Marathi

प्रियांका चोप्राची चुलत बहीण मिरा चोप्रा लवकरच रक्षित केजरीवालसोबत लग्नगाठ बांधणार (Priyanka Chopra’s Cousin Meera To Tie The Knot With Rakshit Kejriwal, Wedding Invite Goes Viral)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहीण अभिनेत्री मीरा चोप्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात लग्नाआधीच्या सर्व सोहळ्यांबद्दल माहिती देण्यात आली आहे. मीरा राजस्थानमधील जयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार आहे. तिच्या होणाऱ्या पतीचं नाव रक्षित केजरीवाल आहे.

मीरा चोप्रा ही सुदेश व नीलम चोप्रा यांची लेक आहे. मिरा चोप्रा ही तिचा बॉयफ्रेंड रक्षित केजरीवालसोबत १२ मार्च रोजी लग्न करणार आहे.

मिरा चोप्राच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला ११ मार्चपासून सुरुवात होणार आहे. मीरा आणि रक्षित यांच्या मेहंदी सोहळ्यानंतर संगीत आणि कॉकटेल नाईट असणार आहे. १२ मार्च रोजी दिवसभर हळदी समारंभ होईल आणि त्यानंतर संध्याकाळी मीरा आणि रक्षित यांची वरात असणार आहे. जयपूरमधील कुंडा येथील एका आलिशान हॉटेलमध्ये मिरा आणि रक्षित यांचे लग्न होणार आहे.

मिरा आणि रक्षित जयपूरमध्ये बांधणार लग्नगाठ. २०१८ मध्ये प्रियांका चोप्राने निक जोनाससोबत जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये लग्न केले. तर गेल्या वर्षी परिणीती चोप्राने राघव चढ्ढासोबत उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. प्रियांका आणि परिणीतीप्रमाणे मीरा चोप्राही राजस्थानमध्ये लग्न करणार आहे. जयपूरमध्ये ती रक्षितसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

‘अंबे आरुयरे’ या तमिळ चित्रपटातून मिरानं अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. मीरा चोप्राने बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. तिने ‘1920 लंडन’, ‘सफेद’, ‘सेक्शन 375’ आणि ‘गँग ऑफ घोस्ट’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. मिरा चोप्रा ही सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो शेअर करत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. मिराला सोशल मीडियावर 507k फॉलोवर्स आहेत.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar
Tags: meera chopra

Recent Posts

एकच प्रश्‍न (Short Story: Ekach Prashna)

प्रियंवदा करंडे आजींच्या मनात नुसतं काहूर उठलं होतं. नुसता अंगार पेटला होता. हे असं होणं…

April 12, 2024

२० वर्षांनी तुटलेली मैत्री पुन्ही जुळली, मल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मी पुन्हा एकत्र ( Emraan Hashmi Mallika Sherawat Meets Each Other And End Their 20 Year Old Fight During Murder)

अखेर इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांच्यातील 20 वर्षांचा संघर्ष संपुष्टात आला आहे. आपसातील मतभेद,…

April 12, 2024

नाती टिकविण्यासाठी वेळ कसा काढाल? (How Do You Find Time To Maintain A Relationship?)

आजकालच्या जोडप्यांना एकमेकांसाठी वेळ नाही-फुरसत नाही. घर-ऑफिस, पोरंबाळं, त्यांचं संगोपन आणि घरातील रामरगाडा यांच्या कचाट्यात…

April 12, 2024

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओप्लास्टी, आता प्रकृती स्थिर (Sayaji Shine Hospitalied, Actor Goes Angioplasty In Satara)

आपल्या खणखणीत अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.…

April 12, 2024
© Merisaheli