Marathi

दिग्दर्शकाने केलेल्या अपमानाचा बदला पल्लवी जोशींनी राष्ट्रीय पुरस्कार जिंकून पूर्ण केला ( Pallavi Joshi Takes Revenge Of Director Who Insult Her On Set By Winning National Award)

लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या पल्लवी यांनी रंगमंचापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या कामाप्रती असलेल्या समर्पणाचे आणि मेहनतीचे फळ म्हणून त्या आज या पदावर उभ्या आहेत. मात्र, त्यांचा प्रवास इतका सोपा नव्हता. एकदा तर पल्लवी यांचा दिग्दर्शकाने जाहीर अपमान केला होता.

पल्लवी जोशी यांनी ‘बदला’ आणि ‘आदमी सडक का’ सारख्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर ‘पनाह’, ‘तहलका’ आणि ‘सौदागर’सारखे अनेक चित्रपट केले, ज्यामध्ये काम करताना अभिनेत्रीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पल्लवी ९० च्या दशकात अनेक टीव्ही शोमध्येही दिसल्या होत्या. २०२२ मध्ये त्यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याद्वारे त्यांनी इंडस्ट्रीत पुनरागमन केले. या चित्रपटाची निर्मिती पल्लवी जोशीचे पती विवेक अग्निहोत्री यांनी केली होती.

एका मुलाखतीत खुलासा केला होता की, काही वर्षांपूर्वी एका दिग्दर्शकाने सेटवर तिचा अतिशय वाईट पद्धतीने अपमान केला होता. पल्लवी म्हणाल्या, ‘माझ्या दिग्दर्शकाला माझा खूप त्रास व्हायचा. त्याला माझा मेकअप, केस, स्टाइल आणि माझा अभिनयही आवडचा नाही. सेटवर तो नेहमी मला शिव्या द्यायचा आणि अपमान करायचा.

‘दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार, मला अभिनय कसा करावा हे माहित नव्हते. तो म्हणायचा की मी चांगली अभिनेत्री नाही. मी खूप फालतू सीन दिला आहे. सुरुवातीला मला वाटले की हा सगळा विनोद आहे पण नंतर मला समजले की तो माझा अपमान करत आहे.” अभिनेत्रीने सांगितले की, त्याचे बोलणे ऐकून मी सेटवरच रडू लागली. तेव्हा मला वाटू लागलेले की अभिनय ही आपल्यासारख्यांची गोष्ट नाही.

दिग्दर्शकाच्या बोलण्याने तेव्हा त्यांना फार वाईट वाटलेले, पण त्या घटनेनंतर तीन वर्षांनी म्हणजे १९९४ मध्ये त्यांनी ‘वो छोकरी’ हा चित्रपट केला. या चित्रपटासाठी अभिनेत्रीला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार जिंकल्याने त्यांना खात्री पटली की त्या अभिनयासाठी बनलेल्या आहेत.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनिल कपूर यांच्या या भूमिकेची भुरळ ( Maharashtra CM Eknath Shinde Praises Anil Kapoor Roll In Nayak Movie)

मेगास्टार अनिल कपूरने त्याच्या कारकिर्दीतील काही अविस्मरणीय भूमिका केल्या आहेत आणि त्यातील एक म्हणजे त्याचा…

April 27, 2024

डर्टी पिक्चरनंतर विद्या बालननला लागलेली सिगरेट पिण्याची सवय, अभिनेत्रीनेच सांगितला किस्सा  (Vidya Balan was addicted to smoking after The Dirty Picture: Actress reveals)

विद्या बालन सध्या तिच्या 'दो और दो प्यार' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेत्रीने…

April 27, 2024

चार दिवसांपासून बेपत्ता आहे तारक मेहतामधला सोढी, वडीलांनी केली पोलिसांत तक्रार (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Actor Gurucharan Singh Missing For 4 Days, Police got CCTV footage)

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे माजी रोशन सिंग सोधी यांच्याबद्दल…

April 27, 2024
© Merisaheli