Marathi

दोघी (Short Story: Doghi)

  • अंजली मीनानाथ धस्के
    पै पै जमवून संसार करावा. काहीतरी संकट यावं आणि सगळंच संपून जावं. असंच काहीसं तिच्यासोबत होत होतं. एका मागोमाग तीन मुलांचं मातृत्व तिनं स्वीकारलं. घरातले सदस्य वाढत गेले, तरी नवर्‍याला नोकरी लागायचा पत्ता नाही.

शिकलेला नवरा आहे म्हणजे आज ना उद्या चांगली नोकरी लागेल या आशेनं रंजनानं संसाराला सुरुवात केली होती. परंतु पै पै जमवून संसार करावा. काहीतरी संकट यावं आणि सगळंच संपून जावं. असंच काहीसं तिच्या सोबत होत होतं. एका मागोमाग तीन मुलांचं मातृत्व तिनं स्वीकारलं. घरातले सदस्य वाढत गेले तरी नवर्‍याला नोकरी लागायचा पत्ता नाही. त्यानं शेवटी मजुरीचा मार्ग पत्करला. तिनंही चार घरची धुणीभांडी करायला सुरुवात केली. जरा सुरळीत सुरू झालं नाही तितक्यात लहान मुलाचा दवाखाना सुरू झाला. आधीच शिल्लक काही राहत नव्हतं, त्यात दवाखान्याचा खर्च, मोठ्या दोन मुलींच्या शिक्षणाच्या खर्चाची भर पडली.
दिवसामागून दिवस गेले तरी कमाई आणि खर्च यांचा मेळ बसलाच नव्हता. वाढत्या खर्चानं निराश न होता तिनं मेहनत वाढवली. रोजचं खायला मिळतं आहे आणि मुलांचं शिक्षण सुरू आहे यातच समाधान मानलं. पण हे समाधानही फार दिवस टिकलं नाही. बांधकामावर असताना नवरा वरच्या मजल्यावरून खाली पडला. कमरेच्या हाडाला जबर मार लागला. त्यानं अंथरूण धरलं. ऑपरेशनला
पर्याय नव्हता.
अंगावरचं चार मण्यांचं डोरलं आधीच मोडून झालं होतं. नवर्‍याची तब्येत खूपच बिघडली. उठणं बसणं पूर्ण बंद झालं.
होणार्‍या वेदना सहनशक्तीच्या पलीकडे गेल्या तेव्हा यंदा दिवाळीला बक्षीसी देऊ नका, पण नवर्‍याच्या ऑपरेशनसाठी लागणारी रक्कम तेवढी द्या असं सांगून तिनं कामावर आगाऊ रक्कम उचलली. नवर्‍याचं ऑपरेशन करून घेतलं .
ऑपरेशन झाल्यावर सगळं आधी सारखं सुरळीत होईल असं वाटलं होतं पण… दवाखान्यातून सुट्टी देताना डॉक्टर जे बोलले त्यानं तिच्या सगळ्या आशाच संपल्या. ऑपरेशन झालं तरी वर्षभर कोणतंही काम करायचं नाही फक्त आराम करायचा. तसंच वर्ष झाल्यावर पूर्वीसारखं जड काम तर करायचं नाहीच पण
बैठे कामही खूप वेळ बसून करणं टाळायचं. थोडक्यात जीव जगला होता फक्त. बाकी पूर्वीसारखं काहीच होणार नव्हतं. तिच्या संसाराचं एक चाक कायमचं अधू झालं होतं. इथून पुढे संसाराची गाडी तिला एकटीलाच ओढायची होती. तिच्या मनाप्रमाणेच शरीरावरही खूप ताण पडत होता. स्वतःचं दुखणं कुरवाळायला तिला वेळच नव्हता. अंगात कणकण, डोळ्यात पाणी घेऊन
ती सतत काम करत होती.


