कॉफी विथ करणचा ८ वा सीझन सध्या खूप चर्चेत आहे. या शोमध्ये वेगवेगळे सेलिब्रेटी येऊन करण सोबत गप्पा मारताना त्यांच्याशी निगडीस किस्से शेअर करत असतात.
यावेळी सैफ अली खान आणि शर्मिला टागोर या जोडीने कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावली होती. यावेळी सैफ अली खान आणि अमृता सिंहच्या घटस्फोटानंतर अनेक वर्षांनी शर्मिला टागोर यांनी आपले मत व्यक्त केले.
मुलाच्या आणि सुनेच्या घटस्फोटाबद्दल शर्मिला टागोर म्हणाल्या की, “फक्त सैफच नाही तर आमच्या संपूर्ण कुटुंबाला अमृता, सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांच्यापासून वेगळे होण्याचे दुःख सहन करावे लागले.” त्यावेळी सैफने सांगितले की, मी माझ्या आईला सर्वात आधी घटस्फोट घेण्याबाबत सांगितले होते आणि या काळात तिने मला खूप मदत केली.
शर्मिला यांनी पुढे सांगितले की, जेव्हा तुम्ही दीर्घकाळ एकत्र असता, एकमेकांच्या प्रेमात असता, तेव्हा वेगळे होणे सोपे नसते “आमच्यासाठी तो आनंदाचा काळ नव्हता. इब्राहिम फक्त तीन वर्षांचा होता.
ऑक्टोबर १९९१ मध्ये अमृता आणि सैफचे लग्न झाले. २००४ मध्ये ते दोघे वेगळे झाले. असे असले तरीही संपूर्ण कुटुंबाने सारा आणि इब्राहिमची खूप काळजी घेतली. आजही सारा आणि इब्राहिमचे त्यांच्या वडिलांसोबत खूप चांगले नाते आहे. अमृताशी घटस्फोट झाल्यावर काही वर्षांनी सैफने अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केले. त्यांना तैमूर आणि जेहही दोन मुलं आहे.
हल्की सी बूंदाबांदी शुरू हो गई. वह बूंदों की सरगम पर फिर गुनगुनाने लगी. उसका…
गणपति बप्पा का विसर्जन करने के बाद अब अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) और विक्की जैन…
मनीषा कोइराला (Manisha Koirala) का नाम 90 के दशक की खूबसूरत एक्ट्रेसेस में शुमार है,…
मलायका अरोरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील अनिल अरोरा यांनी आज सकाळी त्यांच्या फ्लॅटच्या…
मलाइका अरोड़ा (Malaika Arora) पर दुखों का पहाड़ टूट पड़ा है. उनके पापा अनिल अरोड़ा …
उस पेड़ पर कुछ पंछी उछल-कूद रहे थे. कभी वो इस डाली पर बैठते, तो…