Marathi

‘गाठ पे ध्‍यान’ अभियानातुन महिलांना स्‍तनाच्या कर्करोग तपासणीसाठी टाटा ट्रस्ट प्रेरित करणार (Tata Trusts to raise awareness about breast cancer among women By Gath Pe Dhyan )

भारतात दर चार मिनिटाला एका महिलेचे स्‍तनाचा कर्करोगासह निदान होत आहे, ज्‍यामुळे कर्करोगामध्‍ये घेतल्‍या जाणाऱ्या केअरमधील अडथळ्यांना दूर करणे आवश्‍यक आहे. लवकर निदान झाल्‍यास बहुतांश केसेसमध्‍ये प्रभावीपणे उपचार करता येऊ शकतो. भारतातील ७५ टक्‍के महिला तपासणी करणे टाळतात किंवा नकार देतात आणि ६० टक्‍के महिलांना मित्रमैत्रिणी व कुटुंबासोबत स्‍तनाच्या कर्करोगाबाबत चर्चा करण्‍यास अस्‍वस्‍थ वाटते, असे सर्वेक्षणामधून निदर्शनास आले आहे . ‘गाठ पे ध्‍यान’ (गाठींवर लक्ष केंद्रित) मोहिमेच्‍या माध्‍यमातून टाटा ट्रस्‍ट्सने महिलांना ज्‍याप्रमाणे त्‍या त्‍यांच्‍या स्‍वयंपाकामध्‍ये बारकाईने लक्ष देतात अगदी तसेच गाठींसाठी त्‍यांच्‍या स्‍तनांची तपासणी करण्‍याकडे लक्ष देण्‍यास प्रेरित केले. यासह, टाटा ट्रस्‍ट्सने स्‍वयंपाकामधील कामामधून आत्‍मनिरीक्षण व सक्षमीकरणाला चालना दिली.

मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्‍या या मोहिमेचा नुकतेच ‘गाठ पे ध्‍यान’ कूकबुक लाँच करण्‍यासह शेवट झाला. या अद्वितीय प्रयत्‍नामध्‍ये पाककलांचा संग्रह आहे, ज्‍याचा ‘परिवर्तनाच्‍या दिशेने वाटचाल, एका वेळी एक रेसिपी’ हा उद्देश आहे. ऑनलाइन आणि मोफत डाऊनलोडसह उपलब्‍ध असलेले हे कूकबुक पाककलांसह विचारपूर्वक डिझाइन करण्‍यात आले आहे, जे आवड निर्माण करतात. तज्ञ भारतीय शेफ्स-टर्न-कॅम्‍पेन-अॅम्‍बेसडर्स जसे मास्‍टरशेफ्स शिप्रा खन्‍ना व सांता सरमा, तसेच शेफ्स अनन्‍या बॅनर्जी, सैलाजा ऐचुरी, प्रिया गुप्‍ता, वरप्रसाद कार्त्‍यायेनी आणि लैबा अशरफ यांच्‍याकडून पाककलांचा स्रोत मिळवण्‍यात आला आहे.

टाटा ट्रस्‍ट्सच्या शिल्‍पी घोष यांनी आयोजित केलेल्‍या पॉडकास्‍ट मध्‍ये प्रतिष्ठित न्‍यूट्रिशनिस्‍ट रूजुता दिवेकर आणि प्रख्‍यात ब्रेस्‍ट कॅन्‍सर ऑन्‍कोलॉजिस्‍ट डॉ. राजेंद्र बडवे यांनी या कूकबुकचे पुनरावलोकन केले, जेथे स्‍तनाचा कर्करोग, महिलांचे स्‍वास्‍थ व पोषण यामधील परस्‍परसंबंधाचा शोध घेण्‍यात आला. हे कूकबुक शेफ संजीव कपूर असलेली ‘सोशल एक्‍स्‍पेरिमेंट’ जाहिरात ‘गाठ पे ध्‍यान’चे विस्‍तारीकरण आहे, जी गेल्‍या वर्षी ट्रस्‍ट्सने लाँच केली होती. या जाहिरातीने देशभरातील तरूण व श्रमजीवी व्‍यावसायिकांमध्‍ये मोठ्या प्रमाणात रूची निर्माण केली.

याला पूरक आणखी एक जनजागृती करणारी जाहिरात होती, ज्‍यामध्‍ये मुंबईतील महिला स्‍ट्रीट-फूड विक्रेत्‍या होत्‍या. या जाहिरातीमधून लवकर निदान आणि स्‍वत:हून स्‍तनाची तपासणी करण्‍याच्‍या गरजेचे महत्त्व दाखवण्‍यात आले. या दृष्टिकोनामधून निदर्शनास आले की, आहारामध्‍ये कोणत्‍याही प्रकारचा अडथळा टाळणे हे त्‍यांच्‍या उदरनिर्वाहासाठी आवश्‍यक आहे, पण स्‍तनांमधील गाठींमुळे कर्करोग होऊ शकतो याबाबत मर्यादित प्रमाणात जागरूकता आहे. मुंबई आणि इतर प्रतिष्ठित प्रादेशिक वैद्यकीय संस्‍थांमधील डॉक्‍टरांच्‍या पाठिंब्‍यासह प्रत्‍यक्षात मोहिम राबवत ट्रस्‍ट्सने विविध कॉर्पोरेट्समध्‍ये स्‍तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती केली, तपासणी शिबिरे राबवली, ज्‍यामुळे अधिक केसेसची तपासणी झाली, ज्‍याकडे अन्‍यथा दुर्लक्ष झाले असते.

‘गाठ पे ध्‍यान’ मोहिमेला भारतात व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर विविध मान्‍यता मिळाल्‍या आहेत, जसे प्रोवोक ग्‍लोबल क्रिएटिव्‍ह इंडेक्‍स २०२४ मध्‍ये दुसरा क्रमांक मिळाला.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

 “झामल झामल” गाण्यात दर्शवली व-हाडी भाषेची गुलाबी गोडी ! ( New Marathi Song Zamal Zamal Release )

महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतात एक बोली भाषा बोलली जाते. महाराष्ट्राच्या विदर्भात बोलली जाणारी वऱ्हाडी ही मराठीची अत्यंत महत्त्वाची…

March 10, 2025

पहला अफेयर- सुरों भरी शाम के नगमे… (Love Story- Suron Bhari Sham Ke Nagme…)

मैं तो सच में मदहोश हो गई. गाने के हर लफ़्ज़ के साथ जैसे एक…

March 10, 2025

मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येबाबत शरद पोंक्षेंनी व्यक्त केली चिंता, व्हिडिओ शेअर करत मांडले विचार ( Sharad Ponkshe Share Video On Mumbai Pune Population)

अभिनेते शरद पोंक्षे यांनी नुकतेच मुंबईच्या लोकसंख्या वाढीवर आपले मत व्यक्त केले आहे. सोबतच त्यांनी…

March 10, 2025

कहानी- काश कि तुम लौट जाते (Short Story- Kash Ki Tum Laut Jate)

तुम जब मेरे क़रीब आए, तुमने जब मेरे हाथों को छुआ तो मुझे भी एक…

March 10, 2025
© Merisaheli