Uncategorized

ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारचा केला अपमान, ऑटोग्राफ मागताच म्हणाली…. (Twinkle Khanna insulted Akshay Kumar At Book Launching Event)

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्नाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अक्षय आणि ट्विंकल यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघेही अनेकदा आपल्या सोशल मीडियावरुन एकमेंकासोबतचे खास व्हिडिओ शेअर करत असतात. आता त्यांचा एक व्हिडिओ चर्चेत आहे.

ट्विंकल खन्ना ही अभिनेत्री म्हणून जितकी लोकप्रिय झाली नाही तितकी ती एक लेखिका म्हणून झाली. तिची अनेक पुस्तके लोकप्रिय आहेत. तिचे आणखी एक नवे पुस्तक नुकतेच लॉन्च झाले. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

 हा व्हिडिओ ट्विंकल खन्नाच्या नुकत्याच लाँच झालेल्या पुस्तकाच्या साइनिंग इव्हेंटचा आहे. या कार्यक्रमात अक्षय कुमार त्याच्या बायकोकडे पुस्तकावर स्वाक्षरी घेण्यासाठी जाताना दिसतो. तो ट्विंकलकडे जातो आणि तिला पुस्तकावर ऑटोग्राफ करायला सांगतो. यावर ट्विंकल खन्नाने त्याला पुस्तकावर ऑटोग्राफ देण्यास नकार दिला आणि वाट पाहण्यास सांगितले. ती स्पष्टपणे सांगते की ती आधी उभ्या असलेल्या लोकांच्या पुस्तकांवर स्वाक्षरी करेल आणि त्यानंतर तुझ्या. यावर अक्षय कुमार मागे वळून म्हणातो की मी थांबतो आणि नंतर येतो. दोघांची ही अनोख्या स्टाइलला लोकांची खूप पसंती मिळत आहे.

अक्षय कुमार शेवटचा ‘मिशन रानीगंज’मध्ये दिसला होता. या वर्षी अक्षय कुमारचे ‘सेल्फी’ आणि ‘ओह माय गॉड 2’ आणि मिशन राणीगंज हे तीन सिनेमे प्रदर्शित झाले. यातील सेल्फी पडद्यावर फार काही करू शकला नाही, पण ‘OMG 2’ ला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले. ‘मिशन राणीगंज’बद्दल बोलताना, या चित्रपटातील अक्षय कुमारचे काम समीक्षकांना आवडले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही, मात्र चित्रपटाच्या कथेचे खूप कौतुक झाले.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

फिल्म समीक्षाः ‘श्रीकांत’ के रूप में राजकुमार राव की बेमिसाल अदाकारी में दिखी तुषार हीरानंदानी के निर्देशन की जादूगरी… (Movie Review: Shrikanth)

रेटिंगः **** विकलांगों पर दया या सहानुभूति न दिखाएं, बल्कि उनके अंदर छिपी अद्भुत क्षमता…

May 7, 2024

विठ्ठलावर श्रद्धा असणाऱ्या रायाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमचे मनोगत : तो स्वतःला भाग्यवान का समजतो? (Actor Vishal Nikam Has A Devotional Background; Hero Of ‘Yed Lagale Premache’ Feels Proud About This)

२७ मे पासून स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या येड लागलं प्रेमाचं मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.…

May 7, 2024

 मेट गाला सोडून पती रणवीर सिंहसह बेबीमूनचा आनंद घेतेय दीपिका पादुकोण, बेबी बंपसह फोटो व्हायरल (Deepika Padukone Flaunts Baby Bump, Actress Skips Met Gala To Enjoy Babymoon With Ranveer Singh)

एकीकडे सर्व सेलेब्स मेट गालामध्ये आपली स्टाईल दाखवत असताना, यावेळी दीपिका पदुकोण या कार्यक्रमातून गायब…

May 7, 2024

‘हिरामंडी’मधील मल्लिका जानची भूमिका १८ वर्षांपूर्वी या अभिनेत्रीला झाली होती ऑफर (Sanjay Leela Bhansalis First Choice For Mallika Jaan Not Manisha Koirala)

संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी: द डायमंड बाजार' या चित्रपटातील मनीषा कोईरालाच्या अभिनयासाठी तिचे खूप…

May 7, 2024

मेट गाला २०२४ मधील आलियाचा देसी स्वॅग चर्चेत, साडीत खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य (Alia Bhatt saree look in Met Gala 2024, Everyone Impress Her Indian attire)

जगातील सर्वात मोठा मेगा फॅशन इव्हेंट मेट गाला (Met Gala 2024) सुरू झाला आहे. न्यूयॉर्क…

May 7, 2024
© Merisaheli