Marathi

ज्येष्ठ नागरिकांबद्दलचा तरुणाईचा दृष्टिकोन बदलायला लावणारा महेश मांजरेकरांचा नवा चित्रपट ‘जुनं फर्निचर’चा टीझर प्रदर्शित (Teaser Of Mahesh Manjrekar-Starrer Marathi Film Juna Furniture Out)

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर ओळखले जातात. महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात. त्यांचा ही अनोखी गाठ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना मांजरेकरांनी त्यांच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. त्यांचा नवा सिनेमा देखील मनोरंजक असून सिनेमाचा पहिला टीझर रिलीज करण्यात आला आहे. ‘ओल्ड फर्निचर’ असं सिनेमाचं नाव असून सिनेमात स्वत: महेश मांजरेकर प्रमुख भूमिकेत आहेत. 

‘जुनं फर्निचर’ या सिनेमाचा टिझर लाँच सोहळा शिवाजी पार्क येथे दणक्यात पार पडला. सलीम खान यांच्या हस्ते हे टिझर लाँच करण्यात आलं. यावेळी  महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर या सिनेमातील कलाकारांसह अनेक स्थानिक, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यादरम्यान महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवादही साधला. हा सिनेमा २६ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळली आहे.

‘जुनं फर्निचर’ या चित्रपटात ७१ वर्षीय एका वृद्ध व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित असल्याचे दिसत आहे. टीझरमध्ये महेश मांजरेकर “या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा!” असा डायलॉग बोलताना दिसत आहेत. त्यांचा हा डायलॉग लक्षवेधी ठरत आहे. टीझरच्या बॅकग्राऊंडला येणारा भारदस्त आवाज, दमदार व्यक्तीमहत्व एकंदरीत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवताना दिसत आहे. एकंदरीत या चित्रपटात आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. आजकाल तरुण पिढी ही वयस्कर व्यक्तींना पाहून ‘ओल्ड फर्निचर’ असे बोलताना दिसतात. पण त्यांच्या मनातील हिच भावना खोडून काढण्याचा निर्णय महेश मांजरेकरांनी घेतला आहे. हा एक मल्टीस्टारर कौटुंबिक चित्रपट असल्याचे स्पष्ट होत आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मत मांडले. तेव्हा ते म्हणले की हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्यापैकीच हा ‘ओल्ड फर्निचर’ म्हणजेच ‘जुनं फर्निचर’ देखील ट्रेंड मध्ये असतो. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना ‘जुनं फर्निचर’ असे म्हणतात. परंतु हेच जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते, हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार असल्याची माहिती महेश मांजरेकर यांनी दिली आहे. या चित्रपटात भावना दडलेल्या आहेत. चित्रपटगृहातून बाहेर पडताना ‘जुनं फर्निचर’बद्दलचा दृष्टिकोन बदलावणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची टीमही अतिशय दमदार आहे. पुढे महेश मांजरेकर यांनी सांगितले की निर्माते यतिन जाधवसोबतही यापूर्वी मी ‘दे धक्का २’ केला होता. त्यामुळे एकंदरच ही मस्त भट्टी जमून आली आहे. आता सगळ्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

(व्हिडिओ सौजन्य – इन्स्टाग्राम, सोशल मीडिया)

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती (Marathi Actress Bhagyashree Mote Broke Engagement With Vijay Palande Shared Post)

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. भाग्यश्री हिने सोशल मीडियावर…

April 11, 2024

उकाडा कमी करणारा थंडावा कसा मिळवाल? (How To Get A Coolness That Reduces Heat?)

वाढता असह्य उन्हाळा, घामाच्या धारा नि थकलेलं शरीर ह्यामुळे जीव अगदी नको नकोसा होतो. परंतु…

April 11, 2024

जान्हवी आणि शिखर पहाडियाच्या नात्याला शिक्कामोर्तब, मैदानच्या स्क्रिनिंगला घातला प्रियकराच्या नावाचा नेकलेस (Janhvi Kapoor Confirms Dating Shikhar Pahariya, Wears Necklace with His Name )

गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या डेटिंगच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत होत्या.…

April 11, 2024

Are you overdoing the sexual act ?

Ever thought that someday you might need medical treatment for having sex? Hypersexuality issomething very…

April 11, 2024

फिल्म समीक्षा: खेल के ‘मैदान’ में अजय देवगन और निर्देशक अमित शर्मा का लाजवाब गोल… (Movie Review: Maidaan)

रेटिंगः *** हिंदी सिनेमा में खेल पर बहुत कम फिल्में बनी हैं, लेकिन यह भी…

April 10, 2024

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे यांच्या ‘ऊन  सावली’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर वर्ल्ड  डिजिटल प्रीमियर! (Bhushan Pradhan And Shivani Surve’s New Film Unn Sawali World Digital Premiere On Ott)

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ऊन सावली' या चित्रपटाला प्रेक्षकांचं महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळालं. कांद्या पोह्याच्या कार्यक्रमातून…

April 10, 2024
© Merisaheli