Marathi

महाराष्ट्रात मराठी सिनेमांना हक्काचं स्थान कोण देणार, प्रसाद ओकचा संतप्त सवाल ( Prasad Oak Fumes On Current Condition Of Marathi Movie In Maharashtra )

सध्या महाराष्ट्रात मराठी सिनेमांना मिळणाऱ्या वागणूकीबद्दल अभिनेता प्रसाद ओकने आपलं मत मांडलं. तो म्हणाला की,

– “स्पर्धा करत नाही असं काही नाही. माझ्याच चित्रपटांनी म्हणजे बाकीच्यांची पण मी उदाहरण देऊ शकेन. पण ‘हिरकणी’समोर चार हिंदी चित्रपट होते. ‘मेड इन चायना’ होता. ‘हाऊसफुल ४’ होता, ‘सांड की आंख’ होता आणि चौथा कोणता तरी होता. हे चारही चित्रपट पडले आणि ‘हिरकणी’ सुपरहिट चालला. ‘चंद्रमुखी’ २९ एप्रिल २०२२ला आला. ‘धर्मवीर’ १३ मे २०२२ला आला आणि २८ मे २०२२ला ‘हंबीरराव’ आला. लागोपाठ तीन मराठीतले सुपरहिट, मोठे चित्रपट आले. त्यांच्यासमोर एकही हिंदी चित्रपट चालला नाही. त्यामुळे स्पर्धा करत नाही, असं नाहीये.”

मराठी सिनेमे आणि महाराष्ट्रातील सिनेमागृहात त्यांना मिळणारं स्थान हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला आहे. अनेकदा निर्माते दिग्दर्शक पाण्यासारखा पैसा खर्च करतात पण मल्टिप्लेक्सवाले त्यांना जागाच देत नाही त्यामुळे ते सिनेमे प्रेक्षकांपर्यंत नीट पोहचतच नाही. या मुदद्यावर अनेकदा वाद होतात पण नंतर ते तिथल्या तिथे मिटतात. आता अभिनेता प्रसाद ओकने पुन्हा एकदा मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

 ‘कॉकटेल स्टुडिओ’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद म्हणाला की “जे मराठीत छोटे चित्रपट आहेत, त्यांना चित्रपटगृह मिळताना खूप समस्या येत आहेत. ही मल्टीप्लेक्सवाल्यांची मुजोरी आहे. ज्याबद्दल वारंवार बोललं गेलेलं आहे. वारंवार याबद्दलची आंदोलन झाली आहेत. राज ठाकरे साहेबांनी खळखट्याक सारखं आंदोलन केलं आहे. वारंवार राज साहेबांसारखा नेता मराठी चित्रपटसृष्टीसाठी धावून आलेलाच आहे, हे मान्य केलंच पाहिजे.

तरी सुद्धा वारंवार येणारं सरकार त्यावर ठोस पाऊल उचलत नाहीये, हे देखील तितकंच आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळालाच पाहिजे, तो आमचा हक्क आहे. याच्यासाठी भीक मागायची वेळ येता कामा नये. हे उघड सत्य आहे. पण या समस्येकडे ज्या सरकारच लक्ष जाईल आणि जे सरकार याच्यावरती तोडगा काढेल त्याच्यानंतरच काय ते होईल.”

“पण ही मल्टीप्लेक्सवाल्यांची मुजोरी आहे. त्यांना हिंदीमध्ये जास्त कलेक्शन मिळत म्हणून प्राइम टाइमचे शो हिंदी चित्रपटांना दिले जातात. हा त्यांचा माज आहे. एकेदिवशी कोणीतरी उतरवले, असं कोणतं तरी सरकार येईल. मी आशा करतो शिंदे सरकारच त्यांचा हा माज उतरवेल. काहींना काही तर तोडगा काढेल असं वाटतंय. माणसाने आशावादी राहावं. पण वारंवार जी भीक मागावी लागतेय शोसाठी मराठी चित्रपट निर्मात्यांना हे चित्र चांगलं नाही. हे वाईट आहे. हे बदललं पाहिजे एवढं नक्की,” 

प्रसाद लवकरच धर्मवीर २ या सिनेमात दिसणार आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

कहानी- दूरियों से नज़दीकियों तक  (Short Story- Duriyon Se Najdikiyon Tak)

अनुष्का चाहती थी कि मीतू स्वयं इस विषय में बात करें, परंतु मीतू तो मानो…

May 3, 2024

मुलायम त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्‍चरायझर्स (Natural Moisturizers For Soft Skin)

आपली त्वचा सुंदर, टवटवीत, मुलायम असावी, असं वाटत असेल तर ती आर्द्र ठेवण्यासाठी प्रयत्न करायलाच…

May 3, 2024

‘जुनं फर्निचर’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने केली धमाल; ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ शोचा प्रोमो रिलीझ ( The entire team of ‘Juna Furniture’ Comes To Hastay Na Hasayalach Pahije Show Promo release )

“हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे!” असे म्हणत प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडणारा अभिनेता, लेखक…

May 3, 2024

भयाण आणि समाजाला काळं फासणारी कथा असलेल्या ‘ॲसिड’ (आघात) या चित्रपटाचा मराठी ओटीटीवर डिजिटल प्रिमिअर (Film Based On Acid Attackers To Stream On Marathi OTT: Digital Premier Of “Aaghat”)

स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून तिची विद्रूपावस्था…

May 3, 2024

Pre-Pay Your Home Loan

Several people achieve their urban dream of buying their own home by availing a home…

May 3, 2024
© Merisaheli