Marathi

‘अजाग्रत’ या हिंदी चित्रपटाद्वारे श्रेयस तळपदे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार (Shreyas Talpade To Play Role In Pan India Movie Ajagrat Along With Radhika Kumaraswamy)

‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटात अल्लू अर्जूनला हिंदीत आवाज दिल्यानंतर ‘अजाग्रत’ या हिंदी चित्रपटाद्वारे श्रेयस तळपदे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अंधारामागील सावल्या’ अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटाचं कथानक अनपेक्षिरित्या उलगडणार आहे. चित्रपटाच्या शीर्षकाला तितक्याच ताकदीचं टॅगलाईन लाभल्याने प्रेक्षकांना या रहस्यमय चित्रपटात काय पाहायला मिळेल, याची उत्सुत्कता लागली आहे.

या चित्रपटात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांची पूर्व पत्नी आणि कन्नड अभिनेत्री राधिका कुमारस्वामी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त ‘अजाग्रत’मध्ये सुनील, राव रमेश, जगपती बाबू, आदिथ्य मेनन, देवराज, अच्युत कुमार, साई कुमार, समुद्र कानी, मोहन लाल यांच्याही भूमिका आहेत.

या चित्रपटाच्या कथानकात जिवंतपणा आणण्यासाठी सेटची रचना अतिशय बारकाईने केली आहे. चित्रीकरणस्थळ अधिक नैसर्गिक वाटण्यासाठी दिग्दर्शक शशिधर यांनी विशेष मेहनत घेतली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शशिधर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. रवी राज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट पॅन इंडिया नेण्याचा मानस आहे. वाढदिवसाचं औचित्य साधून राधिका कुमारस्वामी यांच्या व्यक्तिरेखेच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं आहे. हा चित्रपट हिंदीसह सात विविध भाषेत प्रदर्शित होणार आहे.

‘अजाग्रत’ हा एक ॲक्शन थ्रिलर असून यात श्रेयस तळपदेसोबत अजून एक बॉलिवूड अभिनेता झळकणार आहे. या अभिनेत्याची ओळख लवकरच समोर येणार आहे, ज्यामुळे चित्रपटाची उत्सुकता वाढेल. हा चित्रपट श्रेयस तळपदेसाठी खास असणार आहे. सात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणारा त्याचा हा पहिला पॅन इंडिया चित्रपट असणारा आहे. आकर्षक कथानक, कलाकार आणि दूरदर्शी दिग्दर्शनासह ‘अजाग्रत’ भारतीय चित्रपटसृष्टीत नवीन बेंचमार्क सेट करण्यासाठी सज्ज आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

महेश कोठारे यांनी केली ‘झपाटलेला ३’ची घोषणा (Director Mahesh Kothare Announces Zapatlela-3)

अभिनेते महेश कोठारे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला 'झपाटलेला' हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. आता…

April 11, 2024

बुरे दिन वापस दे दो…. किरण मानेंची पोस्ट चर्चेत ( Kiran Mane Share Post For Current Situation In Maharashtra)

कुठे कुठला उमेदवार हवा होता-नको होता, या वादात आपण सर्वसामान्य माणसांनी अडकायला नको. महाराष्ट्रात या…

April 11, 2024

संकर्षण सोबत लग्न करण्याची इच्छा पण आईने…. अभिनेत्याची चाहतीसाठी खास पोस्ट ( Sankarshan Karhade Share Post For His Fan, Who Wants To Marry Him)

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नुकताच त्याने त्याला साताऱ्याला आलेला त्याच्या खास…

April 11, 2024
© Merisaheli