पनीर काजू कोफ्ता लबाबदार ( Paneer Kaju Kofta)

पनीर काजू कोफ्ता लबाबदार


साहित्य : कोफ्त्यासाठी : 2 उकडलेले बटाटे, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून गरम मसाला पूड, 2 टीस्पून कॉर्नफ्लॉवर, चवीनुसार मीठ, 2 टीस्पून काजूचे तुकडे, तळण्यासाठी तेल.

लबाबदारसाठी : 2 टोमॅटो (प्युरी करून), 2 टेबलस्पून काजू पेस्ट, 1 कांदा (बारीक चिरून), अर्धा टीस्पून जिरे, 2 तमालपत्र, 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट, 1 टीस्पून धणे पूड, अर्धा टीस्पून गरम मसाला, 2 टीस्पून तूप, चवीनुसार मीठ, गार्निश करण्यासाठी कोथिंबीर (बारीक चिरून).

कृती : कोफ्त्यासाठीचे सर्व साहित्य एकत्र करून त्याचे कोफ्ते तयार करा व गरम तेलात तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्या. ग्रेव्हीसाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरे व नंतर तमालपत्र घाला. त्यात कांदा घालून परतवून घ्या. नंतर आले-लसूण पेस्ट, काजू पेस्ट, टोमॅटो प्युरी, गरम मसाला, दही, मीठ व धणे पूड घालून मध्यम आचेवर परतवा. नंतर त्यात 2 कप पाणी घालून उकळी येऊ द्या. ग्रेव्ही तयार झाल्यावर त्यात कोफ्ते घाला व सर्व्ह करा.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

राइस कॉर्नर: काजू वाला कोरिएंडर राइस (Rice Corner: Kaju Wala Coriander Rice)

लंच में हर बार प्लेन राइस और जीरा राइस खाकर बोर हो गए हैं, तो…

April 21, 2024

कैरी व कांद्याचं लोणचं (Kairi And Onion Lonche)

साहित्य : 1 मध्यम आकाराची कैरी तासून किसलेली (साधारण अर्धा कप), 1 कप बारीक चिरलेला…

April 20, 2024

घोळ लिंबू आणि पाचक लिंबू (Ghol Limbu And Pachak Limbu)

घोळ लिंबू आणि पाचक लिंबू साहित्यः 1 डझन मोठी लिंबे, पाव किलो मीठ.कृतीः रसाळा लिंबे…

April 19, 2024

लिंबाचे तिखटगोड लोणचे (Tangy Lemon Pickles)

साहित्यः 1 डझन मोठी लिंबे, अर्धी वाटी लाल तिखट, दीड वाटी मीठ, 1 चमचा मेथी,…

April 18, 2024

Mirchi Vada

Ingredients7-8 green chilli (big size), 300 gm boiled mashed potatoes, 1 tsp red chilli powder,…

April 17, 2024

ब्रेकफास्ट कॉर्नर: तड़का मूंगदाल इडली (Breakfast Corner: Tadka Moongdal Idli)

ब्रेकफास्ट में आज कुछ हेल्दी और टेस्टी बनाते हैं यानि तड़के वाली मूंगदाल इडली। इसे…

April 17, 2024
© Merisaheli