Marathi

राम मंदिराच्या उद्घानापूर्वीच राम मंदिरात पोहचली रामायण मालिकेची टीम (Ramayan stars Arun Govil Dipika Chikhlia And Sunil Lahri Reach Ayodhya Before Ram Mandir Inauguration)

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय पौराणिक मालिका रामायणमध्ये श्री राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या भूमिका साकारणारे अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी अयोध्येत पोहोचले आहेत.

22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे.

अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी त्यांच्या ‘हमारे राम आयेंगे’ अल्बमच्या शूटिंगसाठी अयोध्येत पोहोचले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे गाणे गायक सोनू निगमने गायले आहे. ‘हमारे राम आयेंगे’चे शूटिंग गोप्तर घाट, हनुमानगढी आणि लता चौक येथे होणार आहे.

याशिवाय सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलियानेही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अयोध्येला पोहोचल्याचे फोटो शेअर केले आहेत.

अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी हे देखील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

महेश कोठारे यांनी केली ‘झपाटलेला ३’ची घोषणा (Director Mahesh Kothare Announces Zapatlela-3)

अभिनेते महेश कोठारे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला 'झपाटलेला' हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. आता…

April 11, 2024

बुरे दिन वापस दे दो…. किरण मानेंची पोस्ट चर्चेत ( Kiran Mane Share Post For Current Situation In Maharashtra)

कुठे कुठला उमेदवार हवा होता-नको होता, या वादात आपण सर्वसामान्य माणसांनी अडकायला नको. महाराष्ट्रात या…

April 11, 2024

संकर्षण सोबत लग्न करण्याची इच्छा पण आईने…. अभिनेत्याची चाहतीसाठी खास पोस्ट ( Sankarshan Karhade Share Post For His Fan, Who Wants To Marry Him)

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नुकताच त्याने त्याला साताऱ्याला आलेला त्याच्या खास…

April 11, 2024
© Merisaheli