Uncategorized

रणबीर आलियाची लेक झाली एक वर्षाची, दोन्ही आजी आणि आत्याने केला प्रेमाचा वर्षाव पण चाहत्यांना प्रतीक्षा आलियाच्या पोस्टची (Ranbir- Alia Bhatt’s ‘Daughter’ Raha Kapoor Gets Special Wish from Dadi Neetu, Nani Soni And Bua Riddhima on 1st Birthday)

आज 6 नोव्हेंबर हा कपूर कुटुंबासाठी खूप खास दिवस आहे. आज, 6 नोव्हेंबर रोजी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडपे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी राहा कपूर एक वर्षाची झाली आहे. कपूर कुटुंबात सध्या सणासुदीचे वातावरण असून राहा कपूरच्या पहिल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची सर्वांनाच उत्सुकता आहे. कपूर कुटुंबात राहाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचीही तयारी सुरू आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची एक झलक पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. दरम्यान, आजी नीतू सिंग आणि आत्या रिद्धिमा साहनी यांनी कपूर कुटुंबातील छोट्या परीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

नीतू कपूरला तिची नात राहा खूप आवडते. जेव्हा पापाराझी तिला राहाविषयी विचारतात तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू येते. अशा स्थितीत राहाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त नीतू सिंह खूपच उत्साहित आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर राहासाठी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा शेअर केल्या आहे. नीतू कपूरने इन्स्टा स्टोरीवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये तिने लिहिले, “…आणि काही वेळातच ती एक वर्षाची झाली. पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मौल्यवान बाहुली. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो.”

दुसऱ्या पोस्टमध्ये नीतू कपूरने एका केकचा फोटो शेअर केला आहे ज्यावर मिस वंडरफुल लिहिले आहे. यासोबत कॅप्शनमध्ये आजीने राहावर प्रेमाचा वर्षाव करत लिहिले की, “तू कालच आमच्या जगात आलीस असं वाटत होतं. तुला येऊन एक वर्ष झालं यावर विश्वास बसत नाही. राहा वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

आत्या रिद्धिमा साहनी आणि आजी सोनी राजदान यांनीही हीच पोस्ट शेअर केली आहे. आई आलिया राहाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या छोट्या परीला कशी शुभेच्छा देते याच्या पोस्टची लोक वाट पाहत आहेत, पण आलियाने अजूनपर्यंत राहासाठी कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही.

आलिया आणि रणबीर राहाचा पहिला वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करणार आहेत. अलीकडेच, चाहत्यांसोबत झूम सत्रादरम्यान, रणबीरने राहाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या प्लॅन्सबद्दल सांगितले होते की राहाच्या वाढदिवशी तो घरी एक छोटी पार्टी आयोजित करेल ज्यामध्ये कुटुंब आणि चुलत भाऊ सहभागी होतील.

आलिया-रणबीरने अद्याप आपल्या मुलीचा चेहरा दाखवलेला नाही. अशा परिस्थितीत आज चाहत्यांना आशा आहे की मुलगी एक वर्षाची झाल्यावर राहाचा चेहरा जगाला दाखवेल.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

फिल्म समीक्षाः ‘श्रीकांत’ के रूप में राजकुमार राव की बेमिसाल अदाकारी में दिखी तुषार हीरानंदानी के निर्देशन की जादूगरी… (Movie Review: Shrikanth)

रेटिंगः **** विकलांगों पर दया या सहानुभूति न दिखाएं, बल्कि उनके अंदर छिपी अद्भुत क्षमता…

May 7, 2024

विठ्ठलावर श्रद्धा असणाऱ्या रायाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमचे मनोगत : तो स्वतःला भाग्यवान का समजतो? (Actor Vishal Nikam Has A Devotional Background; Hero Of ‘Yed Lagale Premache’ Feels Proud About This)

२७ मे पासून स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या येड लागलं प्रेमाचं मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.…

May 7, 2024

 मेट गाला सोडून पती रणवीर सिंहसह बेबीमूनचा आनंद घेतेय दीपिका पादुकोण, बेबी बंपसह फोटो व्हायरल (Deepika Padukone Flaunts Baby Bump, Actress Skips Met Gala To Enjoy Babymoon With Ranveer Singh)

एकीकडे सर्व सेलेब्स मेट गालामध्ये आपली स्टाईल दाखवत असताना, यावेळी दीपिका पदुकोण या कार्यक्रमातून गायब…

May 7, 2024

‘हिरामंडी’मधील मल्लिका जानची भूमिका १८ वर्षांपूर्वी या अभिनेत्रीला झाली होती ऑफर (Sanjay Leela Bhansalis First Choice For Mallika Jaan Not Manisha Koirala)

संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी: द डायमंड बाजार' या चित्रपटातील मनीषा कोईरालाच्या अभिनयासाठी तिचे खूप…

May 7, 2024

मेट गाला २०२४ मधील आलियाचा देसी स्वॅग चर्चेत, साडीत खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य (Alia Bhatt saree look in Met Gala 2024, Everyone Impress Her Indian attire)

जगातील सर्वात मोठा मेगा फॅशन इव्हेंट मेट गाला (Met Gala 2024) सुरू झाला आहे. न्यूयॉर्क…

May 7, 2024
© Merisaheli