शाहरुख खान नुकताच अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे एका शूटसाठी गेला होता, तिथे त्याचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यावर तिथेच शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. शाहरुखच्या नाकाला दुखापत झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला, त्यानंतर त्याचे ऑपरेशन करावे लागले
ETimes ने दिलेल्या माहितीनुसार शाहरुख खान लॉस एंजेलिसमध्ये एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करत होता, तिथे त्याला नाकाला दुखापत झाली. त्याच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला, त्यामुळे त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी काळजी करण्यासारखे काही नसल्याचे सांगितले. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी किरकोळ शस्त्रक्रिया करावी लागली. ऑपरेशननंतर शाहरुखच्या नाकावर पट्टी दिसत होती. शाहरुख आता भारतात परतला असून तो या दुखापतीतून सावरत आहे.
शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचे तर, या वर्षी प्रदर्शित झालेल्या पठाण या चित्रपटाने सर्वत्र खळबळ उडवून दिली. जगभरात या चित्रपटाने 1000 कोटींची कमाई केली आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटाची वाट पाहत आहे. या महिन्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. 12 जुलै रोजी ट्रेलर रिलीज होऊ शकतो. टॉम क्रूझच्या मिशन इम्पॉसिबल डेड रेकनिंगसह ट्रेलर थिएटरमध्ये दाखवला जाईल.
शाहरुख खानचा हा चित्रपट अॅटली कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. शाहरुखची प्रॉडक्शन कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि गौरी खान यांनी याची निर्मिती केली आहे. याशिवाय शाहरुखकडे राजकुमार हिरानीचा डंकी देखील आहे, ज्यात विकी कौशल आणि तापसी पन्नू यांच्याही भूमिका आहेत.
Want to be fit, in optimum health and bursting with energy this year? Identify the…
अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'केसरी चॅप्टर २' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १८ एप्रिल…
छोट्या पडद्यावरील 'शक्तीमान' मुकेश खन्ना यांनी अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत विनोदी अभिनेता कपिल शर्मावर आपला राग…
काल संध्याकाळी गायक सोनू कक्करची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. ज्यामध्ये गायकाने त्याचा…
Sexual intimacy forms a beautiful part of one’s life. But this beauty can turn into…
बॉलीवुड के खिलाड़ी कुमार की फिल्म केसरी चैप्टर 2 (Kesari Chapter 2) जल्द ही सिनेमाघरों…