Marathi

विदेशी तरुणीने ए आर रहमानसमोर गायले मां तुझे सलाम हे गाणं, व्हिडिओ व्हायरल (The foreign young Female Fan Sings Maa Tujhe Salam in front of AR Rahman)

भारतीय गायक एआर रहमान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत त्यांची एक चाहती गायकाची गाडी थांबवून त्यांचेच गाणे ऐकण्याची विनंती करताना दिसतेय. ती कोणी भारतीय नसून एक विदेशी तरुणी आहे.  व्हिडिओत ती रहमान यांचेच ‘मां तुझे सलाम’ हे गाणे गात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत रहमान आपल्या कारमधून जात असताना अचानक एक चाहती त्यांच्याजवळ त्यांना सांगते की, ‘ तुम्ही माझे आदर्श आहात. मी तुमच्यासाठी काही गाऊ शकते का?’ यावर रहमानही हो असे म्हणातात.

मग ती परदेशी मुलगी गिटार वाजवते आणि रहमान यांच्याच लोकप्रिय गाण्यांपैकी एक ‘मां तुझे सलाम’ हे गाणे गाते. चाहतीने स्वत: आपल्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला असून रहमान यांचे गाण्याची संधी दिल्याबद्दल आभारही मानले आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Célinedee Matahari नावाची ही चाहती एक संगीतकार असून ती मूळची दुबईची आहे. तिने अनेक म्युझिक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. इंस्टाग्रामवरही तिची फॅन फॉलोइंग चांगली आहे. ती गात असताना तिचा व्हिडिओ ए आर रहमान हे देखील काढताना दिसतात हे विशेष.

Akanksha Talekar

Recent Posts

स्वयंपाकघर ठेवा स्वच्छ, पाळा हे नियम (Keep The Kitchen Clean, Follow These Rules)

स्वयंपाकघरात काम करत असताना गृहिणीला कुटुंबाच्या आरोग्याशी निगडीत अगदी बारीक सारीक गोष्टींकडेही लक्ष द्यावं लागतं.…

April 17, 2024

कहानी- उपहार (Short Story- Uphaar)

मुझे सुखद आश्चर्य हुआ, "पूजा कहानियां लिखती है? वो तो‌ मोबाइल फोन लिए बैठे रहती…

April 17, 2024

लवकरच आई होणाऱ्या दीपिका पादुकोणने भरतकाम सुरू केलं असल्याचा फोटो केला शेअर (Deepika Padukone Tries Her Hands On Embroidery During Pregnancy – Fans React With Love)

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलीवूडचे रोमॅंटिक कपल नेहमीच चर्चेत असते. लग्नाच्या सहा वर्षांनंतर…

April 17, 2024
© Merisaheli