दिवाळी तोंडावर आली. घरात तर काहीच शिल्लक नाही. सण साजरा केला नाही तरी नवर्‍याच्या दवाखान्याचा खर्च तर करणं भागच होतं. आधीच मोठी रक्कम आगाऊ घेतल्यानं कोणत्याही कामावर पैसे मिळण्याची आशा नव्हती.
सासरची परिस्थिती तशी बरी होती. त्यांच्याकडे मदत मागावी म्हणून ती सासरी गेली खरी, पण त्यांनी मदत न करता तुमच्या गरजा संपतच नाही हे ऐकवलं. खोटं काय होतं त्यात? कितीही कष्ट उपसले तरी कधी सुगीचे दिवस तिला दिसलेच नव्हते.
निराश होऊन तिनं घरची वाट धरली. ती बसमध्ये खिडकी शेजारी शून्यात नजर लावून बसली होती. ऑफिसच्या कामासाठी दोन दिवस बाहेर गावी निघालेली प्रिया नेमकी रंजनाच्याच जवळ जाऊन बसली.
घरातून बाहेर पडण्यापूर्वी सासर्‍यांनी तिला घराच्या रंगकामासाठी लागणारे पैसे मागितले
होते. जणू लग्नानंतर घर तिच्या एकटीचंच होतं. स्वतःच्या पगारावर तर तिची सत्ता नव्हतीच वरून दिवाळीला मिळणारा बोनसही अशी कारणं सांगून तिच्याकडून काढून घेण्याचा त्यांचा डाव होता. पैसे देण्याला तिचा विरोध नव्हता पण तिचेच
पैसे स्वतःसाठी, तिच्या माहेरच्यांसाठी खर्च करण्याचं तिला स्वातंत्र्य नव्हतं. याचा राग तिच्या
मनात होता.
पहिल्या दिवाळसणालाही सासरी काहीच कौतुक झालं नव्हतं. त्यानंतरही ते कधीच केलं गेलं नाही. आज ना उद्या परिस्थिती बदलेल या आशेवर ती होती. अनेक इच्छा मारून त्यांच्या मागण्या पुर्‍या करत होती तरी सासरी कौतुक होत नव्हतं, याची सल तिच्या मनात ठसठसत होतीच.
आपल्या पगारात आपल्याला काय हवं ते घेण्याचा अधिकार आहे. या वर्षी काहीही झालं तरी चालेल पण इतरांच्या मागण्या बाजूला सारून इतक्या वर्षांची पैठणी घ्यायची आपली इच्छा पूर्ण करायचीच. असा निर्धार करूनच ती बसमध्ये चढली होती.
दोघी आपल्याच विचारात डोळ्यातलं पाणी लपवत एकमेकींना बघून औपचारिक हसल्या.
दोघींच्या डोळ्यातलं पाणी त्यांच्याही नकळत डोळ्याबाहेर पडलं. त्या ओघळणार्‍या पाण्यानं त्यांच्यातलं अंतर संपून मनमोकळा संवाद सुरू झाला.
स्वतःचं दुःख मोकळेपणानं सांगितल्यावर दोघींनाही थोडं हलकं हलकं वाटायला लागलं. तरी भविष्याचे विचार डोक्यात धुडगूस घालत होतेच. रंजनाची कर्म कहाणी ऐकून आता प्रियाची अस्वस्थता अधिकच वाढली. सध्या आपल्यापेक्षा रंजनाच्या आयुष्यात आनंदाचा एक क्षण येणं फार गरजेचं आहे या जाणिवेनं क्षणात तिच्या विचारांची दिशा बदलली.
आपण स्वतः हट्टानं पैठणी घेतली तरी त्यात आपल्याला हवं असलेलं सासरचं कौतुक नसणारच आहे. तिनं मनात काही एक विचार केला आणि पट्कन पर्समधून पैसे काढून ते रंजनाच्या नकळत तिच्या पिशवीत टाकले .


