Marathi

पलक तिवारीला आठवला तो त्रासदायक काळ म्हणाली, मी कुरुप दिसावी म्हणून माझी आई…(Palak Tiwari Reveals why Her Mom Shweta Tiwari Chopped Her Hair To Make Her Look Uglier )

पलक तिवारीने सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याआधी हार्डी संधूसोबतच्या तिच्या बिजली गाण्यानेही खूप चर्चा केली. श्वेता तिवारीची लाडकी मुलगी पलक सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबतच्या नात्यामुळे ती अनेकदा चर्चेत असते.

गेल्या काही दिवसांत दोघेही एकाच ठिकाणी स्पॉट झाले होते. दरम्यान, पलकने एक धक्कादायक खुलासा केला आहे. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत पलकने सांगितले की, माझे किशोरवयीन काळ खूपच खराब होता. त्यावेळी माझी आई स्वतः शॉकमध्ये होती आणि वाईट टप्प्यातून जात होती. दरम्यान, मला खोटे बोलण्याची सवय लागली होती, पण मी पकडले जायचे. आई म्हणायची की २ तासात पकडली जातेस माहित आहे तरीही खोटं का बोलते.

तेव्हा मी १५-१६ वर्षांचा होते आणि माझा एक शाळेतला बॉयफ्रेंडही होता. आम्हा दोघांना मॉलमध्ये फिरायला खूप आवडायचं. एकदा आई शहरात नव्हती आणि मी आईला सांगितले की मी लपाछपी खेळायला खाली जात आहे आणि मी मॉलमध्ये गेले, पण आईला कळले आणि तिला खूप राग आला.

गंमत म्हणजे त्या काळी आई मला म्हणायची की मी तुला गावी पाठवते, तुझे केस कापून आणते. मी कुरूप दिसावे म्हणून माझ्या आईने माझे केस कापले होते जेणेकरून मी कोणाला डेट करू नये.

पलक तिवारी ही श्वेता आणि राजा चौधरी यांची मुलगी आहे. श्वेताने राजावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आणि त्यानंतर दोघे वेगळे झाले. काही काळानंतर श्वेताने अभिनव कोहलीसोबत लग्न केले आणि दोघांना एक मुलगा आहे. मात्र अभिनवसोबतही श्वेताचे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि दोघे वेगळे झाले.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

टाइगर श्रॉफ-  मैं कभी भी इसकी भरपाई नहीं कर पाऊंगा… (Tiger Shroff- Main Kabhi Bhi Iski Bharpai Nahi Kar Paunga…)

एक्शन हीरो के रूप में अपना एक अलग मुक़ाम बनाया है टाइगर श्रॉफ ने. उनसे…

April 17, 2024

मुलांनी लिव्ह इनमध्ये राहण्याच्या झीनम अमानच्या विधानावरुन जुंपले शीतयुद्ध, सायरा बानू आणि मुमताज यांच्या प्रतिक्रिया चर्चेत ( After Mumtaz, Now Saira Banu Speaks On Zeenat Aman’s Advocacy For Live-In Relationships)

जेव्हापासून झीनत अमानने सोशल मीडियावर प्रवेश केला, तेव्हापासून त्या तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाल्या आहे. झीनत…

April 17, 2024

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर प्रदर्शित (‘Swargandharva Sudhir Phadke’ Trailer Is Out)

मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून मराठी घराघरांत आणि मनामनात पोहोचलेलं एक अजरामर नाव म्हणजे स्वरगंधर्व…

April 17, 2024

रामनवमीच्या निमित्ताने अरुण गोविल यांनी केली कन्यापुजा ( Arun Govil performs Kanya Pujan, Washes Feets Of Little Girls, Feeds Them, Wishes Fans On Ram Navami )

रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये श्री रामची भूमिका करून लोकांची मने जिंकणाऱ्या अरुण गोविल (टीव्ही राम…

April 17, 2024
© Merisaheli