Uncategorized

मृत्यूच्या दारातून परतली नॅशनल क्रश रश्मिका मंदाना ( Rashmika Mandanna Flight Emergency Landing Saved From Death)

दक्षिणेतील तसेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ज्या फ्लाइटमधून प्रवास करत होती त्या फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या बातमीमुळे रश्मिकाच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रश्मिका प्रवास करत असलेले विमान मुंबईहून हैदराबादला जात होते, टेकऑफनंतर ३० मिनिटांनी तांत्रिक बिघाडामुळे ते मुंबई विमानतळावर परत आले.

रश्मिका मंदान्नाने याबाबत इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, तिने कॅप्शनमध्ये लिहिलेले की, ‘फक्त तुमच्या माहितीसाठी, आज आम्ही अशा प्रकारे मृत्यूपासून बचावलो…’

ते विमान मुंबईहून हैदराबादला जात होते. तांत्रिक बिघाडामुळे ३० मिनिटांनी पुन्हा ते मुंबईला परतले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास नुकतीच ती रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी यांच्यासोबत सुपरहिट ‘ॲनिमल’ चित्रपटात दिसली होती. तसेच येत्या काळात ती अल्लू अर्जुन सोबत ‘पुष्पा २’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Akanksha Talekar

Recent Posts

कहानी- स्पर्श… (Short Story- Sparsh…)

विनीता राहुरीकर “मैं भी यही सोच रही हूं… क्या हम सचमुच में अपने बच्चे से…

April 30, 2024

‘कर्मवीरायण’ शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट ( Karmavirayan Movie Release Date Disclose )

महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात…

April 30, 2024

ऋषी कपूर यांच्या पूण्यतिथी निमित्त नीतू कपूर आणि मुलगी रिद्धीमाने शेअर केली भावूक पोस्ट (Neetu Kapoor Gets Emotional On Rishi Kapoor’s Death Anniversary, also Daughter Riddhima Remembers Late Actor)

ऋषी कपूर यांची चौथी पुण्यतिथी आहे. चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ऋषी कपूर यांनी या जगाचा…

April 30, 2024

इरफान खानच्या लेकाचा दिलदारपणा, गरजू व्यक्तीला ५० हजारांची मदत, पण आपलं नाव न सांगण्याची अट (Irrfan Son Babil Khan Donated 50 Thousand Rupees To Person )

दिवंगत अभिनेता इरफानचा मुलगा बाबिल खान हा एक चांगला मनाचा माणूस आहे. मुंबईपासून १०० किमी…

April 30, 2024
© Merisaheli