Marathi

‘खतरों के खिलाडी’ फेम अभिनेत्री सना मकबूलने जागतिक हिपॅटायटिस दिनाच्या निमित्ताने स्वानुभव सांगत यकृताचे आरोग्य जपण्याचा दिला संदेश (On The Occasion Of World Hepatitis Day,” Khatron ke Khiladi” Fame Actress Sana Maqbool Khan Emphasizes The Importance of Liver Health By Sharing Own Experience)

काल सर्वत्र जागतिक हिपॅटायटिस दिन साजरा केला गेला. त्या निमित्ताने ‘खतरों के खिलाडी’ फेम अभिनेत्री सना मकबूल खानने आपले अनुभव कथन करत यकृताचे आरोग्य राखण्याचे महत्त्व विशद केले. यकृताच्या आजाराशी आपण कशी झुंज दिली, हे सनाने सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलने यकृताचे आरोग्य निरोगी ठेवण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी तरुणांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत सांगितले. विविध चित्रपट आणि मालिकांची अभिनेत्री सना, सध्या कलर्स टी.व्ही. वरील डॉ. आलियाची भूमिका करत आहे.

सना खानला २०१९ साली यकृताच्या लक्षणीय फायब्रोसिसह ऑटोइम्युन हिपॅटायटिस झाल्याचे आढळून आले, त्याबद्दल तिने सांगितले की, “या रोगाबाबत मी डॉ. आकाश शुक्ला आणि एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या टीमची आभारी आहे. त्यांनी मला शारीरिक व मानसिकरित्या या आजाराशी लढायला मदत केली. या संदर्भात मला सांगायचे आहे की, विशेषतः तरुणांनी त्यांचे आरोग्य कधीही गृहित धरू नये. लवकर निदान व वेळेवर उपचारासाठी जागरूकता महत्त्वाची आहे.”

या आजारानंतर निरोगी व फिट होऊन सनाने २०२१च्या खतरों के खिलाडी मध्ये भाग घेतला व तिने या कार्यक्रमात ७ वा क्रमांक मिळवला.

हॉस्पिटलने आयोजित केलेल्या कार्यशाळेविषयी बोलताना सर एचएन रिलायन्स रुग्णालयाचे हिपॅटोलॉजी डायरेक्टर डॉ. आकाश शुक्ला म्हणाले, “जागतिक हिपॅटायटिस दिवसाच्या निमित्ताने आम्ही यकृताच्या आजाराच्या कारणांबद्दल जनजागृती करत आहोत. यकृताच्या दुखापतीचे एक सामान्य कारण अल्कोहोल असले तरी यकृतावर परिणाम करणारा हा एकमेव घटक नाही. सिरोसिस सह बहुतेक यकृत रोग बरे केले जाऊ शकतात. विशेषतः प्रारंभिक अवस्थेत निदान झाल्यास.”

एका अभ्यासानुसार, जागतिक स्तरावर, यकृताच्या आजारांमुळे दरवर्षी सुमारे २० लाख लोक मृत्यू पावतात. भारतामध्ये हा आजार साथीच्या रोगाप्रमाणे वेगाने पसरत आहे. प्रत्येक ५ प्रौढांपैकी १ जण बाधित होत आहे. सदर कार्यशाळेत रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तरंग ग्यानचंदानी यांनी मार्गदर्शन केले व “आपण सर्वांनी एकजुटीने केवळ हिपॅटायटिसच नव्हे तर यकृताच्या सर्व प्रकारच्या आजारांशी लढण्याची शपथ घेऊया,” असे सांगितले.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

तिलचट्टा- एक अनोखी प्रेम कथा (Hasay Katha- Tilchatta- Ek Anokhi Prem Katha)

तिल्लाट ने उसके ठीक सामने आ कर अपनी कंपाउंड आइज़ से (लेखिका द्वारा बायोलॉजी में…

May 4, 2024

कडक उन्हाळ्यात केसांचे संरक्षण करण्याचे तंत्र (How To Protect Your Hair In This Hot Hot Summer)

उन्हाळ्याच्या आगमनाने आपल्या केसांना सूर्य आणि प्रदूषणाच्या तीव्र परिणामांपासून वाचवण्याचे आव्हान असते. उष्णता, आर्द्रता आणि…

May 4, 2024

सलमानच्या गोळीबार प्रकरणात आरोपीने केली आत्महत्या, कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घ्यायला दिला नकार (Salman Khan Firing Case criminal Anuj Tahpan Family Seek Cbi Refuse To Take Deadbody)

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर १४ एप्रिल रोजी झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात अटक झालेल्या आरोपी…

May 4, 2024
© Merisaheli