FILM Marathi

‘संगीत मानापमान’ चित्रपटात १८ नामवंत गायकांच्या आवाजात १४ गाणी (‘Sangeet Manapman’ Is  A Musical Marathi Movie : It Has 14 Songs Sung By 18 Top Singers)

मायानगरी मुंबईत, जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मॅग्नम ऑपस संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” चा ग्रँड म्यूझिक लाँच सोहळा पार पडला. १० जानेवारी २०२५ ला “संगीत मानापमान” हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा म्हणजे कला, संस्कृती आणि संगीताचा एक उत्सव.

खाडिलकरांच्या ११४  वर्ष जुन्या अभिजात नाटकावरून प्रेरित, “संगीत मानापमान” हा सिनेमा कट्यार काळजात घुसली तसेच आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांसारख्या प्रतिष्ठित चित्रपटांचा समृद्ध वारसा पुढे नेत आहे. नयनरम्य दृश्य, अस्सल संगीतमय कथाकथन आणि एका पेक्षा एक कलाकार आश्वासन देतायत की हा सिनेमा नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय ह्यांनी या चित्रपटासाठी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी कंपोज केली आहेत, ह्या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी जसे शंकर महादेवन, सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, सावनी रवींद्र, हृषीकेश बडवे, अस्मिता चिंचाळकर, कृष्णा बोंगाणे, शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे हयांनी आपला आवाज दिला आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे यातले सात गायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आहेत.

“संगीत मानापमान” च्या या भव्यदिव्य म्युझिक लॉन्चच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण चित्रपटाची स्टारकास्ट उपस्थित होती. इतकच नव्हे तर गायकांद्वारा लाईव्ह परफॉर्मन्सचा आस्वाद सुद्धा प्रेक्षकांना घेता आला. संगीत मानापमान या मूळ नाटकातील गाजलेल्या गाण्यांचे आणि चित्रपटातील नवीन रचनांचे मिश्रण ह्यावेळी पहायला मिळाले, प्रत्येक गायकाने आपलं गाणं स्टेजवर सादर करून प्रेक्षकांना आपल्या मधुर सुरांनी एका वेगळ्याच जगात असल्याचा अनुभव दिला.

संगीतकार शंकर महादेवन ह्यांनी सुद्धा उत्साह व्यक्त करत सांगितलं, “१८ अविश्वसनीय प्रतिभावान गायकांसोबत काम करणं एक अद्भूत अनुभव आहे. मी याआधीही सुबोधच्या कट्यार काळजात घुसली मध्ये  संगीत दिलं असलं तरी या चित्रपटाच्या संगीतात नावीन्य आहे. समीर सामंत यांचे गीत खरोखरच खूपच रिफ्रेशिंग आहेत. त्यामुळे खात्री आहे की या संगीताच्या म्युझिकल प्रवासात प्रेक्षक नक्कीच मंत्रमुग्ध होतील आणि यासाठी मी संपूर्ण टीमचा खूप खूप आभारी आहे, त्यांच्या मेहनतीचं कौतुक करतो.”

अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे म्हणाले की “कट्यार काळजात घुसलीच्या घवघवीत यशानंतर आम्ही संगीत मानापमान सादर करत आहोत, जे महाराष्ट्रीयन संस्कृतीचं प्रतिबिंब आहे. दिग्गज त्रिकूट शंकर-एहसान-लॉय, १८ प्रतिभावान गायकांनी सजलेल्या भावपूर्ण रचनांची जादू मोठ्या पडद्यावर नक्कीच दिसेल. जिओ स्टुडिओज आणि ज्योती देशपांडे यांच्या पाठिंब्याने, आम्हाला खात्री आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर निरंतर प्रभाव पाडेल .”

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चे म्युझिक लेबल सारेगामा आहे. चित्रपटात सूबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.  पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. अशाप्रकारे १० जानेवारी २०२५ ला संगीताने नटलेला चित्रपट थिएटरमध्ये अनुभवायला सज्ज व्हा.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

बोल्ड एंड ब्यूटीफुल मौनी रॉय, देखें तस्वीरें और वीडियो… (Bold And Beautiful Mouni Roy, See Beautiful Photos And Video)

अपने ख़ूबसूरत अंदाज़ और आकर्षक स्टाइल के लिए मशहूर हैं मौनी रॉय. वेस्टर्न आउटफिट हो…

March 11, 2025

Experience the Magic: Pratik Gaba Entertainment Presents Renowned Street Artist & DJ Alec Monopoly Mumbai & Delhi Tour

Pratik Gaba bought the renowned street artist and dj Alec monopoly to India. For an…

March 11, 2025

दीपिका कक्कर तिचं पहिलं लग्न आणि घटस्फोट याबद्दल झाली व्यक्त (Dipika Kakar Reacts On Daughter From First Marriage)

‘ससुराल सिमर का’ फेम दीपिका कक्कर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. दीपिकाने ७ वर्षांपूर्वी अभिनेता…

March 11, 2025

रिश्तों में परफेक्शन नहीं, ढूंढ़ें कनेक्शन (Relationship Isn’t About Chasing Perfection, It’s About Finding Connetion)

हम सभी अपने रिश्ते को परफेक्ट बनाना चाहते हैं, जिसके लिए हम अपने लिए ढूंढ़ना…

March 11, 2025

लघुकथा- दहलीज़ का बंधन… (Short Story- Dahleez Ka Bandhan…)

"जो लौट रहा है वो इस घर का बेटा है, भाई है. मेरा रिश्ता तो…

March 11, 2025
© Merisaheli