Marathi

चटपटीत दृश्ये आणि धमाकेदार अभिनयाने भरलेले ‘लंडन मिसळ’चे ट्रेलर प्रदर्शित… (Trailer Of ‘London Misal’ Released : Contains Spicy Scenes Shot In London And Stepping Music)

ए बी इंटरनॅशनल, म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेते भरत जाधव अत्यंत हटके अशा प्रमुख भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत.  आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायन देखील केलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट प्रेरित आहे, हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य.

‘लंडन मिसळ’ चित्रपटातल्या चटपटीत सीन्सनी आणि कलाकारांच्या धमाकेदार परफॉर्मन्सनी भरलेला ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे आणि सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रितिका आणि ऋतुजाचे चित्रपटातील लूक्स कथेतील उत्सुकता वाढवतायत तर आपल्या अभिनयातून भरत जाधव पुन्हा एकदा विनोदाची चौफेर फलंदाजी करताना दिसतायत. गौरव मोरेनेही नेहमीप्रमाणे हास्याचे षटकार आपल्या सीन्समधून मारलेयत. त्यामुळे अर्थातच चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकता वाढलीय. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजपचे प्रदेशिय चिटणीस श्रीकांत भारतीय हे चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

‘लंडन मिसळ’ या चित्रपटाचे निर्माते अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै आणि आरोन बसनेट आहेत तर सह-निर्माते सानिस खाकुरेल आहेत. दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे, तर सह-दिग्दर्शन वैशाली पाटील यांनी केले आहे. पटकथा-संवाद ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. वैशाली सामंत, रोहित राऊत, वैष्णवी श्रीराम यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे तर ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या संगीताच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या साई-पियुष या संगीतकारांच्या जोडीनं ‘लंडन मिसळ’ चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक केलं आहे. चित्रपटात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत तर भरत जाधव एका हटके भूमिकेत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसणार आहेत आणि ही प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी असेल.

आदिती आणि रावी या लंडनमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींची ही कथा आहे. आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यावेळी ज्या दिव्यातून त्यांना जावं लागतं त्याची कथा म्हणजे ‘लंडन मिसळ’. नाटक, अभिनय, संगीत, नृत्य, खळखळून हसवणारे विनोद आणि झणझणीत मिसळ याची जुगलबंदी आपल्याला या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटाचे डिस्ट्रिब्युशन फिल्मअस्त्रा स्टुडिओज करत आहेत.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

फिल्म समीक्षा: भैया जी- वही पुरानी कहानी पर बिखरता अंदाज़… (Movie Review- Bhaiyya Ji)

आख़िर ऐसी फिल्में बनती ही क्यों है?.. जिसमें वही पुरानी घीसी-पीटी कहानी और बिखरता अंदाज़,…

May 25, 2024

कहानी- मुखौटा (Short Story- Mukhota)

"तुम सोच रहे होगे कि‌ मैं बार में कैसे हूं? मेरी शादी तो बहुत पैसेवाले…

May 25, 2024

श्वेता तिवारी माझी पहिली आणि शेवटची चूक, ‘या’ अभिनेत्याची स्पष्ट कबुली (When Cezanne Khan Called His Kasautii… Co-Star Shweta Tiwari “First & Last Mistake”)

श्वेता तिवारी तिचा अभिनय आणि फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर हॉट फोटो पोस्ट करुन…

May 25, 2024

सुट्टीचा सदुपयोग (Utilization Of Vacation)

एप्रिलच्या मध्यावर शाळा-कॉलेजला सुट्ट्या लागतील. सुट्टी लागली की खूप हायसे वाटते. थोड्या दिवसांनंतर मात्र सुट्टीचा…

May 25, 2024
© Merisaheli