Marathi

शाहजहानी पुलाव (Shahjahani Pulao)

साहित्य – अर्धा किलो बोनलेस चिकन, १ किलो बासमती तांदूळ, २५० ग्रॅम कांदा, २५० ग्रॅम टोमॅटो, प्रत्येकी २५ – २५ ग्रॅम आलं-लसूण पेस्ट, २५ ग्रॅम जिरे, २५ ग्रॅम कोथिंबीर, ५० ग्रॅम खसखस, ५० ग्रॅम काजू, २५ ग्रॅम चिरौंजी, थोड्या भोपळ्याच्या बिया, २ छोट्या वेलच्या, २ मोठ्या वेलच्या, २ तमालपत्र, १ तुकडा दालचिनी, ५ लवंगा, मीठ चवीनुसार, ५० ग्रॅम तूप वा तेल, २ टीस्पून गरम मसाला, २ टीस्पून हळद, अर्धा टीस्पून जिरेपुड

सजावटीसाठी – पातीचा कांदा, ऑमलेट किंवा उकडलेलं अंड

कृती – जिरं, कोथिंबीर, खसखस, काजू, भोपळ्याच्या बिया आणि चिरौंजी वाटून त्याची पेस्ट बनवून घ्या. एका हंडीमध्ये तेल गरम करा. त्यात तमालपत्र, दालचिनी, वेलची आणि कांदा घालून हलकेच परता. त्यात कापलेले टोमॅटो घाला. आता त्यात मीठ, हळद, जिरेपुड, व गरम मसाला घालून परतवा. भांड्यात तेल सुटू लागले की जिरं, कोथिंबीर, खसखस, बिया व चिरौंजी यांची पेस्ट घाला. २-३ मिनिटानंतर त्यात चिकन घालून १५-२० मिनिटं शिजवा. पाणी घालून शिजू द्या. चिकन अर्धवट शिजले की त्यात तांदूळ घाला. तांदळातील पाणी सुकले की हंडीला दम लावून १५ मिनिटं मंद आचेवर शिजवा. चिरलेला पातीचा कांदा आणि ऑमलेट किंवा उकडलेल्या अंड्याने सजवून गरमागरम सर्व्ह करा.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

अकायच्या जन्मानंतर नवऱ्याला पाठिंबा देण्यासाठी पहिल्यांदाच बाहेर पडलेली अनुष्का, आईपणाचे तेज पाहुन चाहत्यांचे कौतुक (Anushka Sharma has gained weight post son’s birth, Mommy is glowing after second delivery)

मुलगा अकायला जन्म दिल्यानंतर अनुष्का शर्मा पहिल्यांदाच भारतात परतली तेव्हापासून सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.…

May 20, 2024

दही,तब्येतीला सही (Yogurt Is A Sign Of Health)

दही हे आरोग्यपूर्ण आहे. रोजच्या आहारात दह्याला खूप महत्त्व आहे. दही चवीसाठी जितके स्वादिष्ट तितकेच…

May 20, 2024

उर्वशी रौतेलाचा कान्स फेस्टिव्हल लूक व्हायरल, गळ्यातल्या नेकलेसने वेधलं लक्ष ( Urvashi Rautela Cannes Film Festival 2024 Look Viral)

अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला कुठेतरी गेली तरी तिची चर्चा होतेच. ती सहज लाईमलाइटमध्ये येते.…

May 20, 2024

संतुलन (Short Story: Santulan)

दीप्ती मित्तलजॉब हे तुझ्या जीवनातलं महत्त्वपूर्ण अंग आहे खरं. पण ते संपूर्ण जीवन नव्हे. त्याचप्रमाणे…

May 20, 2024
© Merisaheli