Marathi

‘इश्क इन द एअर’ मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित : दोन परस्पर विरोधी शहरांमधील प्रेमिकांचा प्रणयरम्य प्रवास घडविणारी मालिका (Trailer Of ‘Ishq In The Air’ Released : Series Is A Romantic Journey Of A Young Couple Having Different Careers)

अॅमेझॉन एमएक्स प्लेयर या अॅमेझॉनच्या विनामूल्य व्हीडिओ स्ट्रीमिंग सेवेने आज आगामी प्रेम-नाट्य मालिकेसाठी अधिकृत ट्रेलरचे अनावरण केले, ‘इश्क इन द एअर’ मध्ये इंदूर आणि मुंबई या दोन परस्परविरोधी शहरांच्या पार्श्वभूमीवर घडणारे कथानक तुम्हाला अनेक परस्पर भेटी, गोड प्रणय, दोन विरोधी जगाची टक्कर तसेच काही चकमकी अशी सरमिसळ दाखवेल. बीबीसी स्टुडिओज प्रॉडक्शन इंडियाने निर्मित केलेल्या या मालिकेत प्रतिभावान शांतनु माहेश्वरी आणि मेधा राणा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

या कार्यक्रमाविषयी आपले विचार मांडताना, अॅमेझॉन एमएक्स प्लेअरचे हेड ऑफ कंटेंट अमोघ दुसाद म्हणाले, “आमच्या आवडत्या रोमँटिक कंटेंटच्या श्रेणीवर आधारित, इश्क इन द एअर सादर करताना आम्हाला आनंद होतो आहे. ही चित्तवेधक कथा नमन आणि काव्याच्या प्रेममय वावटळीवर आधारित आहे. एका विमानतळावरील योगायोगाने झालेल्या परस्पर भेटीतून या वावटळीला वेग येतो. जसजसे त्यांचे नशीब एकमेकांत गुंफले जाते, तसतसे प्रेक्षक या जोडीमधील चमकदार केमिस्ट्रीत रमतील. आमच्या प्रेक्षकांसमोर हा आनंददायी प्रणय मांडण्याची उत्सुकता आम्हाला आहे. आमच्या रोमॅंटिक कार्यक्रमांबद्दल प्रेक्षकांनी आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे “.

नमनची भूमिका साकारणारे शांतनु माहेश्वरी पुढे म्हणाले, “अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर आणखी एक प्रणयरम्य कथा घेऊन परत येताना खूप छान वाटते. ही मालिका प्रेक्षकांना खूप भावेल. इश्क इन द एअर ही एक प्रेमकथा आहे. जी वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या नमन आणि काव्या या दोन व्यक्तींना एकत्र आणते. ते प्रेमाच्या प्रवासाला सुरुवात करतात. नमन आणि काव्या, यांच्या प्रेमाचे विमान उंच भरारी घेत असताना, ते जीवनातील चढ-उतारांमधून संबंध आणि भक्तीचा खरा अर्थ शोधून काढतात. ‘इश्क इन द एअर’शी संबंधित संकल्पना आणि पात्रांच्या अस्सल चित्रणाद्वारे आमच्या प्रेक्षकांच्या मनात एक सूत्र तयार होईल; ही आशा आम्हाला वाटते. हो, मी प्रत्येकाचा प्रतिसाद पाहण्यासाठी उत्सुक आहे. हे कथानक अतिशय प्रेमाने तयार करण्यात आले आहे.”

बीबीसी स्टुडिओज प्रॉडक्शन इंडिया’चे जीएम समीर गोगटे म्हणाले, “’इश्क इन द एअर’ हे एक आपल्या मातीतील अस्सल प्रणयरम्य नाट्य आहे. जे भारतासारख्या बहुसांस्कृतिक आणि वैविध्यपूर्ण देशातील सर्व गुंतागुंती तसेच सौंदर्यासह आधुनिक प्रेमाचे सार दर्शवते. प्रेक्षकांना या गुंतागुंतीच्या परंतु संबंधित पात्रांचा आणि प्रेमाच्या चढ-उतारांचा शोध लागावा यासाठी आम्ही उत्सुक आहोत. अॅमेझॉन एमएक्स प्लेअरसाठी हायवे लव्ह आणि तुझपे मैं फिदा या आमच्या मालिकेच्या यशानंतर, ही सुंदर परंतु अशक्य प्रेमकथा घडविण्यासाठी अॅमेझॉन एमएक्स प्लेअरसह पुन्हा भागीदारी करण्यास आम्ही रोमांचित आहोत. प्रेक्षक या प्रेममय प्रवासात सामील होतील आणि धक्कातंत्राचा आनंद घेतील ही आशा वाटते.”

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

THE OCEAN TOUCH

Get a cue from our rain-kissed and wind-swept looks. Stay in style with a hint…

April 15, 2025

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ च्या मंचावर कीर्तनात तल्लीन झाले प्रवीण तरडे (Praveen Tarde immersed himself in kirtan on the stage of Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar )

लोकप्रिय मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे… आपल्या मातीशी आणि संस्कृतीशी नाळ जोडून असलेलं…

April 14, 2025

समर सेक्स टिप्स (Summer Sex Tips)

हॉट समर सीज़न में अपने पार्टनर से दूरियां बढ़ाना और सेक्स के लिए बार-बार ना…

April 14, 2025

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या बायोपिकच्या पोस्टरची सोशल मीडियावर हवा (Dr. A.P.J. Abdul Kalam’s biopic poster is trending on social media )

निर्माता अभिषेक अग्रवाल यांच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतिक्षित…

April 14, 2025
© Merisaheli