FILM Marathi

नवरात्रीच्या मुहूर्तावर कॉमेडी कपल सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसलेने दिली गोड बातमी (Sugandha Mishra-Sanket Bhosale Announce Pregnancy)

कॉमेडीगर्ल सुगंधा मिश्राच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे, कॉमेडियनने नवरात्रीच्या दिवशी ही आनंदाची बातमी जाहीर केल. सुगंधाने पती संकेतसोबतचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात तिचा बेबी बंप दिसत आहे.

सुगंधाने 26 एप्रिल 2021 रोजी डॉ. संकेत भोसले यांच्याशी लग्न केले. हे जोडपे लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. डॉ. संकेत एक उत्कृष्ट विनोदी अभिनेता देखील आहे. दोघेही पालक होण्यासाठी सज्ज आहेत

सुगंधाने तिच्या पतीसोबत खूप रोमँटिक पोज देणारे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने साइड स्लिट असलेला मरून गाऊन घातला आहे. तर संकेतने गुलाबी शर्ट आणि डेनिम परिधान केली आहे.

फोटोंसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे – बेस्ट यायचे अजून बाकी आहे… आम्ही आमच्या एडीशनची प्रतीक्षा करू शकत नाही, कृपया प्रेम आणि आशीर्वाद द्या. या फोटोंमध्ये सुगंधा आणि संकेत खूप आनंदी दिसत आहेत.

चाहत्यांसोबतच सेलिब्रिटीही या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. सुगंधा ही केवळ एक चांगली विनोदी कलाकार नाही तर एक उत्कृष्ट गायिका देखील आहे.

सारेगमपमध्ये तिने सहभाग घेतला असून आपल्या आवाजाने सर्वांना प्रभावित केले होते. ती कपिल शर्मा शोचा एक भाग देखील आहे, तर संकेत देखील कपिलच्या शोच्या काही भागांमध्ये दिसला होता. तो संजू बाबाच्या मिमिक्रीसाठी लोकप्रिय आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

मलायका अरोरा देखील करणार दुसरं लग्न, लग्नाची पत्रिका घेऊन पोहोचली पहिल्या पतीच्या घरी? (Malaika Arora Reached Her First Husband Arbaaz Khans House For Gave Her Marriage Card)

सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या मलायका हिच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरू आहे. अरबाज खान याच्यानंतर…

April 30, 2024

Invest Smart, Retire Rich

Struggling With Your Investments? Shreeprakash Sharma offers Help! Ragini realised yet another financial year was…

April 30, 2024

अधिपतीच्या आयुष्यात नवीन मास्तरीणबाईंची एण्ट्री, भुवनेश्वरीची नवी चाल, प्रोमो व्हायरल ( Zee Marathi Serial Tula Shikwin Changlach Dhada New Promo Viral )

तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत सध्या अक्षराने अधिपतीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. शाळेतील शिक्षण…

April 30, 2024
© Merisaheli