर कर्मचारी.”

बिग बॉसच्या स्पर्धकांनाही सलमानच्या घरातून जेवण मिळतं

सलमान खानच्या घरातील जेवण संपूर्ण इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे, विशेषत: प्रत्येकजण त्याच्या घरातील बिर्याणीचे वेड आहे. सलमान जेव्हा बिग बॉस होस्ट करतो तेव्हाही स्पर्धकांसाठी वीकेंडला जेवण त्याच्या घरातून येते.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

नाती टिकविण्यासाठी वेळ कसा काढाल? (How Do You Find Time To Maintain A Relationship?)

आजकालच्या जोडप्यांना एकमेकांसाठी वेळ नाही-फुरसत नाही. घर-ऑफिस, पोरंबाळं, त्यांचं संगोपन आणि घरातील रामरगाडा यांच्या कचाट्यात…

April 12, 2024

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओप्लास्टी, आता प्रकृती स्थिर (Sayaji Shine Hospitalied, Actor Goes Angioplasty In Satara)

आपल्या खणखणीत अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.…

April 12, 2024

महेश कोठारे यांनी केली ‘झपाटलेला ३’ची घोषणा (Director Mahesh Kothare Announces Zapatlela-3)

अभिनेते महेश कोठारे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला 'झपाटलेला' हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. आता…

April 11, 2024

बुरे दिन वापस दे दो…. किरण मानेंची पोस्ट चर्चेत ( Kiran Mane Share Post For Current Situation In Maharashtra)

कुठे कुठला उमेदवार हवा होता-नको होता, या वादात आपण सर्वसामान्य माणसांनी अडकायला नको. महाराष्ट्रात या…

April 11, 2024
© Merisaheli