Marathi

स्‍वाइप, सेव्‍ह, सोअर: यंदा उन्‍हाळ्यामध्‍ये बजेट-अनुकूल प्रवासासाठी व्हिसाचे स्‍मार्ट हॅक्‍स (Swipe, Save, Soar: Visa’s Smart Hacks for Budget-Friendly Travel This Summer)

उन्‍हाळा सुरू झाला असताना साहसी प्रवासाचा आनंद घेण्‍याची उत्‍सुकता वाढली आहे. समुद्रक्रिनारी किंवा डोंगराळ भागामध्‍ये सुट्टीचा आनंद घ्‍यायचा असो, स्‍मार्टपणे खर्च करणे हा सुट्टीचे योग्‍य नियोजन करण्‍याचा उत्तम मार्ग आहे. व्हिसा बजेट-अनुकूल, सुरक्षित आणि विनासायास ट्रिपसाठी महत्त्‍वाच्‍या टिप्‍स सांगत आहे:

  1. फायदे देणाऱ्या पेमेंट पर्यायांची निवड करा: प्रवास, अनुभव आणि निवास सुविधेचे बुकिंग करताना तुमच्‍या व्हिसा क्रेडिट, डेबिट व प्रीपेड कार्डवरील ऑफर्सची तपासणी करा. अनेकजण आकर्षक कॅशबॅक्‍स, ट्रॅव्‍हल रिवॉर्डस्, पॉइण्‍ट्स किंवा हॉटेल आणि फ्लाइट सूट देतात. या ऑफर्स उत्तम बचत करू शकतात, ज्‍यामुळे तुम्‍ही सुट्टीचा अधिकाधिक आनंद घेऊ शकता.
  2. कॉन्‍टक्‍टलेसला प्राधान्‍य द्या: सुरक्षित, विनासायास पेमेंट्सकरिता कुठेही कॉन्‍टॅक्‍टलेस कार्डसचा वापर करा. तुम्‍ही पेमेंट अॅप्‍सवर व्हिसा कार्ड तपशील देखील सेव्‍ह करू शकतात आणि पेमेंटसाठी तुमचा स्‍मार्टफोन टॅप करू शकता.
  3. आंतरराष्‍ट्रीय खर्चासाठी मल्‍टीकरण्‍सी कार्डसचा वापर करा: मल्‍टीकरण्‍सी फोरेक्‍स किंवा ट्रॅव्‍हल कार्डचा वापर करत करण्‍सी एक्‍स्‍चेंज व चढ-उतार यांचा त्रास दूर करा. तुम्‍ही परदेशात विनासायास पेमेंट्ससाठी तुमच्‍या दैनंदिन क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर देखील आंतरराष्‍ट्रीय व्‍यवहार करू शकता.
  4. सुरक्षितपणे पेमेंट करा, सुनिश्चित राहा: चिप-व-पिन कार्डसमध्‍ये इनबिल्‍ट एन्क्रिप्‍शन असते, जे पीसीआय-डीएसएस प्रोटोकॉल्‍सचे पालन करतात आणि ऑनलाइन व्‍यवहारांसाठी टोकनाइज करता येऊ शकतात. तुम्‍ही सुरक्षित ऑनलाइन पेमेंट्ससाठी उपलब्‍ध असल्यास बायामेट्रिक ऑथेन्टिकेशन सारख्‍या उपायांचा देखील वापर करू शकता.
  5. रिअल-टाइम अलर्टससह उत्तमरित्‍या बजेटची आखणी करा: रिअल टाइममध्‍ये खर्चावर देखरेख ठेवण्‍यासाठी तुमच्‍या अॅपमध्‍ये नोटिफिकेशन्‍स सेट अप करा. आता ट्रिपदरम्‍यान कोणताही त्रास न होता सुट्टीचा मनसोक्‍त आनंद घ्‍या.

या स्‍मार्ट टिप्‍ससह उन्‍हाळ्यामध्‍ये प्रवासाचा अधिकाधिक आनंद घ्‍या. बजेटवर लक्ष ठेवत आणि सुरक्षितपणे पेमेंट्स करत नवीन गंतव्‍ये एक्‍स्‍प्‍लोअर करा!

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

कहानी- पराजय (Short Story- Parajay)

तब वह अपने पति के भटके कदमों को‌ बांधने में सफल हुई थी. पर उसके…

July 10, 2025

बधाई हो: राजकुमार राव-पत्रलेखा ने दी पैरेंट्स बनने की ख़ुशख़बरी (Congratulations: Rajkumar Rao-Patralekha gave the good news of becoming parents)

राजकुमार राव ऐसे अभिनेता हैं, जो हर भूमिका को बख़ूबी निभाते हैं, फिर चाहे अभिनेता…

July 9, 2025
© Merisaheli