रंजना तिचा थांबा आल्यावर उतरली. आपल्या घरी पोहोचली. आईनं खाऊ आणला असेल या आशेनं तिच्या मुलानं पिशवीत हात घातला. त्याच्या हातात पैसे आले. आपल्या फाटक्या पिशवीत इतके पैसे आले कुठून? देवानं तर काही चमत्कार केला नाही? तेवढ्यात प्रियानं तिला प्रवासात असताना किती पैशांची गरज आहे? हे विचारल्याची आठवण झाली. हे नेमके तितकेच रुपये आहेत म्हणजे प्रियानेच हे पैसे आपल्या पिशवीत टाकले, याची तिला खात्री पटली. आज प्रियाच्या रूपात तिला लक्ष्मीच भेटली होती. तिनं पटकन देवाजवळ दिवा लावला. देव अजूनही पाठराखण करतो आहे या जाणिवेनं तिला जणू जगण्याची नवी प्रेरणा मिळाली. तिनं तृप्त मनानं प्रियाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत, अशी प्रार्थनाही केली.
इकडे दोन दिवसांनी जेव्हा प्रिया घरी पोहोचली तेव्हा आजे सासूबाई आल्या होत्या. तिने त्यांना वाकून नमस्कार केला. आल्या आल्या घराचा ताबा घेत कामांना सुरुवात केली. आजींच्या आवडीचा सगळा मेनू तयार केला. जेवणं झाली. आजींनी तिला, घरासाठी किती करतेस गं म्हणून आपल्याजवळ बसवून घेतले. तोंडावरून मायेनं हात फिरवला. तिच्या हातात लाल मखमली पिशवी ठेवली, यंदा सगळ्या लेकी सुनांचं कौतुक करायचं ठरवलं आहे मी , सगळ्यांच्या भेटवस्तू देऊन झाल्यात. तूच तेवढी राहिली होती. उघडून बघ आवडते का मी दिलेली भेट. प्रियाने मखमली पिशवी उघडली तर त्यात तिच्या आवडीच्या रंगाची पैठणी.
पैठणी भेटल्याचा आनंद तर होताच पण ती पैठणी आजींनी कौतुकानं दिली आहे, या जाणिवेनं तो आनंद द्विगुणित झाला.
दोघींच्या आयुष्यातली ही दिवाळी
स्मरणीय ठरली. यंदा दिवाळीच्या दिव्यांचा प्रकाश त्यांच्यासाठी आनंद घेऊन आला. समाधानानं भरलेल्या क्षणांनी त्यांचं मन न्हाऊन निघालं.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

#happybirthday नीतू कपूर को कपिल शर्मा ने प्यारे अंदाज़ में कुछ इस तरह जन्मदिन की बधाई दी… (Kapil Sharma wished Neetu Kapoor a happy birthday in this cute way…)

अभिनेत्री नीतू कपूर आज अपना 67 वां जन्मदिन मना रही हैं. इस ख़ुशी के मौक़े…

July 8, 2025

मॉनसून फैशन- भीगे मौसम में ऐसे लगें हॉट (Monsoon Fashion- How to look hot in Monsoon)

बूंदों से लिपटी हो या सितारों में सिमटी हो... भीगी-भीगी-सी तुम क्या खूब लगती हो...…

July 8, 2025

कहानी- चक्रव्यूह (Short Story- Chakravyuha)

उसकी पीठ पर अपनी गुदगुदी हथेली से थपकी देते तो नीति एकदम सिहरकर संभल जाती.…

July 8, 2025

अनुपम खेर- भीगा हुआ आदमी बारिश से नहीं डरता… (Anupam Kher- Bhiga huwa aadmi barish se nahi darta…)

- आप 'मेट्रो... इन दिनों' फिल्म में रिश्ते और इमोशन के मकड़जाल को देखेंगे. इसमें…

July 7, 2025
© Merisaheli