अभिनेत्री रुबिना दिलैकने गेल्या महिन्यात दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. याबाबत एक महिना तिने कोणालाच सांगत नव्हतं, त्यानंतर आता एक महिन्याने तिने ही गुड न्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत तिने आपल्या लेकींची हलकी झलक आणि त्यांची नाव शेअर केली आहेत. त्यानंतर तिने आता एक व्हॉग शेअर करुन ती नाव ठेवण्यामागचं कारण देखील सांगितलं आहे.
अभिनेत्रीने कारमधून एक व्हिडिओ शेअर केला त्यात ती म्हणाली की, माझ्या घरच्यांनी आमच्या मुलींचे स्वागत हवन आणि पूजा करुन केले. तसेच तिने चाहत्यांचे आभार मानले. अभिनेत्रीने व्लॉगमध्ये सांगितले की, तिने शेवटच्या दिवसापर्यंत शूट केले होते. दुपारपर्यंत शूट सुरू होते आणि संध्याकाळी तिला रुग्णालयात नेण्यात आले.
यावेळी तिने आई आणि सासूबाईंचे कौतुक केले. दोघींनी खूप सपोर्ट केल्याचे सांगितले. आईने तिला म्हणायची की तुला आई झाल्यावर आईचे महत्त्व कळेल आणि आता अभिनेत्रीला याची जाणीव होत आहे. आईने तिला खूप साथ दिली आहे. खूप चांगली काळजी घेतली. त्याचबरोबर अभिनवच्या आईने म्हणजेच रुबिनाच्या सासूबाईंनी ही खूप प्रेम दिले,दोघेही खूप सपोर्टिव्ह आहेत असे ती म्हणाली.
रुबिना दिलैकने आपल्या मुलींच्या नावांबद्दल सांगितले. मुलींची नावे देवींच्या नावावरुन ठेवल्याचे ती म्हणाली. ‘एधा म्हणजे समृद्धी आणि जीवा म्हणजे जीवनरेखा. ती पुढे म्हणाली की, आम्ही ४ नावे आधीच ठरवली होती. जुळी मुले येणार आहेत हे आम्हाला आधीच माहीत होते. तर दोन मुलांची आणि दोन मुलींची नावे ठरवलेली. आम्ही दोघेही बराच वेळ नावाचा विचार करत होतो.
‘अभिनव आणि मला असे नाव ठेवायचे होते ज्याचा अर्थ आणि संबंध आपल्याला जाणवू शकतो. तसेच नावाला वजन आणि अर्थ असणे माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. त्यांचा जन्म होताच आम्हाला वाटले की मोठ्या मुलीचे नाव एधा आणि धाकट्या मुलीचे नाव जीवा असेल. दोघींची व्यक्तिरेखा वेगळी आहे. दोघींचे चेहरे वेगळे आहेत. सांगण्यासारखं बरंच काही आहे पण आत्ता आम्ही सर्वांचे फक्त आभार मानू.
ये धड़कनें भी अजीब हैंकभी-कभी बेवजह धड़कती हैंसांस लेने के लिएदिल पूछता हैजब तुम नहीं…
राजेश मां की बातें सुन कर आश्चर्य एवं आक्रोश से कह उठा, "मां, कई वर्षो…
स्वरा भास्कर (Swara Bhaskar) अपनी फिल्मों को लेकर कम और विवादों को लेकर ज्यादा सुर्खियों…
अभिनेत्री परिणीती चोप्राचं गेल्यावर्षी २४ सप्टेंबरला आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर लग्न झालं.…
टेलिव्हिजनचा सर्वात लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा बऱ्याच काळापासून सर्वांचा आवडता शो…
ब्लॉकबस्टर फिल्म 'गदर' (Gadar) में सनी देओल (Sunny Deol) द्वारा निभाए गए तारा सिंह (Tara…