कांद्याचे लोणचे (Onion Pickle And Sweet Lemon Pickle)

कांद्याचे लोणचे
साहित्यः 4 मोठे कांदे, 1 लसूण गड्डा, 2 मध्यम कैर्‍या, 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, अर्धी वाटी तेल, मोठा आल्याचा तुकडा, चवीनुसार मीठ व साखर.
कृतीः कैर्‍या धुऊन, पुसून त्यांच्या आवडीनुसार फोडी कराव्यात. त्यांना हळद, मीठ लावून ते तुकडे उन्हात ठेवावेत. कांदे किसून घ्यावेत. लसूण सोलून ठेचून घ्यावी. कांदा, लसूण तेलात परतून घ्यावी. (कुरकुरीत करू नये.) दुसर्‍या कढईत तेल गरम करावे. त्यात हळद, तिखट, साखर, किसलेले आले घालावे. चांगले हलवावे. नंतर त्यात कांदा, लसूण मिश्रणही घालावे. शेवटी कैरीच्या फोडी घालाव्यात. नंतर थंड झाल्यावर बरणीत भरावे.

लिंबाचे गोड लोणचे (Lemon Pickle
साहित्यः 6 लिंबे, लिंबाच्या फोडींच्या निम्मी साखर, अर्धा चमचा तिखट, 1 चमचा मीठ, आल्याचा तुकडा.
कृतीः लिंबाच्या बारीक बारीक फोडी कराव्यात. आल्याचा वरचा भाग खरडून काढून त्याचे बारीक तुकडे करावेत. लिंबे, आले, साखर व मीठ एकत्र करून बरणीत भरून ठेवावे. बरणीच्या तोंडाला फडके बांधून तीन-चार दिवस उन्हात ठेवावे. मुरल्यानंतर त्यात तिखट घालावे.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

Malpua

Ingredients100 gm maida, 500 gm wheat flour, 1 tsp powdered green cardamom, 1 cup ghee,…

April 23, 2024

कॉन्टिनेंटल ट्रीट- स्पिनेच क्वेसाडिलास (Continental Treat : Spinech Quesidillas)

रोज-रोज देसी खाना खा कर बोर हो गए हैं, तो चलिए आज कॉन्टिनेंटल फूड बनाते…

April 23, 2024

लिंबाचे तिखट लोणचे आणि सालीचे लोणचे (Limbache Tikhat Lonche And Saliche Lonche)

लिंबाचे तिखट लोणचेसाहित्यः 50 रसरशीत लिंबे, 350 ग्रॅम लाल मिरच्या, 125 ग्रॅम हळद, 200 ग्रॅम…

April 22, 2024

राइस कॉर्नर: काजू वाला कोरिएंडर राइस (Rice Corner: Kaju Wala Coriander Rice)

लंच में हर बार प्लेन राइस और जीरा राइस खाकर बोर हो गए हैं, तो…

April 21, 2024

कैरी व कांद्याचं लोणचं (Kairi And Onion Lonche)

साहित्य : 1 मध्यम आकाराची कैरी तासून किसलेली (साधारण अर्धा कप), 1 कप बारीक चिरलेला…

April 20, 2024

घोळ लिंबू आणि पाचक लिंबू (Ghol Limbu And Pachak Limbu)

घोळ लिंबू आणि पाचक लिंबू साहित्यः 1 डझन मोठी लिंबे, पाव किलो मीठ.कृतीः रसाळा लिंबे…

April 19, 2024
© Merisaheli