Recipes Marathi

मधल्या वेळेत खाण्याचे उत्तम पर्याय (Try These Options To Eat Between Two Meals)

अलीकडे लठ्ठपणा वाढला असल्याचे दिसून येते. पोटाचा, कंबरेचा घेर वाढलेली माणसे जास्त प्रमाणात दिसतात. बैठे काम, व्यायामाचा अभाव, बिघडलेली जीवनशैली यामुळे वजन वाढते. त्याचप्रमाणे अरबट चरबट पदार्थ खाल्ल्याने हे वजन वाढते. शिवाय हे खाणे अवेळी असते. म्हणजे कामाच्या झपाट्यात नको तेव्हा भूक लागते. भुकेची वेळ टळून गेल्यावर भान येतं. काहीतरी तोंडात टाकावसं वाटतं. अन् मग हाती वेफर्सचं पॅकेट येतं. पाय वडापावच्या गाडीकडे वळतात किंवा पिझ्झा-बर्गर ऑनलाइन मागवले जातात. हे पदार्थ पोटात गच्च बसतात. शरीराची हालचाल कमी झाल्याने नीट पचत नाहीत. अन् पोटाची चरबी वाढते.
-• या सर्व गोष्टी टाळल्या पाहिजेत. अन् वेळच्या वेळी तेलकट, मसालेदार पदार्थ पोटात न ढकलता पचायला हलके, पौष्टिक पदार्थ खाल्ले पाहिजेत. शिवाय जास्त कॅलरीयुक्त पदार्थ न खाता, सात्त्विक पदार्थ खाण्याची सवय लावून घेतली पाहिजे. कॅलरीज, कार्बोहायड्रेटस्, फॅ ट आणि प्रोटिन्स युक्त यांचे संतुलन राखणारे पदार्थ खाल्ले तर शरीरात चरबी साठून घेर वाढण्याच्या समस्या उत्पन्न होणार नाहीत. त्यासाठी खालील प्रकार प्रयत्न करून बघा. जेवणाव्यतिरिक्त आपण जे स्नॅक्स खातो, त्यामध्ये हे प्रकार अजमावून पाहा.
-• ब्राऊन ब्रेडमध्ये बनविलेले एक सॅण्डवीच खा. त्यामध्ये बटर किंवा मेयॉनीज सॉस न लावता, लो फॅ ट, लो कॅलरी चीझ घाला. सोबत चहा घ्या. हा ग्रीन टी असल्यास उत्तम. किंवा चहापानाच्या वेळी हे सॅण्डवीच खा.

-• मलई नसलेली लस्सी प्या. लस्सी सोबत उपमा किंवा पोहे खा.
-• तळलेले पदार्थ न खाता, भाजलेले पदार्थ खा. भाजलेले तिखट पदार्थ, चणे किंवा गोड चटणी ज्यूस घ्या.

-• आपल्या आवडत्या भाज्यांचे बारीक तुकडे करा. ते तुकडे उकडून घ्या. त्यावर थोडेसे मीठ आणि मिरी पावडर टाका. उपलब्ध असल्यास त्यावर व्हिनेगरचा बेस असलेले सॅलड ड्रेसिंग टाका. हा चविष्ट आणि पौष्टिक पर्याय होऊ शकतो.

-• उकडलेल्या भाज्या काहींना आवडणार नाहीत. बेचव आहेत, असं वाटेल. अशा लोकांनी एक प्लेट सॅलड, ताजी फळे किंवा फ्रूट चॅट खायला हरकत नाही.
-• काही लोक मधल्या वेळात चॉकलेट खातात. पण त्यामध्ये कॅलरीज् जास्त प्रमाणात असतात. म्हणून चॉकलेट खाण्याची इच्छा झाल्यास मलई नसलेल्या दुधात ड्रिंकींग चॉकलेट टाकून प्या.

-• संध्याकाळी भूक लागते. अन् चमचमीत खाण्याची इच्छा होते. ही इच्छा दाबून ठेवा. चमचमीत पदार्थांऐवजी फ्रेश व्हेजिटेबल सूप प्या. पचायला हलका आणि पौष्टिक असा हा पदार्थ आहे.
-• ऑफिसला जाते वेळी किंवा बाहेर पडताना सोबत बिस्किटाचा पुडा ठेवा. अर्थात् ही बिस्किटे मल्टी ग्रेन किंवा होल ग्रेन असावीत. (याचे विविध प्रकार सध्या उपलब्ध आहेत.) म्हणजे मधल्या वेळेत जंक फूड खाण्याऐवजी बिस्किट्स कामी येतील.
-• वाटीभर दह्यात भाजलेले जिरे, मीठ आणि मिरी पावडर टाकून खा. भूक भागवा.
-• ऑफिसला जाताना लंच बॉक्स बरोबरच एक स्नॅक्स बॉक्स सोबत ठेवा. या स्नॅक्स बॉक्समध्ये हलके स्नॅक्स ठेवा. मधल्या वेळेत खायला हे पदार्थ कामी येतील.


-• एखाद्या दिवशी या स्नॅक्स बॉक्समध्ये सुकामेवा भरून न्या. काजू, किसमीस, बदाम, अक्रोड तसेच शेंगदाणे आणि गूळ असा सुकामेवा नेल्यास भूक भागेल. शिवाय वजन नियंत्रणात राहील. अन् हृदय विकाराचा धोका पण कमी राहील.
-• भजी, वडा-पाव, बर्गर, समोसे असे तेलकट व चरबीयुक्त पदार्थ खाण्याऐवजी ताजी फळे खा. ती पचायला हलकी व भूक भागवणारी तसेच पौष्टिक असतात.त्यात असलेल्या व्हिटॅमिन्सने शरीरात चांगली ऊर्जा येते.

majhisaheli

Share
Published by
majhisaheli

Recent Posts

टाइगर श्रॉफ-  मैं कभी भी इसकी भरपाई नहीं कर पाऊंगा… (Tiger Shroff- Main Kabhi Bhi Iski Bharpai Nahi Kar Paunga…)

एक्शन हीरो के रूप में अपना एक अलग मुक़ाम बनाया है टाइगर श्रॉफ ने. उनसे…

April 17, 2024

मुलांनी लिव्ह इनमध्ये राहण्याच्या झीनम अमानच्या विधानावरुन जुंपले शीतयुद्ध, सायरा बानू आणि मुमताज यांच्या प्रतिक्रिया चर्चेत ( After Mumtaz, Now Saira Banu Speaks On Zeenat Aman’s Advocacy For Live-In Relationships)

जेव्हापासून झीनत अमानने सोशल मीडियावर प्रवेश केला, तेव्हापासून त्या तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाल्या आहे. झीनत…

April 17, 2024

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर प्रदर्शित (‘Swargandharva Sudhir Phadke’ Trailer Is Out)

मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून मराठी घराघरांत आणि मनामनात पोहोचलेलं एक अजरामर नाव म्हणजे स्वरगंधर्व…

April 17, 2024

रामनवमीच्या निमित्ताने अरुण गोविल यांनी केली कन्यापुजा ( Arun Govil performs Kanya Pujan, Washes Feets Of Little Girls, Feeds Them, Wishes Fans On Ram Navami )

रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये श्री रामची भूमिका करून लोकांची मने जिंकणाऱ्या अरुण गोविल (टीव्ही राम…

April 17, 2024
© Merisaheli