Entertainment Marathi

‘फॅमिली मॅन ३’ सीरिजमध्ये शरद केळकर दिसणार की नाही? अभिनेत्याने स्वत: केला खुलासा (Sharad Kelkar not a part of ‘Family Man 3’: ‘Nobody informed me about it’)

‘फॅमिली मॅन ३’ या सीरिजची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. पण या वेळी या सीरिजमध्ये अभिनेता शरद केळकर दिसणार की नाही याबाबत चर्चा सुरु आहे. यावर स्वत: अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.

हिंदी ओटीटी विश्वातील ‘फॅमिली मॅन’ ही सीरिज सुपरहिट ठरली आहे. या सीरिजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या सीरिजच्या दोन्ही भागांनी प्रेक्षकांची मने जिंकली. आता ‘फॅमिली मॅन ३’ची घोषणा करण्यात आली आहे. घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण राज आणि डीके यांच्या या सीरिजमध्ये यावेळी अभिनेता शरद केळकर दिसणार की नाही? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

नुकताच शरद केळकरने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला अरविंद या भूमिकेविषयी विचारण्यात आले होते. त्यावर त्याने ‘मला जेव्हा या सिझनची घोषणा करण्यात आली तेव्हा टॅग करण्यात आले नाही. त्यामुळे कदाचित मी या सिझनचा भाग नसेन. मला या सिझनविषयी कोणतीही माहिती नाही किंवा माहितीही देण्यात आलेली नाही. मी या सिझनची घोषणा केल्याचे मी बातमीमध्ये वाचले पण कोणी मला माहिती दिली नाही. त्यामुळे मला काहीच माहिती नाही. मला वाटते यावेळचा सिझन हा आधीच्या सिझनपेक्षा चांगला असणार आहे’ असे उत्तर दिले.

पुढे शरद केळकर म्हणाला, “त्यांना दुसरा कोणी तरी माणूस सापडला असेल. खरे सांगायचे तर, त्यांनी या सिझनमध्ये काय लिहिले आहे ते मला माहित नाही. माझी त्यांच्याशी कोणतीही बैठक किंवा त्यांच्याशी संवाद झालेला नाही. त्यामुळे माझी भूमिका तिथे आहे की नाही हे मला माहीत नाही. लिहिली असेल तर मी नक्कीच सीरिजमध्ये असेन. नाहीतर, मित्रांनो, मला मिस करा. मी कधीही छेड काढत नाही, मी कधीही खोटे बोलत नाही, म्हणून मी जे बोलत आहे ते खरे आहे.”

द फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनमध्ये मनोज, प्रियमणी आणि शारी हाश्मी हे कलाकार श्रीकांत तिवारी, सुचित्रा तिवारी आणि जेके तळपदे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘द फॅमिली मॅन २’च्या पोस्ट-क्रेडिट सीन्समध्ये कोविड-१९ महामारी आणि भारत-चीन सीमा संघर्ष यांच्यातील संबंध असल्याचे संकेत देण्यात आले होते. ईशान्येकडील राज्यांवर हल्ला करण्यासाठी चीनने कोरोना महामारीचा कसा वापर केला, हे तिसऱ्या भागाच्या आधारे दाखवण्यात आले आहे.

शरद केळकर नुकताच राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ या चित्रपटात दिसला होता. बाहुबली : क्राउन ऑफ ब्लड या अॅनिमेटेड अॅक्शन सीरिजसाठी ही त्याने व्हॉईसओव्हर दिला होता. आता शरदचा पुढचा प्रोजेक्ट काय असणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

फिल्म समीक्षाः मेट्रो… इन दिनों- रिश्ते और प्यार से जूझती रोमांटिक म्यूज़िकल जर्नी… (Movie Review: Metro… In Dino)

रेटिंग: *** अनुराग बसु रिश्ते के ताने-बाने की गहराई को बख़ूबी समझते हैं और अपने…

July 4, 2025

पहला अफेयर- तीन दिवसीय प्यार! (Love Story- Teen Divasiy Pyar)

वो मोहित के स्टेशन आने की ख़ुशी और बिछड़ने के ग़म दोनों को शब्द नहीं…

July 4, 2025

कहानी- आपने कहा था (Short Story- Aapne Kaha Tha)

सांत्वना सिसक पड़ी. एक पल को चुप रह कर अविनाश ने कहा, "सांत्वना, आज से…

July 4, 2025
© Merisaheli