रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे गुरूपूरब दिवशी जुळ्या मुलींचे पालक झाले. मात्र ही बाब त्यांनी महिनाभर लपवून ठेवली. रुबिना आणि अभिनव यांनी मुलीच्या जन्माबाबत अधिकृतपणे कोणतीही घोषणा केली नव्हती. पण महिनाभर प्रसूतीची बातमी लपवून ठेवल्यानंतर, मुलींच्या एका महिन्याच्या वाढदिवशी, अखेर या जोडप्याने मुलींची झलक जगाला दाखवली आणि मुलींची नावेही सांगितली.
नवीन वर्षात पुन्हा एकदा रुबिनाने आपल्या मुलींची झलक दाखवली आहे आणि काही अतिशय गोंडस फोटो शेअर करून तिने सांगितले आहे की यावर्षी तिने आपल्या छोट्या परींसोबत नवीन वर्ष साजरे केले आहे. रुबिनाने तिच्या दोन मुलींसोबतचे नवीन वर्षाचे फोटो शेअर करून चाहत्यांना खूश केले आहे.
एका फोटोत, रुबिना आणि अभिनव दोघेही प्रत्येक मुलीला कपड्याच्या कॅरीयरमध्ये धरून दिसतात, दोघेही आपल्या मुलींवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
रुबिनाने हाय स्लिट बॉडीकॉन ड्रेस घातला आहे, तिने आपल्या बाळाला उराशी धरलेले दिसते. याशिवाय एका फोटोत अभिनव त्याच्या एका मुलीला प्रेमाने आपल्या कुशीत घेऊन दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत रुबिनाची आई नातीकडे प्रेमाने पाहत आहे. ही छायाचित्रे शेअर करताना रुबिनाने लिहिले आहे – नवी सुरुवात… नवीन प्रवास… चार जणांच्या कुटुंबासह #2024 चे स्वागत आहे.
अभिनव शुक्लानेही आपल्या मुलीला छातीशी धरून एक फोटो शेअर केला आहे आणि एक सुंदर चिठ्ठी लिहिली आहे. “माझ्या बाळाला या कापडाच्या कॅरिअरमध्ये घेऊन जाणे हे माझे नेहमीच स्वप्न होते. मी गंमतीने याला थैली म्हणायचो आणि रुबीनाला सांगायचो की या पिशवीत आपण आपल्या बाळांसह संपूर्ण जग फिरू. आणि आता आम्ही तेच करू.”
आता चाहते जोडप्याच्या या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि त्यांच्या बाळांना खूप आशीर्वाद देत आहेत. रुबीनाला नवीन वर्षाच्या दिवशी लहान मुलांची झलक दाखवल्याबद्दल धन्यवाद करत आहेत.
लग्नाच्या 5 वर्षांनंतर आई-वडील झालेले रुबिना आणि अभिनव खूप आनंदी आहेत, पालकत्वाचा प्रत्येक क्षण एन्जॉय करत आहेत. तिने आपल्या मुलींची नावे जीवा आणि एधा ठेवली आहेत. प्रसूतीनंतरच्या तिच्या पहिल्या व्लॉगमध्ये रुबिनाने जुळ्या मुलींच्या नावांचा अर्थही सांगितला होता. त्यांनी सांगितले की एधा त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव आहे, तर जीवा त्यांची धाकटी मुलगी आहे.
बदलती लाइफस्टाइल, बदलते मौसम और हार्मोन्स में बदलाव के चलते अगर आपकी स्किन भी मुंहासे,…
अभिनेता भूषण प्रधानने नुकताच त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याची जवळची मैत्रिण अनुषा…
बागेश्वर धाम (Bageshwar Dham baba) के पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Pandit Dhirendra Shastri) इन दिनों…
पुस्तकी ज्ञान घेऊन नोकरी करणे म्हणजेच करिअर असते. याला अपवाद ठरतोय सिडकोत राहणारा मेकॅनिकल इंजिनिअरचे…
ग्लैमर इंडस्ट्री के दिग्गज म्यूजिशियन एआर रहमान (AR Rahman) और उनकी पत्नी सायरा बानो (Saira…
गोव्यातील ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान रणबीर कपूरने आलिया आणि राहा यांच्याशी संबंधित एक…