Marathi

मुलीच्या जन्मानंतर शाहिद कपूरने सासऱ्यांची फोनवर मागितलेली माफी, काय घडलेलं नेमकं ? ( Shahid Kapoor Say Sorry To Mira Kapoor Father After His Daughter Misha Birth)

शाहिद कपूर सध्या त्याच्या तेरी बातों में ऐसा उल्झा जिया या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून शाहिदच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे. दरम्यान, शाहिद कपूरने २५ फेब्रुवारीला वाढदिवस साजरा केला. यावेळी शाहिदची एक जुनी मुलाखत चर्चेत आली, ज्यामध्ये त्याने सांगितले होते की, त्याची मुलगी मीशाच्या जन्मानंतर तो घाबरला होता आणि त्याने लगेच मीराच्या वडिलांना म्हणजेच त्याच्या सासऱ्यांना फोन केला आणि त्यांची माफी मागितली.

शाहिद कपूरने 2015 मध्ये मीरा राजपूतशी लग्न केले आणि आता तो दोन मुलांचा बाप आहे. पण 2016 मध्ये जेव्हा मीराने मुलगी मीशाला जन्म दिला तेव्हा शाहिदला मुलीचा बाप होण्याची खूप भीती वाटत होती. याचा उल्लेख त्याने त्याच्या एका जुन्या मुलाखतीत केला होता. शाहीद म्हणाला होता, “मुलगी झाल्यानंतर मी खूप आनंदी होतो पण सोबतच घाबरलो होतो. मुलगी झाल्यानंतर मी सर्वात आधी मीराच्या वडिलांना फोन केला आणि म्हणालो, बाबा, लग्नात मी काही चुकीचे केले असेल, ज्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर मला माफ करा.”

शाहिद कपूर म्हणाला, “मीशा झाल्यानंतर, मला समजले की मी देखील एका मुलीचा बाप आहे. एक दिवस ती एका मुलाशी लग्न करेल. खरे सांगायचे तर, त्या क्षणी माझ्या आयुष्यातील पुढील 30 वर्षे माझ्या डोळ्यांसमोर होती. वर्ष सरू लागली होती.

मुलीचा बाप होणं हा खरंच वेगळा अनुभव असतो. ही खूप खास भावना आहे. मीरा आणि मला दोघांना मुलगी हवी होती.

याआधी अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात खूप बदल झाल्याचे सांगितले होते. आणि मीशाच्या जन्मानंतर त्याच्यात इतरही अनेक बदल झाले असे सांगितले. एका मुलाखतीत शाहिदने असेही म्हटले होते की मीशामुळेच त्याने सिगारेट सोडली होती.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

लवकरच आई होणाऱ्या दीपिका पादुकोणने भरतकाम सुरू केलं असल्याचा फोटो केला शेअर (Deepika Padukone Tries Her Hands On Embroidery During Pregnancy – Fans React With Love)

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलीवूडचे रोमॅंटिक कपल नेहमीच चर्चेत असते. लग्नाच्या सहा वर्षांनंतर…

April 17, 2024

मुलगा की मुलगी? रणवीर सिंहने दिलेल्या उत्तरामुळे जिंकली चाहत्यांची मनं (Ranveer Singh wants Baby Girl or Baby Boy, Actor Reveals in interesting way…)

बॉलिवूडचे सुपरस्टार जोडपे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण काही महिन्यांतच आई-वडील होणार आहेत. रणवीर सिंग…

April 17, 2024

मुकं करोति वाचालम्॥ (Short Story: Mukam Karoti Vachalam)

रेखा नाबर माझा जीवश्‍च कंठश्‍च मित्र मला दोन वर्षांनी भेटणार म्हणून मी हरखून गेलो होतो.…

April 17, 2024

श्रीराम नवमी : ‘मुखी राम विश्राम तेथेच आहे’ (Shri Ram Navami)

रामनवमी हा सण चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो. आज राम नवमी आहे. भगवान…

April 17, 2024

बालक आणि पालक…(Child And Parent…)

मुलांकडून रास्त अपेक्षा ठेवणं हेच बालसंगोपनाचं गमक आहे; पण दुर्दैवानं परिस्थिती अगदी गळ्याशी येईपर्यंत बर्‍याच…

April 17, 2024

Exercise Anytime, Anywhere!

With the Christmas spirit in the air, pleasant weather and a full social schedule, people…

April 17, 2024
© Merisaheli