Marathi

लहान मुलाच्या आयुष्याचा अविस्मरणीय प्रवास : ‘जर्नी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित (Poster Released Of “Journey” : New Marathi Film Depicts The Extraordinary Life Journey Of A Young Boy)

सचिन दाभाडे फिल्म प्रस्तुत, सचिन जीवनराव दाभाडे निर्मित, दिग्दर्शित ‘जर्नी’ चित्रपट येत्या सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. नात्याचा आणि आयुष्याचा अर्थ शिकवणाऱ्या या ‘जर्नी’मध्ये शुभम मोरे, माही बुटाला, निखिल राठोड या बालकलाकारांची प्रमुख भूमिका असून या व्यतिरिक्त या चित्रपटात शंतनू मोघे, शर्वरी जेमेनीस, अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकार गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने, प्रशांत तपस्वी यांच्याही मुख्य व्यक्तिरेखा आहेत. रवींद्र मठाधिकारी लिखित या चित्रपटाची कथा सचिन दाभाडे यांची आहे. तर भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड, अनिकेत अरविंद बुटाला सहनिर्माते आहेत.

प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. मग तो पर्यटनासाठीचा असो अथवा आयुष्याचा. या प्रवासात अनेक चढउतार असतात. अनेक गोष्टींचे महत्त्व आपल्याला या दरम्यान कळते. आयुष्याच्या या प्रवासाचा अनुभव देणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या पोस्टरमध्ये एक लहान मुलगा पाठमोरा उभा दिसत आहे. त्याचा आयुष्यातील एक अविस्मरणीय प्रवास आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्याची ही ‘जर्नी’ त्याला कोणत्या वळणावर नेणार, हे लवकरच कळणार आहे.  या चित्रपटाच्या वितरणाची धुरा बॅाक्स हिट मुव्हिजच्या अनुप जगदाळे आणि मोनालिसा बागल यांनी सांभाळली आहे.

दिग्दर्शक सचिन जीवनराव दाभाडे या चित्रपटाबद्दल म्हणतात, ”या चित्रपटात दाखवण्यात आलेली जर्नी म्हणजेच कुटुंबाशी, नात्यांशी आणि स्वतःशी असलेली लढाई आहे. या लढाईत अनेक भावना, गोष्टी उलगडत आहेत. एका लहान मुलाच्या आयुष्यातील हा प्रवास असून प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा.”

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

मलायका अरोरा देखील करणार दुसरं लग्न, लग्नाची पत्रिका घेऊन पोहोचली पहिल्या पतीच्या घरी? (Malaika Arora Reached Her First Husband Arbaaz Khans House For Gave Her Marriage Card)

सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या मलायका हिच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरू आहे. अरबाज खान याच्यानंतर…

April 30, 2024

Invest Smart, Retire Rich

Struggling With Your Investments? Shreeprakash Sharma offers Help! Ragini realised yet another financial year was…

April 30, 2024

अधिपतीच्या आयुष्यात नवीन मास्तरीणबाईंची एण्ट्री, भुवनेश्वरीची नवी चाल, प्रोमो व्हायरल ( Zee Marathi Serial Tula Shikwin Changlach Dhada New Promo Viral )

तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत सध्या अक्षराने अधिपतीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. शाळेतील शिक्षण…

April 30, 2024
© Merisaheli